महापुरुषांचा त्याग अन्‌ शौर्याच्या इतिहासाने देश घडतात : अनिल महाजन

0
20

आसोद्यातील सार्वजनिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

महापुरुष आणि त्यांची विकसित विचारधारा ही देशाची संपत्ती आहे.त्यांचा त्याग आणि शौर्याच्या इतिहासाने देश घडतात. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा देशाला वेगळ्या उंचीवर नेणारा ठरला असल्याचे मत सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल महाजन यांनी व्यक्त केले. ते आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.

यावेळी नवनिर्वाचित सचिव विलास चौधरी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनी देवयानी माळी, रुचिता सूर्यवंशी यांनी महापुरुषांच्या जयंती का साजरी करतात त्याचे महत्व पटवून दिले. यावेळी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची लाभली उपस्थिती

यावेळी संस्थेचे संचालक उद्धवराव पाटील, सुनील चौधरी, गोपाळ भोळे, पंडित चौधरी, रत्नाकर महाजन, देविदास चौधरी, दिलीप अत्तरदे, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.एस. डी.महाजन आभार स्वाती वाघुळदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here