विवाहितेच्या डोक्यात शस्त्राने वार करून खून, पतीने कृत्य केल्याचा संशय

0
9

भुसावळ शहरातील द्वारका नगर परिसरातील घटना

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी

शहरातील द्वारका नगर परिसरात तरूण विवाहित महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पसार होण्याच्या प्रयत्नातील आरोपी पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

वर्षा अक्षय गुंजाळ (वय २२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या द्वारकानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मागे त्यांच्या आजीकडे तात्पुरत्या रहिवासी म्हणून आलेल्या होत्या. मंगळवारी वर्षा गुंजाळ ह्या घरी होत्या. त्यानंतर दुपारी वर्षा गुंजाळ यांच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करून त्यांचा खून करण्यात आला. पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीनेच पत्नीचा खून केल्याची प्रथम दर्शनी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी विवाहितेचा बळी

शहरातील द्वारका नगरात खून झाल्याची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अत्यावस्थ अवस्थेत महिलेस ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केल्यावर महिलेस वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या प्रकाराने हळहळ व्यक्त होत आहे.

जोरदार कौटुंबिक वादाची मिळाली माहिती

याप्रकरणी मयत महिलेचे पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ (वय २६, रा. मुंबई) यांचे त्यांच्या पत्नीशी तिच्या आजी रंजना प्रकाश यशोदे यांच्या घरी वास्तव्यास असताना जोरदार कौटुंबिक वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here