जिओफोरमच्या उपाध्यक्ष पदी डॉ. एस.एन.पाटील

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाळेतील उपयोजित भूविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस.एन.पाटील यांची “एससोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँड हैड्रोजिओलॉजीस्टस (जिओफोरम) महाराष्ट्र” चे उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

ही संघटना व्यावसायिक आणि वैज्ञानिक मंच आहे ज्यामध्ये भूविज्ञान, अभियांत्रिकी भूविज्ञान आणि भूजल क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे खानदेशातून जिओफोरमचे पहिले उपाध्यक्ष होण्याचा मान त्याना प्राप्त झाला आहे ते इंडियन सोसायटी ऑफ इंजिनिअरींग जिऑलॉजीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम पाहत आहेत. भूशास्त्र विषयात गेल्या ३३ वर्षापासून संशोधन आणि अध्यापनाचे काम ते करीत आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here