Author: Saimat

साईमत नंदुरबार प्रतिनिधी आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार व तळोदा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा दि. १७ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 2:00 ते 3:30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदरची माहिती, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा), प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी पत्रकान्वये दिली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची…

Read More

साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत यांनी डॉ. भूषण कुलकर्णी यांच्या सत्कार केला आणि त्यानंतर आरोग्य हे जीवनात किती महत्त्वाचे असून त्याची कशा पद्धतीने राखण केली पाहिजे याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिबिरास लाभलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे रक्तदाब, उंची,वजन आणि नाडीचे ठोके तपासले. शिबिरास प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश खोब्रागडे,…

Read More

साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश संकलन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सी .पी. सावंत सर, रा.से. यो. जिल्हा समन्वयक विजय पाटील ,रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा राजेश्वरसिंग पाडवी, स.का. अधिकारी अंकुश खोब्रागडे सर, यांनी यावेळेस अमृत कलाशामध्ये मुठभर माती घेउन त्याचा सेल्फी फोटो घेतला व तो केंद्र सरकारने दिलेल्या लिंक वर अपलोड केला. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भरत पाटील, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख, प्रा. डॉ. योगेश दुशिंग, प्रा. डॉ. विनोद…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत अमर डेअरी येथे कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमर डेअरीचे संचालक अक्षय खत्री होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्लांट हेड अविनाश चंदनशे, एच.आर.पी.एस.दिक्षीत, न्यु गणपती हॉस्पिटलचे कल्पेश सुर्यवंशी होते.यावेळी डॉ.मितेश घुगे,डॉ. कृतिका जाधव यांनी १५० कामगारांची बी.पी.,शुगर, इ.सी.जी. तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले कार्यक्रमास राजेश जाधव,टी.सी.पाटील व न्यु गणपती हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी निर्भेळ निकोप आणि डोळस श्रद्धेने पावन झालेले वातावरण प्रत्येक गणेश मंडळाकडून अनुभवास येणेसाठी गणरायांचा मंगलमय सण शांततेत इको फ्रेंडली साजरा करत पोलीस खाते, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना समाजाने एकसंघ व्हावे, संघटित होऊन लोकांमध्ये एकता आणली जावी हे उद्दिष्ट ठेवले होते तेच आपण विसरत आहोत. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे व पर्यावरणाची होणारी हानी याचा विचार स्वतः करावा. प्रत्येकाला प्लास्टर ऑफ पॅरिस आणि थर्माकोल यामुळे पर्यावरणाची होणाऱ्या नुकसानाची माहिती आहे. मग ती चूक सातत्याने दरवर्षी केली जाते त्यात बदल व्हावा तसेच उत्साहाच्या भरात…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव शहर महानगरपालिकेची मुदत संपली असून आता सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी एका आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनपाचे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार आलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी शहरातील रचना कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून पती व पत्नीला धारदार वस्तून मारहाण करत जखमी करणाऱ्या सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी कांचन नगर परिसरातून ताब्यात घेतले. याबाबत माहिती अशी की, गोपाल मधुकर चौधरी (वय-४८) रा. दत्त मंदिर जवळ, रचना कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बी.जे.मार्केट येथे लोटगाडीवर चिकन विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड, अनिल रसाळ राठोड दोन्ही रा. कांचन नगर, तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी रा.…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात कविता वाचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार करतील. गायन सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्यात येते. वंचित घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सामाजिक सलोखा टिकून राहातो. सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व शासकीय विभागानी क्षेत्रीय स्तरावर समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. महाबळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण विभागाच्या विविध विषय समित्यांच्या जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस.लोखंडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे विविध विभागातील विभाग प्रमुख,…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर २०२३ निमित्त ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ स्पर्धा निसर्गमित्र जळगाव तर्फे आयोजित केली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. भारतात ५ सप्टेंबर २०२० पासून सप्टेंबर महिना हा ‘महा फुलपाखरू महिना ‘म्हणून साजरा करण्यात येतआहे. फुलपाखरे ही उत्तम ‘बायो इंडिकेटर’ समजली जातात. त्यांचे जतन व संवर्धन होणे ही तातडीची गरज आहे. त्यासाठी प्रथम फुलपाखरांचे जीवनचक्र समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही निसर्गमित्र जळगाव तर्फे १५ सप्टेंबर रोजी ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ प्रसारीत करीत असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. प्रश्नमंजुषा ही मराठी व इंग्रजीत सोडवता…

Read More