Author: Saimat

साईमात : जळगाव : प्रतिनिधी येथील गोदावरी संगीत महाविद्यालयात राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा या गोदावरी करंडक राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १७ रोजी करण्यात आले आहे. गेल्या २६ वर्षापासून ही स्पर्धा यशस्वी होत असून यंदा २७ वे वर्ष आहे.बाल गट, किशोर गट, प्रौढ गट अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत बाल गटात (इ. १ ली ते ६वी), किशोर गट (इ. ७ वी ते १२ वी), प्रौढ गट (वय वर्षे ४० पर्यंत) अशी विभागणी केली असून बाल गटातुन प्रथम १००१ रोख बक्षीस, करंडक, प्रमाणपत्र, द्वितीय – ७०१ रूपये रोख, करंडक, प्रमाणपत्र, तृतीय ५०१ रोख करंडक, प्रमाणपत्र…

Read More

साईमात : जळगाव : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका संगीता तळले, स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रमुख वंदना पाटील, मेघा घोरपडे , ज्योती देशमुख या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वेदिका नारखेडे, समृद्धी हलनोर, स्वरा पाटील यांनी केले. हिंदी दिनाचे महत्त्व रिद्धी नगरकर, अंशिता महिरे या विद्यार्थिनीनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हिंदी गीत सादर केले. त्यानंतर हिंदी साहित्यकांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी काही विद्यार्थी संत तुलशीदास,संत कबीरदास मुंशी प्रेमचंद, महादेवी वर्मा अशा हिंदी साहित्यिकांच्या भूमिकेत आले होते. दरम्यान, ३री, ४थी,…

Read More

साईमात : जळगाव : प्रतिनिधी जळगाव खुर्द येथे आरोग्यवर्धिनी केंद्रात आयुष्मान भव मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेऊन साथरोग बाबत माहिती देत जनजागृती करण्यात आली. यावेळी सांसर्गिक आजार सर्वेक्षण (कुष्ठ आणि क्षय रोग) तसेच असंसर्गिक आजार तपासणी (HTN,DM,CA) संशयित तपासणी, गर्भवती माता तपासणी, आदी सर्व लाभार्थी यांची आरोग्य तपासणी व ई संजीवनी (Teleconsultation) करण्यात आली व वेलनेस ॲक्टिविटी अंतर्गत साथरोग (थंडी ताप,मलेरिया,डेंग्यू ,हगवण) विषयी माहिती देत जनजागृती करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. इरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी ग्रामस्थउपस्थित होते. अभियान यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्याधिकारी डॉ. तुषार राणे, आरोग्यसेविका प्रेमलता पाटील,…

Read More

साईमत : रावेर : प्रतिनिधी काँग्रेसच्या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अपघातात झालेल्या मृत्यू बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करत त्याचे कुटुंबियांस शासकीय मदत मिळावी याकरिता प्रहार जनशक्तीच्या वतीने पक्षाचे उत्तर महाराष्टाचे अध्यक्ष अनिल चौधरी याच्या नेतृत्वात रावेर तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना अनिल चौधरी, सुरेश चिंधू पाटील, सचिन महाजन, शुभम महाजन आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रावेर- यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी व काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.१२ सप्टेबर मंगळवार रोजी खिरोदा ते फैजपूर अशी रॅली काढण्यात…

Read More

साईमत धुळे प्रतिनिधी महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले मोफत मिळण्याच्या विषयाला बुधवारी महासभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यामुळे आता हे दाखले मोफत मिळणार आहेत. महापालिकेकडून धुळेकरांना विशिष्ट शुल्क आकारुन जन्म-मृत्युचे दाखले दिले जात होते. परंतु, या प्रक्रियेला उशीर लागत असल्याने नागरिकांना शुल्क देऊनही मनपात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे धुळेकर त्रस्त होते.ही जनभावना लक्षात घेऊन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महापालिकेकडे जन्म-मृत्युचे दाखले कुठलेही शुल्क न आकारता नागरिकांना मोफत द्यावेत, अशी मागणी केली होती. तो विषय बुधवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्या विषयाला महासभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

Read More

साईमत नंदुरबार प्रतिनिधी नंदूरबार : पंतप्रधान किसान संपदा योजनेचा १० कोटींचा निधी कन्या सुप्रिया गावित यांचा फार्मकडे वळवला असून रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटी रुपयांची सबसिडी मिळाली आहे. यामुळे आता मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणीत वाढ होणार असून भाजपमध्ये पण परिवार वाद असली असल्याचं चित्र आता समोर येत आहे. भाजप नेहमी काँग्रेसच्या परिवार वादावरून टीका करत असते. मात्र भाजपमध्ये सुद्धा परिवार वाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या दोन कन्या असून डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार, तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आहेत. या परिवार वादावरून काँग्रेस नेते…

Read More

साईमत धुळे प्रतिनिधी येथील करिश्मा पाकळे सध्या पुणेस्थित पीआयसीटी महाविद्यालयात संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षातील प्रकल्प प्रशिक्षणाच्या कालावधीत तिची आंतरराष्ट्रीय पातळीवरील बारलेक्स उद्योगसमूहाने निवड केली. त्यात तिच्यासह ग्रुपने व्याजदरासंदर्भात बँकिंग सॉफ्टवेअर तयार केले. त्यामुळे प्रभावित बारलेक्स समूहाने तिच्या सॉफ्टवेअरचा स्वीकार केला असून, तिच्या यशाबद्दल प्रशंसाही केली जात आहे. करिश्माने येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकीतील डिप्लोमा शाखेत ९५ टक्के गुण मिळवीत गुणवत्ता सिद्ध केली. या बळावर तिने पुणे येथील नामांकित पीआयसीटी संगणकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला.तिने तिसऱ्या वर्षात ९३ टक्के गुण मिळविले. यानंतर प्रकल्प प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधीत तिची बारलेक्स समूहाने बँकिंग प्रकल्पासाठी निवड केली.यात अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करताना करिश्माच्या गुणवत्तेचे…

Read More

साईमत धुळे प्रतिनिधी महापालिका हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपयांवर खर्चाच्या कामांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात विविध प्रभागातील ३९ कामांचा समावेश आहे. याशिवाय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्ते व क्रॉस ड्रेनेजची दुरुस्ती व आनुषंगिक कामांच्या विषयालाही स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली. महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली.सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. मनपा हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत कामांसाठी आलेल्या निविदादरांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे विषय होते. स्लॅब ड्रेन, रस्ता काँक्रिटीकरण, जॉगिंग ट्रॅक, रस्ता डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्ट्रीटलाइट, पूल…

Read More

साईमत धुळे प्रतिनिधी येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ४६ लाख रुपये खर्चाची जामफळ धरणातून तात्पुरती योजना कार्यान्वित झाली असून, पाणीटंचाईतून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजनेचे नारळ वाढवून उद्‌घाटन प्रभारी सरपंच सविता पाटील यांनी केले. येधे जामफळ धरणातून पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ती पूर्णत्वास येण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार असल्याने तात्पुरती योजना पूर्ण करण्यास आली.सध्या येथे दहा दिवसांआड पाणी मिळते. जामफळ प्रकल्पाच्या कामात दोनपैकी एक जलवाहिनी तोडण्यात आली, तसेच कूपनलिकेचे स्रोत आटल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. ती टंचाई आजही कायम आहे. मात्र आजपासून तात्पुरत्या योजनेचे पाणी मिळण्यास सुरवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.…

Read More

साईमत धुळे प्रतिनिधी येथील गरीब कुटुंबातील शेतकरी निंबा वामन कोळी यांच्या गायीचा लम्पीच्या आजाराने मृत्यू झाला. घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. डॉ. महेश माळी यांनी तपासणी केली असता लम्पीच्या आजाराने मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. गरीब कुटुंबातील निंबा कोळी यांची दोन एकर शेती असून, दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करीत होते. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता.आधीच पावसाअभावी पिकांची स्थिती जेमतेम असताना दुधाळ गायीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले असून, शासस्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी निंबा कोळी यांनी केली आहे. दरम्यान, गावात लम्पीच्या आजाराने मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली असून, भीती निर्माण झाली आहे. लम्पीचे लसीकरण झाले असूनही आजार डोके वर…

Read More