साईमत जळगाव प्रतिनीधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव “युवारंग २०२३” चे आयोजन दि. ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात करण्यात आले आहे. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि केसीई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवक महोत्सव होत असून सहभागी होणा-या महाविद्यालयांना नोंदणीसाठी दि. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर युवारंग लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर संघ नोंदणीची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी यांची स्वाक्षरी घेवून दि. २९ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत आयोजक महाविद्यालयाला प्रत…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनीधी जिल्हयातील व्हाईस ऑफ मिडिया द्वारे पत्रकारांसाठी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आयोजित करण्याबाबत निवेदन जिल्हा परिवहन अधिकारी श्याम लोही यांना व्हॉइस ऑफ मीडिया मुस्लिम विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांनी निवेदन दिले. पत्रकार हा शासनाचा चौथा स्तंभ आहे व वृत संकलनासाठी टू व्हीलर, फोर व्हीलर घेऊन फिरावे लागते त्यामुळे लायसन्स जवळ असणे हे कायदेशीर बंधनकारक आहे. त्यासाठी जळगाव जिल्हयातील संघटनेशी जुळलेले सर्व पत्रकारांचे टू व्हीलर फोर व्हीलर लर्निंग लायसन्स नियमानुसार शासकीय फी भरून कॅम्प घेण्यात येत आहे. त्यासाठी आरटीओ विभागाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स जागेवरती देण्यात येणार असुन जिल्ह्यातील गरजू ज्यांच्याकडे लायसन्स नाही…
साईमत जळगाव प्रतिनिधी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व सुप्रीया पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाच्या वतीने मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबात अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करत आमदार गोपीचंद पडळकर…
साईमत जळगाव प्रतिनिधी शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना,पुन्हा शाळेपर्यंत पोहोचवून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरता मदत करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशा शिक्षणाचा योजना प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जाहीर केली. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, या योजनेतंर्गत सद्यपरिस्थितीत मुख्यत्वे करून ग्रामीण भागात वस्त्या पाड्यांमध्ये,,आदिवासी भागामध्ये, गरीब, गरजू, ग्रामीण, शेतकरी, शेतमजूर तसेच अशिक्षित पालकांची मुले व मुली परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आज कायद्याप्रमाणे शिक्षणाचा अधिकार दिला. तरीही या मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व नसते. म्हणून पिढ्यानपिढ्या ते अशिक्षित राहत आपले आयुष्य ओढत असतात. त्यांचे आयुष्य चांगले करायचे असेल, तर त्यांच्या नवीन पिढ्यांना शिक्षण देणे, शिक्षित करणे हेच करे समाजकारण…
साईमत जळगाव प्रतिनिधी आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव संचलित फकिरा हरी लेवा बोर्डिंग हाऊस, जळगावच्या वतीने वसतीगृहात विद्यार्थिनींनी उत्साहात बाप्पा ची स्थापना केली हा गणेशोत्सवाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. आकर्षक गणेश मुर्तीसोबतच विद्यार्थिनींनी तयार केलेले चंद्रयान-3 चे डेकोरेशन मुख्यत: आकर्षणाचे केंद्र ठरले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी एस. राणे यांच्या हस्ते गणेश वंदना करून गणेशोत्सवाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, मुलींनी सुध्दा गणेशाकडून प्रेरणा घेऊन समाजात आपले उच्च स्थान निर्माण केले पाहिजे. समाजात वाढणाऱ्या कुप्रथा, रूढी यावर मात केली पाहिजे. त्यानंतर मंत्रोच्चारात गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी लेवा एज्यूकेशनल युनियन, जळगावचे प्रशासकीय अधिकारी सतीश…
साईमत जळगाव प्रतिनिधी मनातील विचारांना आकाराचे रूप देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्तीची अनेक रूपे साकारून आपल्यातील अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. निमित्त होते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए विभागातर्फे आयोजित “इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा” म्हणजेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धेचे. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या कनिष्ट महाविद्यालयातील सभागृहात हि दोन दिवसीय स्पर्धा पार पडली. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि, बीसीए विभागाचे कौतुक अश्यासाठी कि त्यांनी या युवकांना पर्यावरणाचे धडे दिले. कारण भविष्यात त्यांच्याच खांद्यावर देश घडविण्याची जबाबदारी आहे. आणि अश्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात आज मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते श्रीं ची स्थापना झाली. याप्रसंगी गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव, दु:ख दूर कर, निरोगी आरोग्य प्रदान कर अशी प्रार्थनाही करण्यात आली. रुग्णांनी देखील गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन गणेशोत्सवात सहभाग नोंदविला. दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात नर्सिंग ऑफिसच्या समोर आज गणपतीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्यासह चिमुकल्या किवा व सारा पाटील यांची विशेष उपस्थीती होती. सुंदर, आकर्षक सजावट करण्यात आली. याप्रसंगी विधीवतपणे श्री…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा-सुश्रृषा करणार्यांनी विद्यार्थ्यांनी यंदाच्यावर्षी ग्रामीण संस्कृतीचे वर्णन दाखविणारा हुबेहुब असा आकर्षक देखावा साकारला असून गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील व सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आज गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून पाच दिवसांचा गणेशोत्सव येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या गणेशोत्सवास आज प्रारंभ झाला असून प्रवेशद्वारापासून आपण मंदिरातच जात आहोत अशी सुंदर सजावट विद्यार्थ्यांनी केली आहे. ग्रामीण भागातील संस्कृतीची अभ्यास करत एक एक सर्वच गोष्टी देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.स्वाती गाडेगोने व श्री पंकज (पती) यांच्याहस्ते गणपती बाप्पाची स्थापना…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दि. १९ सप्टेंबर रोजी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत केले. गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाविद्यालयातील अतुल खोंडे यांनी सपत्नीक केली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील (डी एम कार्डिओलॉजी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (तंत्रनिकेतन समन्वयक) यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. महाविद्यालयामध्ये हा गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवा निमित्त महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये दिनांक २०…