साईमत जळगाव प्रतिनिधी
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व सुप्रीया पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाच्या वतीने मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याबात अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, वाल्मिक पाटील, अल्पसंख्यांक् विभाग जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, राजू मोरे , किरण राजपूत, राजा मिर्झा, सबाज तडवी, अकील खान, चेतन पवार, हितेश जावळे, आकाश हिवाळे, खलील शेख, विनोद धमाले, मयूर पाटील,नईम खाटीक, रहीम तडवी, राहुल टोके, बशीर भाई, अकील पटेल, सुहास चौधरी, प्रमोद पाटील, संजय चव्हाण, चंद्रकांत चौधरी, अप्पा मराठे, गणेश सोनार आदी उपस्थित होते.