जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ उत्साहात

0
4

साईमत जळगाव प्रतिनिधी

आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या

या स्पर्धा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.

स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चोपडा, दोंडाईचा, धुळे, अकोला, बुलढाणा, खामगाव, मालेगाव, अमरावती या शहरा मधून २२४ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रिडा संघ चे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर मनोज आडवाणी, शिल्पा इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर चे राजकुमार मुनोत, श्यामली मॅट्रेस चे चंद्रकांत चौधरी, जळगाव जिल्ह्याचे पहिले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सुनिल रोकडेजिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, सदस्य शेखर जाखेटे , मुख्य पंच चेतना शाह उपस्थित होते.

स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून चेतना शाह , पंच म्हणून वलिद शेख, सुफियान शेख, साद मलिक, ओजस सोनवणे, देवेश पाटील, गीता पंडित, शुभम चांदसरकर, देव वेद, प्रणेश गांधी, करण पाटील, अर्श शेख, रौनक चांडक यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात दिपिका ठाकूर, मो. हमजा खान, पुनम ठाकूर, राखी ठाकूर, सुमिती ठाकूर, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील, कृष्णन घुमलकर, ईशांत साडी, ओम अमृतकर यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया व गीता पंडीत यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, मनोज आडवाणी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here