साईमत यावल प्रतिनिधी यावल – भुसावळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने परिसरातील वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काम सुरु करतांना वाहनधारकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वापर करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावल – भुसावळ रस्त्यावर यावल शहराजवळ सुमारे १ ते २ किलोमीटर अंतराचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. बांधकाम सुरू करताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या साईट पट्ट्यावर मुरूम खडी आदीचा भराव टाकून वाहनधारकांसाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे होती, मात्र मक्तेदाराने या सर्व बाबींकडे…
Author: Saimat
साईमत भुसावळ प्रतिनिधी ज्ञान हाच सदाचार आणि सदाचार हेच ज्ञान असे मानून दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील सर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाला आहे. शिक्षकांच्या जीवनात पुरस्काराचे खूप महत्त्व असते. डॉ. जगदीश पाटील सरांसारख्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षकाला राज्य पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी केले. भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात डॉ. जगदीश पाटील सर गुणगौरव समितीतर्फे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात श्री. पिंगळे बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शालता महाजन होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शारंगधर महाराज, सुरेश महाराज, लक्ष्मण महाराज,…
साईमत जळगाव प्रतिनीधी अजिंठा आर्ट सोसायटी जळगाव व नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन धी शेंदुर्णी संस्थेचे सचिव सतिष काशिद यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धी शेंदुर्णी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड , पु्.ना.गाडगीळचे शाखा मॅनेजर संदिप पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील हे उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनात पेन्सील माध्यमाचे गणपती चे आकर्षक ड्राईंग व पेंटींग, पोस्टर कलर माध्यमाचे पेंटींग तसेच निसर्गचित्र, वारली पेंटींग अशा विविध माध्यमाची व शैलीची एकुण 60 पेंटींग आहेत. सदर चित्रकला प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असुन 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.…
साईमत जळगाव प्रतिनीधी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे निमित्ताने दिनांक २० सप्टेंबर बुधवार रोजी शिवाजी नगर परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक १ येथे नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा भाग म्हणून रात्र शाळा भेट करण्यात आली. रात्र शाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आय.ए.एस प्रशिक्षणार्थी श्री. अर्पित यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहायुक्त अभिजीत बाविस्कर, मनपा प्रशासनाधिकारी दिपाली पाटील, मुकेश सर व त्यांचे सदस्य टीम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.विद्या गायकवाड प्रशासक तथा आयुक्त जळगाव मनपा यांचे अधिपत्याखाली करण्यात आले. १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना शिक्षण देणे ज्यांच्याकडे वाचन आणि लेखन कौशल्ये नाहीत, तसेच जे विविध कारणांमुळे १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण…
साईमत नाशिक प्रतिनीधी संत गाडगेबाबा सामान्य लोकात काम करणारे संत होते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा जप केला. स्वच्छतेबाबत त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे विभाग स्तरावरील पुरस्काराचे वितरण प्रसंगी बोलत होते. विभाग स्तरावर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी एक व कोरोना कालावधी असल्याने सन २०२०-२१ २०२१-२२ या दोन वर्षाची एक राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…
साईमत जळगाव प्रतिनीधी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाच्या वतीने बुधवारी २० सप्टेंबर रोजी आकाशवाणी चौकात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. याबात अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ बुधवारी २० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पवार व महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिनांक…
मुंंबई साईमत प्रतिनिधी कथित बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यानंतर कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. अमोल किर्तीकर हे ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्ती मानले जातात.आर्थिक गुन्हे शाखेकडून अमोल किर्तीकर यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांंचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, नियोजन विभागाचे तत्कालीन सहआयुक्त, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंट राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार, कर्मचारी आणि स्नेहा कॅटरर्स, बीएमसीचे अधिकारी आणि…
साईमत जळगाव प्रतिनीधी जळगाव डाक विभागातील कर्मचारी व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे बॅडमिंटन खेळाडू अतुल प्रकाश ठाकूर यांची डाक विभागातर्फे नागपुर येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. त्यांना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील संघ रायपूर (छत्तीसगड) येथे नोव्हेंबर 2023 मध्ये होणार्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होईल. त्यांच्या यशाबद्दल डाक विभागाचे अधीक्षक एस. एस. म्हस्के, सहाय्यक अधीक्षक एम. एस. जगदाळे व सर्व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
साईमत जळगाव प्रतिनीधी येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित मानवी शरीरातील विविध अवयव आणि त्यांची कार्ये याविषयक माहितीपर प्रदर्शनीचे गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश स्कूल भुसावळ आणि सावदामधील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना मोठे कुतुहल असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी मानवी शरीरातील विविध अवयवांची माहिती जाणून घेतली. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित मोरया -२०२३ अंतर्गत अॅनाटॉमी विभागातर्फे एक दिवसीय मानवी अवयवांचे प्रदर्शन या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी अॅनाटॉमी विभागाच्या प्रमुख…
साईमत जळगाव प्रतिनीधी गोदावरी सीबीएसई स्कुलमध्ये श्री गणेशाची स्थापना विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. गोदावरी स्कुलने चांद्रयान ३ ची आरास केली आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. दुपारी ४ वाजता स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विधिवत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा उपयोग करून उत्कृष्ट असे चांद्रयान -३ मोहीम साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.