गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल मध्ये चांद्रयान-३ची आरास

0
2

साईमत जळगाव प्रतिनीधी

गोदावरी सीबीएसई स्कुलमध्ये श्री गणेशाची स्थापना विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. गोदावरी स्कुलने चांद्रयान ३ ची आरास केली आहे.

ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. दुपारी ४ वाजता स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विधिवत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा उपयोग करून उत्कृष्ट असे चांद्रयान -३ मोहीम साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here