यावल – भुसावळ रस्त्याची दुर्दशा वाहनधारकांचे हाल ; संबंधित यंत्रणा गप्प ?

0
3

साईमत यावल प्रतिनिधी

यावल – भुसावळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने परिसरातील वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काम सुरु करतांना वाहनधारकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वापर करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यावल – भुसावळ रस्त्यावर यावल शहराजवळ सुमारे १ ते २ किलोमीटर अंतराचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. बांधकाम सुरू करताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या साईट पट्ट्यावर मुरूम खडी आदीचा भराव टाकून वाहनधारकांसाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे होती, मात्र मक्तेदाराने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत असून याबाबत संबधित यंत्रणाही लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.
या रस्त्याने अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. नियमित वर्दळ असते सर्व प्रकारच्या वाहनधारकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भुसावळ कडून यावल कडे येणारा एक ट्रक साईट पट्ट्यांवर अडकल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणी येत होत्या . वाहनधारकांची पर्यायी रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित न केल्यामुळे संबंधित यंत्रणा नागरिकांचे वाहनधारकांचे हाल करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु, या रस्त्याला दोन ते तीन फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच गाडी चालवताना खड्डे चुकवताना अपघात होण्याचा धोका वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here