संत गाडगेबाबा सामान्य लोकात काम करणारे संत – राधाकृष्ण गमे

0
32

साईमत नाशिक प्रतिनीधी

संत गाडगेबाबा सामान्य लोकात काम करणारे संत होते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा जप केला. स्वच्छतेबाबत त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे विभाग स्तरावरील पुरस्काराचे वितरण प्रसंगी बोलत होते.

विभाग स्तरावर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी एक व कोरोना कालावधी असल्याने सन २०२०-२१ २०२१-२२ या दोन वर्षाची एक राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (विकास) उज्वला कोळसे, सहाय्यक आयुक्त (विकास) मनोज कुमार चौधर उपस्थित होते.

राधाकृष्ण गमे म्हणाले की, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरु झाले यावरुन देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली त्याच बरोबरीने रोजगार हमी योजना आणि इतरही अशा अनेक योजना आहेत,ज्या महाराष्ट्रात सुरु झाल्या आणि आता त्या देशपातळीवर राबविण्यात येत आहेत. तसेच स्वच्छता अभियान हे राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये सातत्य राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाचे सर्वांनी पालन करावे आणि प्रत्येकाने आपला गाव, परिसर शहर स्वच्छ ठेवावे.
विभागीय आयुक्तांनी सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीचे धनादेश, सम्मान चिन्ह व प्रमाणपत्र वाटप करुन गौरविले. पुरस्कार कार्यक्रमासाठी पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित तालुक्याचे पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा आयुक्त (विकास) मनोज चौधर यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी देशपांडे व आभार प्रदर्शन अनिल राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here