Author: Saimat

साईमत मलकापूर प्रतिनिधी भुसावळ मंडळ मध्य रेल्वेच्या वतीने दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्या अंतरर्गत मलकापूर शेतकरी संघटना व मलकापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मलकापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक डि.व्ही.ठाकुर यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्टेशन प्रबंधक व्ही.डी.ठाकुर, स्टेशन उप प्रबंधक व्ही.डी.खेवलकर , स्वास्थ्य निरीक्षक संतोष गिरी , सि.जी.एस आर.पी.चौधरी, सफाई कर्मचारी अनीलजी डागोर सह अन्य रेल्वे कर्मचारी बाधावांनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख दामोदर शर्मा, युवा आघाडी जिल्हा प्रमुख रणजित…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी येथील सर्वोदय गणेश मंडळाला सलग ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवार दि.२२ रोजी फैजपूर येथील संजीवनी ब्लड सेंटर व यावल येथील सर्वोदय गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले, या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज करण कर, उपाध्यक्ष दिलीप वाणी, सचिव मंदार गडे, प्रमोद गडे, संजय गडे,बाळकृष्ण गाजरे, डॉ. योगेश गडे, डॉ. धीरज पाटील, पांडुरंग नेरकर, डॉ. निलेश गडे, माजी नगरसेवक जगदीश कवडीवाले, गणेश खर्चे, दिलीप गडे, गणेश खलसे, सुनील मोरे, तेजस गडे, हितेश देशमुख,आयुष वाणी, शुभम गडे, श्रीनंद गडे, अथर्व नागराज, देवा बडगुजर, तुषार गडे, पिंटू मोरे, राजेश श्रावगी…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील जवळपास सर्व रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यात मुख्यता बोदवड -जामठी या मुख्य रस्त्याची अवस्था तर पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या खड्डामय रस्त्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.\या बाबीकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करून रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अतिशय महत्त्वाचा असणारा जामठी ते बोदवड रस्ताची जणु चाळणी झाली आहे.. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. तसेच लगतच्या दहा ते पंधरा गावातील नागरिकांची याच मार्गाने वाहतूक होत असते. अशा या सततच्या वर्दळीच्या रस्त्याची अवस्था सद्यस्थितीला पाहण्याजोगी झाली आहे. रस्त्यावर इतके मोठ्या…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील जामठी परीसरात शुक्रवारी ढगसदृश्य पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जामठीसह परिसरात धुमाकूळ घातला आहे. जामठी, लोणवाडी, येवती, रेवती, धोंडखेडा, कुर्हा हरदो अश्या अनेक गावात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. दरम्यान, लोणवाडी गावात अनेक घरात पाणी शिरलं आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. लोणवाडीतील 20 घरं पाण्याखाली गेले आहेत. घरात पाणी शिरल्यानं सर्व संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले असून, मोठं नुकसान झाले आहे. लोणवाडीत पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले. या परिसरात शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. पावसाचा शेतकऱ्यांना फटका जामठीसह…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी कोरोना काळात बोदवड रेल्वे स्थानकावर थांबा असलेल्या प्रवाशी रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द केला होता. या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून काही दिवसापूर्वी राष्ट्रीय विकलांग पार्टीने रेल रोको आंदोलन केले होते,मात्र आजतागायत रेल्वे दखल न घेतल्याने रेल्वे प्रशासनास पुन्हा निवेदन देत मागील आंदोलनाचे स्मरणपत्र दिले आहे. दरम्यान मागण्या पूर्ण ना झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सेवाग्राम एक्सप्रेस व सुरत – अमरावती एक्सप्रेस चा अप डाउन चा थांबा येथील स्थानकावर मिळावा भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी भुसावळ – नागपूर सवारी गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी. या मागण्यासाठी यापूर्वी 9 ऑगस्ट ला राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या…

Read More

साईमत वरणगाव प्रतिनिधी शहरात गेल्या काही दिवसांपासून टारगंटाचा उपद्रव चांगलाच वाढला असुन टारगंटाकडुन शालेय विद्यार्थींनीचा विनयभंग करण्याचे प्रकार वाढले आहेत . तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात पिडीतांच्या तक्रारीवरून १५ दिवसांत तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . यामुळे पोलीसांनी अशा टारगटांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहरातील महात्मा गांधी विद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय ( सिध्देश्वर नगर ), गं. सां माध्यमिक अशा विद्यालयांमध्ये शहर व ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थींनी शालेय शिक्षण व खाजगी क्लासेससाठी येणे – जाणे करतात . यामुळे शालेय कालावधीत विद्यार्थी व विद्यार्थींनीचा मोठा राबता असतो . मात्र, याचाच काही टारगट ( रोडरोमिओ ) मुले गैरफायदा घेत शालेय…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत जि.प.म.उ.प्रा.शाळा, मोमीनाबादची विद्यार्थिनी सुरेखा वाघोदे हिने तालुक्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. छत्रपती शाहू महाराज ह्यांचे शैक्षणिक कार्य ह्या विषयावर नांदुरा तालुक्यातून प्राप्त निबंधांमधून सुरेखा वाघोदे ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून मोठ्या प्रमाणात तिचे कौतुक होत आहे. रोख स्वरूपाचे बक्षीस तिच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम राणे, रामेश्वर तायडे, सुधीर भंगाळे, सुरेश तायडे यांचे मार्गदर्शन मिळाले. याबद्दल तिचे गावचे उपसरपंच महेंद्र गवई , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रावण दांडगे तसेच गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अधिकारी – कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. कार्यालयात पूर्णवेळ थांबून गतीने काम केल्यास प्रलंबित प्रकरणांचा निपटारा त्वरित होईल. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोदवड तालुका प्रशासनाच्या आढावा बैठकीत शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी दिल्या. बोदवड तहसील कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार मयूर कलासे, गटविकास अधिकारी श्रीकांत इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले , मतदान‌ केंद्राच्या दुरूस्ती बाबत जिल्हा परिषदेमार्फत डीपीडीसी मार्फत प्रस्ताव पाठविण्यात यावेत. बीएलओनी मतदारकार्ड व आधारजोडणी कार्यक्रमाची…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी बोदवड शहर‌ स्वच्छ झाले पाहिजे.‌ प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी.‌ यासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेचा आदर्श घेत बोदवड मध्ये खोपोली पॅटर्न राबवावा,अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. बोदवड नगरपंचायत कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी नगरपंचायत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी गजानन तायडे, तहसीलदार मयुर कळसे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, तालुक्यात‌ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात यावा.कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प तयार करण्यात यावा.‌ओला व सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषदेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून यावल शहरातील शहराच्या मध्यवर्ती भागात टी पॉईंट येथे यावल नगरपरिषद व आदिवासी मुलींचे वस्तीगृह यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता पर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी शहरातील स्वच्छता संदर्भात महत्व पटवून देण्यात आले.व घरातील कचरा सुका व ओला वेगळा करून द्यावा. प्लास्टिक पिशवी मुक्त शहर हगणदारी मुक्त शहर कसे होईल याचे महत्व सांगितले. सदरचा उपक्रम नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियंता सत्यम पाटील, आरोग्य निरीक्षक नितेश चांगरे, शहर समन्वयक स्नेहा रजाने, मुकादम शेख मोबीन, प्रभारी मुकादम दिलीप बारसे व विभागातील सफाई कर्मचारी व इतर समाजसेवक व नागरिकांचा सहभाग…

Read More