Author: Saimat

साईमत मलकापूर प्रतिनिधी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात दि.२५ सप्टेंबर रोजी खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात रूट मार्च आयोजन करण्यात आले. सदर रूट मार्च मलकापूर शहर पोलीस स्टेशन, तहसील चौक, चार खंबा चौक, आठवडी बाजार, निमवाडी चौक, गांधी चौक, छोटा बाजार चौकी, नसवाला चौक, लखानी चौक, बाजीप्रभू नगर, संताजी मंगल कार्यालय, अब्दुल हमीद चौक, चांडक विद्यालय, गाडगे महाराज टी पॉइंट, हनुमान चौक, तहसील चौक व पुन्हा पोलीस स्टेशन अशा रस्त्याने काढण्यात आला. एसडीपीओ मलकापूर, पोलीस निरीक्षक मलकापूर शहर, पोलीस निरीक्षक आरटीपीएस अकोला, असे १४ पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण, एमआयडीसी, पोलीस स्टेशन…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी नगर परिषद मलकापूर द्वारा “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्याकडून एक मुठ माती अमृत कलश मध्ये जमा करण्यात आली. नगर परिषद मलकापूरच्या “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळेमधून तसेच न. प. मराठी प्राथ. शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल, गो. वि. महाजन विद्यालय, हिराबाई संचेती कन्या विद्यालय, झेड. ऐ उर्दू हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरून तुळशी वृदांवनातील एक मुठ माती मृत कलशामध्ये टाकून हुतात्म्यांच्या सन्मानार्थ व देश भक्तिची भावना जोपासल्या. यावेळी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

साईमत यावल प्रतिनिधी तालुक्यातील दोनगाव येथील ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दोनगाव येथे बळीराम अरूण पाटील (वय-३७) हा तरूण वृध्द आईवडीलांसह वास्तव्याला होता. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या वरील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. लग्न होत नाही या नैराश्येतून तरूणाने गळफास घेतल्याचे परिसरातून चर्चिले जात आहे. बळीराम हा अरूण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. याबाबत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात केळी पिक मोठ्यप्रमाणात घेतले जाते. परंतु सध्या पावसाचा दीर्घ खंड सोबतच उष्ण व आर्द्रतायुक्त हवामानामुळे केळी पिकाच्या पिलबागा, कापणीवरील नवती बागांवर बुरशीजन्य सिगाटोका करप्याने विळखा घातला आहे. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडला आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता करपा निर्मूलनासाठी पूर्वीचे पॅकेज पूर्ववत करून नवीन पॅकेज मंजूर करावे यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. यंदा प्रथमच करप्याची भीषण लाट उसळली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४५ हेक्टर केळी बागांवर करप्याने विळखा घातला आहे. यात दोन – तीन महिन्यांच्या केळी बागांसह,…

Read More

साईमत नांदुरा प्रतिनिधी नांदुरा तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य परिस्थीतीमुळे शेतपीक व पशुधनाची प्रचंड हानी झाली आहे. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या आशयाचे निवेदन नांदुरा तहसीलदार यांना देण्यात आले. नांदुरा तालुक्यात २३ सप्टेंबरच्या रात्री ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नदी नाले एक झाले व लोणवाडी या गावातील अमोल भीमराव सोळंके यांचा १ बैल, २ म्हशी मृत झाल्या व ३ म्हशी बेपत्ता झाल्या, शत्रुघ्न वामनराव सोळंके यांच्या १ गाय, १ गोरा व १ वासरी मृत पावली व ३ गायी पुरात वाहुन गेल्या, अवचितरावं त्र्यंबकराव सोळंके…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेनतून विद्येचे अधिपती असलेल्या गणरायांची आराधना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडी तर्फे श्री गणेशा शिक्षणाचा – एक विद्यार्थी एक कार्यकर्ता या घोषवाक्या खाली विद्येची देवता श्री गणेशा च्या उत्सवात शिक्षणा पासून वंचीत उपेक्षितांना विद्येच्या मंदिरात पाठवण्यासाठी श्री गणेश विद्या अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात शाळा बाह्य मुलांना परत शाळेत प्रवेश मिळवून देण्यात येत आहे. ॲड रोहिणी खडसे यांनी आवाहन केल्या नुसार या अभियाना अंतर्गत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ता आपल्या आजूबाजूच्या वस्त्या पाड्या , झोपडपट्टी व परिसरातील प्राथमिक शिक्षण सोडलेल्या किंवा शाळेत प्रवेश न घेतलेल्या मुलांचा शोध…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. जो तो आपापल्या परीने हा महोत्सव साजरा करीत आहेत. यानिमित्ताने रोटरी जळगाव रॉयल्स व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम करण्यात आला. शिक्षणा करीता लांब लांब पर्यंत पायी जाणं येणं करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना सायकलस वाटप करण्यात आल्या. जेणे करून त्यांचा वेळ वाचेल व तो वेळ त्या अभ्यासाला देऊ शकतील. पंचरत्न गणेश मंडळ, नवी पेठ येथील सोहळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ चे अध्यक्ष सचिन नारळे व सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते शिवाजी नगर येथून नूतन मराठा महाविद्यालयात पायी जाणाऱ्या कु. जागृती किरण सोनार हिला एक सायकल तर नेहरू चौक मित्र…

Read More

साईमत रावेर प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कार्य करीत आहे. समाजात उपेक्षित घटक असलेल्या दिव्यांग बांधवांच्या जिवनात प्रकाश आणण्यासाठी कार्य मोदींनी केली आहे.त्या़ंच्यामुळे दिव्यांग बांधवांना मिळालेल्या या साहित्या सहाय्याने आत्मनिर्भर जिवन जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त “सेवा साप्ताह ” अंतर्गत भारत सरकार एडीआयपी योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार अंतर्गत दिव्यांग बांधवांना निःशुल्क साहायक उपकरण वितरण पसंगी खा. रक्षाताई खडसे रावेर येथे बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी मंत्री आमदार सजंय सावकारे, आमदार शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरातील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोदवड व मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरातील शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तालुक्यातील बोदवड, मोरझीरा, धामणगाव, मधापुरी येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. बोदवड येथे रस्त्यावरील नाल्याचे पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजूच्या शेतात शिरल्याने शेतजमीन खरडून गेली असून, शेतकऱ्यांचे…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप नरोत्तम महाजन ( वय ४५ ) रा.साथी बाजार नशिराबाद ता.जळगाव हे रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान शेतातील कामासाठी बैलगाडी घेऊन जात असताना बैल अचानक त्यांच्या वाड्याकडे घुसल्याने संदीप महाजन हे बैलगाडी वरुन पडले असता त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालय जळगाव येथे दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. संदिप महाजन हे सुनसगाव येथे बीएलओ म्हणून काम पाहत होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते त्यांचा…

Read More