साईमत जळगाव प्रतिनिधी
गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते निर्माल्य संकलनाला सुरुवात झाली.
शहरातुन ३२ ट्रॅक्टर, २ डंपर , ८ घंटागाड्याच्या मदतीने १११२ श्री सदस्यांनी ७६ टन निर्माल्य संकलन करण्यात आले, मन्यारखेडा परिसरातून ६ ट्रॅक्टरमधून ७६ श्री सदस्यांनी १२ टन निर्माल्य संकलन केले, सावखेडा पिंप्राळा परिसरातून १ ट्रॅक्टरच्या मदतीने ३५ श्री सदस्यांनी २.५ टन निर्माल्य संकलन केले. स्वयंसेवक, गणेशभक्त व श्री सेवकांमार्फत निर्माल्य संकलन केले जात होते.
मेहरुण तलावातील गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, शिवाजी उद्यान, सागर पार्क, चंदूअण्णानगर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधी कॉलनी, नेरी नाका आदी ठिकाणी ५ ते २० श्री सदस्य होते. शिवाय, महापालिकेचे डी-मार्ट, काव्यरत्नावली चौक, सिंधी कॉलनी, आकाशवाणी चौक, कोर्ट चौक, सुभाष चौक या भागांत निर्माल्य संकलित केले गेले. महापालिकेचे कर्मचारी, कामगार, मुकादम, आरोग्य निरीक्षकांसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाची वाहने होते. गणेशोत्सवाच्या काळात गणरायाला वापरण्यात आलेल्या फळा – फुलांचे निर्माल्य भाविक गणपती विसर्जन करताना नदी पात्रात टाकत असतात. त्यामुळे नदी पात्र व पाणी प्रदूषित होते.ही बाब टाळण्यासाठी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता दूत पद्मश्री डॉ.आपासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात गणपती विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.