साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावसह देशभरात गुरुवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील मेहरुण तलाव परिसरात विसर्जनानंतर झालेली घाण, विखुरलेले निर्माल्य संकलन करून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य नेहरू केंद्र जळगावतर्फे करण्यात आले. उपक्रमासाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे सहकार्य लाभले. जळगाव शहरातील मेहरुण तलावात शहरासह परिसरातील सर्व लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असते. गुरुवारी तलावात गणेश मूर्ती विसर्जन करताना अनेकांनी निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा तलाव परिसरातच टाकला होता. तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी जळगाव शहर मनपातर्फे विविध संस्थांना निवेदन पाठविण्यात आले होते. भारत सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मेहरुण तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात…
Author: Saimat
साईमत मुंबई प्रतिनिधी स्वच्छ भारत पंधरवड्यानिमित्त दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) थीम “कचरामुक्त भारत” उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. पंधरवडयानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यांचाच एक भाग म्हणून “01 तारिख, 10 वाजता, एक घंटा,” दि.01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वा राज्यातील प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे 56,786 उपक्रमांचे ग्रामीण भागात नियोजन करण्यात आले असून महाश्रमदानाकरिता सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले आहे. सदर पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी,बारावी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सभेसाठी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापकवृंद तसेच अकरावी,बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात शिक्षक प्रियांका मल व संदीप पाटील यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. यानंतर प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी अकरावी,बारावी वर्गातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सायन्स व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच शिक्षकांसोबत पालकांची…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.या वेळेस उपक्रमाचे सातवे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, पेंसील, वह्या, पेन, रंगपेटी, पट्टी, खोडरबर या वस्तुंचा समावेश आहे. निरंतर पाच दिवसापासून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा पिळोदे बु तालुका यावल येथे करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात भुसावळ तालुक्यातील प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा येथून झाली, त्यात नंतर मांगी तालुका रावेर जिप शाळा, भुसावळ तालुक्यातील जिप शाळा खेडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत…
साईमत जळगाव प्रतिनिधी पारंपारिक आणि आधुनिक शिक्षण पध्दत यात नवनविन संकल्पना आल्यामुळे आशादायी व स्थिर फरक निर्माण झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करतांना अत्यंत खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो. शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमानेच यशस्वी डॉक्टर घडत असल्याचे प्रतिपादन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. एन.एस. आर्विकर यांनी केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागातर्फे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यात प्रथमच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचा समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या सुरूवातीला डिन एन.एस.आर्विकर यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संघातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष मनपा क्षेत्र शालेय खो – खो स्पर्धेत सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालयाने आर. आर. विद्यालयावर चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय संपादन करून नाशिक विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. विद्यालयातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशासाठी संस्था अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे, संचालिका डॉ. अमृता सोनवणे, मुख्याध्यापक आर.पी.खोडपे, गुलाबराव पाटील, शिक्षक पालक संघाच्या छाया फिरके, सुनीता खोंडे आदींनी अभिनंदन करत विभागीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अनिल माकडे…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उर्वरित जिल्हा १४,१७,१९वर्ष मुले व मुलीच्या आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेमध्ये डोणगाव, धानोरा, अमळनेर, कुरवेल येथील संघानी अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथमच विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. धानोरा येथील झि. तो. म. माध्यमिक विद्यालयाने १७ वर्षे मुले, १४,१९ वर्षे मुलींच्या गटात यश संपादित केले आहे. इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल डोणगाव येथील शाळेने १४ वर्षे वयोगटात अटीतटीच्या अतिंम सामन्यात बारी समाज माध्यमिक विद्यालयावर विजय मिळविला व विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली . १९ वर्षे…
साईमत जळगाव प्रतिनिधी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा संकुल येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या बळावर विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या विशाल ज्ञानेश्वर पवार व सुमेध सुशांत पाटिल या दोघा विद्यार्थ्यांची विभागीय निवड चाचणी स्पर्धेत निवड होवून पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेसाठी राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडुचे शालेय व्यवस्थापन मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटिल , ज्येष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख राजेंद्र पाटिल, सूर्यकांत पाटिल, सर्व क्रीड़ा शिक्षक यांनी अभिनंदन केले. दोघा विद्यार्थ्यांना राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक क्षितिज सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
साईमत भुसावळ प्रतिनिधी माणुसकीच्या बिजाला दातृत्वाचे धुमारे फटतात तेंव्हा… दोन घासांच्या रंगी,‘ अवघा रंग एक कसा होतो; याची शब्दश: प्रचिती दरवर्षीप्रमाणे यंदाही भुसावळात आली. निमित्त होते, गणेश विसर्जनाच्या दिवशी साईभक्त पिंटू कोठारी यांच्याकडून भाविकांसाठी आयोजित महाभंडाऱ्याचे. अक्षरश: कुणीही या आणि जेवून जा, या शब्दांची प्रचिती देणारा हा महाभंडारा यंदाही भुसावळकरांनी मर्मबंधातल्या ठेवीसारखा भक्तीपूर्ण अंत:करणात आराधनेने ओथंबून राहावा, असा जपून ठेवला आहे. भुसावळच्या साई मंदिरांच्या विश्वस्तांपैकी एक आणि प्रथितयश व्यापारी पिंटू कोठारी यांची साईभक्ती सर्वश्रूत आहेच. माणुसकी म्हणून अगदी कुणी अनोळखी आला तरी त्याच्यासाठी आपल्या मनाचा हळवा कोपरा कायम मोकळा ठेवणारा, आहे त्या परिस्थितीत अन् शक्य त्या मदतीला नेहमी उभा राहणारा…
साईमत जळगाव प्रतिनिधी गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते निर्माल्य संकलनाला सुरुवात झाली. शहरातुन ३२ ट्रॅक्टर, २ डंपर , ८ घंटागाड्याच्या मदतीने १११२ श्री सदस्यांनी ७६ टन निर्माल्य संकलन करण्यात आले, मन्यारखेडा परिसरातून ६ ट्रॅक्टरमधून ७६ श्री सदस्यांनी १२ टन निर्माल्य संकलन केले, सावखेडा पिंप्राळा परिसरातून १ ट्रॅक्टरच्या मदतीने ३५ श्री सदस्यांनी २.५ टन निर्माल्य संकलन केले. स्वयंसेवक, गणेशभक्त व श्री सेवकांमार्फत निर्माल्य संकलन केले जात होते. मेहरुण तलावातील गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, शिवाजी उद्यान, सागर पार्क, चंदूअण्णानगर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधी कॉलनी, नेरी नाका आदी ठिकाणी…