Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ व युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव हे शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सकाळी १०.३० वा. युवासेना आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे जी. एच. रायसोनी महाविद्यालय येथे उद्घाटन, दुपारी १२ वा. शासकीय तंत्रनिकेतन येथे युवासेना कॉलेज कक्ष युनिटचे उद्घाटन, दुपारी २ वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे कुलगूरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा, सायंकाळी ५.३० वा. जिल्हास्तरी बास्केटबॉल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला शहरातील गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्‍न आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला असून मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या संदर्भात राज्य पातळीवरील निर्णय घेण्यात आला. यांच्या माध्यमातून गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून व्यापार्‍यांना आता दिलासा मिळाला आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार, सुधारित महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मालमत्ता भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण व भाडेपट्ट्याचे नुतनीकरण) नियम, २०२३ मध्ये निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक,…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने फुट पडली आहे.त्यांचे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले असून याप्रकरणी आज(शुक्रवारी)सुनावणी झाली.या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते.दोन तास ही सुनावणी चालली. सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी, अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला असल्याचा दावाही सिंघवी यांनी केला आहे. अभिषेक सिंघवी म्हणाले की, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन मुद्दे उपस्थित केले. पहिला म्हणजे आमची बाजू ऐकून न घेता पक्षात वाद असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असू शकतो.त्यामुळे आधी आमची बाजू ऐकून घ्या…

Read More

हांगझोऊ : वृत्तसंस्था चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. फायनल मॅचमध्ये भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास यांनी गोल केले. फायनलमध्ये भारताने जपानवर ५-१ असा विजय मिळवत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. या विजयासह हॉकी संघाने २०२४ साली होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी प्रवेश मिळवला आहे तर भारताच्या पदकांची संख्या ९५वर पोहोचली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हॉकीमधील हे चौथे सुवर्णपदक आहे.याआधी भारताने १९६६, १९९८, २०१४ साली सुवर्ण जिंकले होते.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार (वय ३८) यांना जळगाव एसीबीच्या विभागाने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी फोन पेवर पवार यांनी १५ हजारांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार ५१९ टक्केप्रमाणे १२ हजारांची लाच पवार यांनी मागितल्यानंतर त्यात तडजोड होवून सात हजार…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांचा हजारो क्विंटलचा कापूस चढ्या भावाने घेऊन शेतकऱ्यांंची फसवणूक करणाऱ्या जग्गू डॉन नारखेडेसह दोन आरोपींची लेखी तक्रार मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी अतुल मधुकर पाटील (वय ४२) रा. कुंड बु. ता.मलकापूर यांनी १५३ क्विंटल ४० किलो कापूस हा प्रति क्विंटल ९००० रुपये प्रमाणे एकूण रक्कम १३ लाख ८० हजार ६०० रुपयाचा कापूस भरून नेला व त्यादिवशी त्यांनी १ लाख ६६ हजार ६५० रुपये नगदी रोख दिले व उर्वरित रक्कम रुपये १२ लाख १३ हजार ९५० इतकी राहिलेली रक्कम २० दिवसाच्या करारावर देऊ असे कबूल केले.त्यानंतर अतुल पाटील यांनी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शासकीय रुग्णालयांंमध्ये उपचार घेणाऱ्यांना बाहेरून औषधे आणायला सांगितली जातात.राज्य सरकारकडे स्वत:ची जाहिरात करायला पैसे आहेत.गुवाहाटी आणि गुजरातला फिरायला जाण्यासाठी पैसे आहेत मात्र सरकारी रुग्णालयांमधे उपचार घेणाऱ्या जनतेच्या औषधांंसाठी पैसे नाहीत.ही अत्यंत संतापनजक बाब आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने हे भ्रष्ट सरकार घालवले पाहिजे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूसत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाच्या मस्तवाल नेत्याने नांदेड रुग्णालयाच्या डीनला शौचालयाची साफसफाई करायला सांगितली. यामुळे डीनने संबंधित नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताच सूडाच्या भावनेतून डीनवरच…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.त्याचा शुभारंभ आज पासून होणार आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली महापालिका असणार आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना कोणती पुस्तके वाचावित याचीही माहिती मिळत नाही, तसेच परिक्षेची तयारी कशापध्दतीने करावी याबाबत विद्यार्थी शासंक असतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला सायंकाळी ५ वाजता हे मार्गदर्शन असणार आहे. प्रत्येक महिन्याला कोणताही वार असला तरी ५ तारखेला हे मार्गदर्शन होणार आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना सापडल्यास त्याला २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने १० जुलै २०२३ रोजी शासन निर्णय जाहीर केला असून प्रत्येक शासकीय विभागाने सूचनाचे बोर्ड कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, धुम्रपानामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. असंसर्गजन्य रोगामधील कर्करोग, हदयविकार, मानवी हृदयाशी निगडित…

Read More

साईमत फैजपूर प्रतिनिधी स्व.हरीभाऊ जावळे यांच्या प्रमाणेच अमोल जावळे हि शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात सवेंदनशील असुन ते कायमच शेती, माती आणि पाण्याच्या प्रश्नावर काम करत आहे हे पाहुन आम्हा सर्वांना स्व.हरिभाऊची प्रकर्षाने आठवण होत आहे. केळी पिक आणि केळी व्यवसाय हा जळगाव जिल्ह्याचा आणि त्यातही विशेषतः रावेर यावल तालुक्यांचा मुख्य कणा आहे.परंतु केळीवर येणारे विविध रोग बंची टॉप,सी.एम .व्ही,करपा,सिगा टाका लक्षात घेता आता शास्त्रोक्त पद्धतीने केळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.अन्यथा काळाच्या ओघात केळी पीक नष्ट होऊ शकते.असा धोक्याचा इशारा देत शेतकऱ्याने आता जागे होण्याची आवश्यकता आहे असे मत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि केळी तज्ञ डॉ.के.बी पाटील यांनी व्यक्त केले. माजी खासदार…

Read More