Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी शाकाहार हाच शुद्ध आहार’ असा नारा देत शहरात प्रमुख मार्गांवर जागतिक शाकाहार दिनानिमित्त श्री जैन युवा फाऊंडेशन तर्फे शाकाहार रॅली रविवारी (दि. १) सकाळी काढण्यात आली. रतनलाल सी. बाफना प्रायोजित या रॅलीत जैन युवा फाऊंडेशन व जय गुरुदेव ग्रुप चे सदस्य तथा विविध संघटनेच्या व विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आयोजक श्री जैन युवा फाउंडेशनचे रॅली काढण्याचे हे सहावे वर्ष होते. प्रत्येकाने शुद्ध व सकस शाकाहार घ्यावा. दीर्घायुष्यासाठी शाकाहार महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी प्रचार-प्रसार रॅलीतून सांगण्यात आले. सागर पार्क मैदानावर रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात झाली. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी ,कस्तुरचंद बाफना,…

Read More

साईमत फैजपूर प्रतिनिधी माजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे हे अखंड पणे शेवटच्या श्वासापर्यंत शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांसाठी कार्यरत होते. त्यांचे संस्कार, विचार आणि कार्य चिरंतन ठेवण्याच्या जाणिवेतून त्यांच्या ७० व्या जयंतीच्या निमित्ताने कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे मित्र परिवाराच्या वतीने केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक उद्योन्मुख उद्योजकांसाठी केळी पीक परिसवांदाचे आयोजन फैजपूर येथे करण्यात आलेले आहे. सध्या केळी निर्यातीला जागतिक स्तरावर खूप चांगला वाव दिसत आहे, परंतु केळीवर करपा, पिटींग रोग व सीएमव्ही सारखे संकट हि वाढत आहे. सोबतच वातावरण बदलाचा परिणाम जाणवत आहे. सातत्याने भेडसावणाऱ्या या अडचणी संदर्भात शास्त्रोक्त पद्धतीने चर्चा करून केळीला शाश्वत ठेवण्यासाठी या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड, गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टसह कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व सार्वजनिक स्तरावातील सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पुर्वदिवशी विशेष ‘स्वच्छांजली’ मोहिम राबविण्यात आली. सहकाऱ्यांनी अतिरिक्त श्रमदान करीत कार्यरत परिसरात साफसफाई केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व सहकाऱ्यांना ‘स्वच्छांजली’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. जैन अॅग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क मधील सर्व सहकाऱ्यांनी फुड पार्कच्या मेन गेटपासून…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी व्यापार क्षेत्रातील नवे बदल, व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुण्यात येत्या ५ ऑक्टोबर रोजी गणेश कला क्रिडा मंच , स्वारगेट, पुणे येथे राज्यस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अन्यायकारक कायदे रद्द करणे, पारंपरिक व्यापार टिकवणे, तो वाढवणे आणि नव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे ही राज्यस्तरीय व्यापार परिषदेच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्टे असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार पेक्षा जास्त व्यापारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. परिषदेस केंदीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सिद्धिविनायक विद्यालय , नोवातियार इलेक्ट्रिकल्स व डिजिटल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त सिद्धिविनायक विद्यालय परिसरात स्वच्छता अभियानची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका डॉक्टर अमृता सोनवणे नोवातियार इलेक्ट्रिकल्स व डिजिटल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत कवटे, समीर दाभोळकर, खुशबू ठाकूर, पी एस. पाटील, संदीप पाटील, रेखा सपकाळे, सुरक्षा अधिकारी गुलाबराव महाजन, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे ,गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता पंधरवडा निमित्त विद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून खुशबू ठाकूर यांनी स्वच्छता विषयावर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून उत्तराच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व विशद करून सांगितले. तसेच विद्यालयातील केवल पाटील, कृष्णा सपकाळे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी माजी आमदार व मनसे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी जळगाव तालुका कंडारी येथील वाघुर धरण परिसरात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संस्था जळगाव व कृषी तंत्र विद्यालय,डिक्साई यांनी केले होते. त्यानिमित्त मत्स्य व्यवसायाबद्दल विविध माहिती देण्यात आली. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, मत्स्य व्यवसायाची संबंधित प्रधानमंत्री मत्स्यसंपदा अंतर्गत शासनाच्या योजनांची माहिती देणे, मत्स्य व्यवसायाला मिळणारा अनुदानाबद्दल माहिती देणे, मत्स्य व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी व वाघूर धरणाच्या गावालगतच्या तरुणांना मत्स्य व्यवसायातून रोजगार उपलब्ध कसा करता येईल याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील नामांकित त्रिमूर्ति शिक्षण संस्थेत “गणेशोत्सव व फार्मसी डे” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. दहा दिवसाच्या गणेशोत्सवमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी त्रिमुर्तीचा राजा विराजमान झाले. श्रींची स्थापना त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव नियोजन मंडळाचे सदस्य मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. दुसऱ्या दिवशी श्रींची आरती त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. चौथ्या दिवशीच्या आरती धरणगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या हस्ते करण्यात आली. सातव्या दिवशी श्रींची आरती महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ सुकाणू समिति सदस्य भरत अमळकर यांच्या हस्ते…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी “स्वच्छताही सेवा” या मोहिमे अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी बांभोरी आणि विद्यापीठ परीसरात श्रमदान केले. या मोहिमेचे नेतृत्व कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले. या मोहिमेला बांभोरी ग्राम पंचायतीने सहकार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छताही सेवा ही मोहिम राबविण्याचे आवाहन देशवासींयांना केले होते. त्या मोहिमेला प्रतिसाद देत रविवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांभोरी परिसरात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी स्वच्छता केली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ वित्त व लेखा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल. या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट क्लबच्या विध्यार्थ्यातर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य संकलन व विघटन’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले. गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले, दुर्वा, फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून या उपक्रमामुळे निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक…

Read More