Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर मार्गे देवीची मुर्ती आणतांना झालेल्या अपघातत अंगावर देवीची मुर्ती पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली आहे. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५ रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी गेले होते. तेथून परतत असताना रात्री…

Read More

 साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील १६ आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांंच्या दरबारी प्रलंबित आहे.मे महिन्यात सर्वोच्च न्यायालायने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. आज या प्रकरणावर तिसरी सुनावणी सह्याद्री येथे पार पडली. यावेळी सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली आहे.सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज तीन तास दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाला. आता यावर २० तारखेला निर्णय देण्यात येणार आहे तसेच ठाकरे गटाकडून सर्व याचिकांंवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली जात आह परंतु, या सर्व याचिका म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे या सर्व याचिका एकत्र करून…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या प्रवाशी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत आग विझविली. मात्र तोपर्यंत प्रवाशी रिक्षा जळून खाक झाली होती. ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती हाती आलेली नाही. याबाबत माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा परिसराकडे रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४८८) ही प्रवाशी घेवून चालक जात होता. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी दैनदिन सुविधांचा बोजवारा, पाणी १२ दिवसांनी, रस्त्यांची दुर्दशा, पथदिवे बंद, कोट्यवधी खर्चूनही कचरा तसाच…. शहरातील नागरीक नगरपालिकेचे करदाते म्हणजेच एका अर्थाने सुविधांवरचे दावेदारही आहेत. त्यांना दैनदिन सुविधांसाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र, भुसावळ न.प.ला हातावर पोट असणाऱ्यांचे, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ व किरकोळ विक्री करणाऱ्यांचेच अतिक्रमण का बोचते ?, असा सवाल करीत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी न.प. प्रशासकांना भानावर येण्याचे आवाहन केले आहे. भुसावळ शहरात पाणी १२ दिवसांच्या फरकाने येते, चालण्यासाठीही व्यवस्थित रस्ते नाहीत. शहरात हजारो पथदिवे बंद आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, कचऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावर मात्र कचराच कचरा दिसतो. असे असतांना शहरातील…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनाच्या प्रलंबित कामाना गती देऊन ती कामे मार्च 2024 पर्यंत दर्जेदार व मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह , नाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला. दि.७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्‍थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. संस्थेचे पदाधिकारी ॲङ प्रविणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, भालचंद्र पाटील, प्राचार्य…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पिठापूर येथील पादुका, पालखी व रथयात्रेचे शनिवार दि. १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आप्पा महाराज समाधी जळगाव येथे प्रथमच आगमन होणार आहे. आप्पा महाराज समाधीपासून बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेपर्यंत आगमन व स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत भजन, नामस्मरण व श्रीपाद श्रीवल्लभ पादुकांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रविवार दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ ते ८ नगर प्रदक्षिणा/ नामफेरी व सकाळी ९ वाजता रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ७ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व भक्तांना श्री पादुकांचे दर्शन घेता…

Read More

शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी संकट असतं तर कधी सुलतानी. या सर्व संकटांवर मात करूनही काही शेतकरी उत्तम शेती करून लाखोंचा नफा मिळवत आहेत. एका अशाच शेतकऱ्याने डाळींब शेतीतून आर्थिक प्रगती साधली. या शेतकऱ्यानं दोन एकर डाळींब शेतीतून 30 लाखांचं उत्पन्न घेतले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील नांदोरे गावातील शेतकरी प्रताप भिंगारे यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळींबाची बाग केली आहे. या बागेतून त्यांनी मोठा आर्थिक नफा मिळवला आहे. प्रताप भिंगारे यांनी डाळींब बागेचं उत्तम नियोजन केलं आहे. भिंगारे यांनी आपल्या डाळींब शेतीतून इतर शेतकऱ्यांसोर आदर्श मांडला आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. प्रति किलो डाळिंबाला मिळाला 121…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील १८ पगड जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार ठरलेल्या मायबाप कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतन मराठा महाविद्यालयात १९९१ च्या तृतीय वर्षाच्या बॅचमधील लेकरांचा गोतावळा अर्थात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला. यावेळी तत्कालीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर 1991 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख,यांच्यासह प्रा.व्ही.एस.सोनवणे, प्रा. एस.जे.जाधव,उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील, डॉ.के. बी.पाटील, प्रा.डॉ.बी.के.सोनवणे, प्रा.डॉ.पांडुरंग (राजू सर) पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.अशोक पांडव, संजय चौधरी, प्रसन्न मांडे, सुनील लाठी, आबासाहेब पाटील,विजय देसाई, उमेश पाटील, आर जी पाटील यांनी गुरुजनांचा सन्मान केला. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सध्या करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चकमक घडवून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दलही सूचक वक्तव्य गायकवाड यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) हत्येच्या कटाबाबत गौप्यस्फोट करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या…

Read More