Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी आज काळ पालटतो आहे. तयार होणारी नवीन पिढी मुळातच ए. आय. तंत्रज्ञानाची भोक्ती आहे पण या नवीन पिढीला योग्य मार्गदर्शनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी उपयुक्त अशा नव-नवीन सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करणे गरजेचे आहे, याच विचारांची कास धरून एस. एस. बी. टी. महाविद्यालयात एम.सी.ए. विद्यार्थ्यांसाठी एक आठवडयाची डेटा सायन्स व ए.आय. आधारीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एम सी ए विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप पाटील , प्रा. शुभम महाले , प्रा. मिनाक्षी बारी , प्रा.जयश्री मुऱ्हेकर यांनी ए. आय. आधारित तंत्रज्ञाना विषयी या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची सखोल प्रशिक्षण पर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी १६ रोजी जैन हिल्स येथील गांधी तीर्थला आवर्जून भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी त्यांचे हृद्य स्वागत केले. जैन हिल्स येथील गांधी तीर्थ पाहून डॉ. रवींद्र शोभणे यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी, “गांधी तीर्थ म्हणजे जैन हिल्स परिसरात श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी केलेला चमत्कार होय. ही केवळ दगडा मातीची इमारत नाही तर विचारांना आदान-प्रदान करणारी, मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत विचार व आदर्शांचा तो अव्याहात प्रवाह आहे. त्या प्रवाहातून समाज घडवण्यासाठी, आदर्शांची रुजवत करण्याकरीता निर्माण केलेले असे अति…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी  मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी उपस्थित उद्योजक व्यावसायिक यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच जिल्हास्तरीय बांधणी करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा उद्योजक कक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,मराठा उद्योजक कक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील,उपाध्यक्ष जयंत पाटील,कार्याध्यक्ष भगवान शिंदे यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भगवान शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यात उद्योग व्यवसायिकांना मोठी संधी आहे.सर्व उद्योजक व्यावसायीक एकत्र आलो तर निश्चित सर्व स्तरावर प्रगती…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लक्ष केंद्रित प्रयत्नांमुळे एका महिन्यात अशा गंभीर कुपोषित बालकांची संख्या १४२२ पर्यंत कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्ती कडे सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने कुपोषण मुक्तीसाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती देतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्याने मेडीकल, सर्जीकल अॅण्ड डायर्टी (एमएसडी) तीन प्रकारच्या संकल्पना वापरण्यात आल्या. यामध्ये मुलांना एनर्जी नेस्ट न्यूर्टीशन फूड,२२०० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी असलेल्या जागतिक शरीर रचना शास्त्र दिनानिमित्त शरीररचना शास्त्र विभागाने पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ.शुभांगी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानवी शरिरातील विविध अवयव, हाडे याशिवाय आतड्यांची रचना आदिंचे चित्र रेखाटले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्याहस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स फ्रेन्झी या फ्रेशर पार्टीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ .नितीन भोळे(प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ.अनिलकुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विभाग प्रमुख) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज वारके यांनी सात पैकी साडेसहा गुण घेत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर दुसरा क्रमांक पाचोरा येथील आर्यकुमार शेवाळकर साडेपाच गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर तिसऱ्या स्थानी जळगावचा दुर्वेश कोळी हा राहिला तर मुलींच्या गटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे पाच गुणांसह प्रथम आली तर द्वितीय स्थान जळगावची अनुभूती स्कूल ची विद्यार्थिनी विद्या बागुल द्वितीय स्थानी राहिली. स्पर्धेत एकूण ४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. एकूण…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी न्यूमोनिया आजारामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच किडनीला इजा झालेली असताना व्हेन्टिलेटरच्या सहाय्याने व औषधोपचाराने चार वर्षीय “अरबाज”ने मृत्यूलाही परतवून लावल्याची घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. या बालकावर यशस्वी उपचार करणाऱ्या बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे. पाचोरा शहरातील अबुजार शेख अरबाज या ४ महिने वयाच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी न्युमोनिया झाला म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्याला श्वास घ्यायलाही त्रास होता. त्याला व्हेन्टिलेटरच्या सहाय्याने ३ दिवस उपचार करण्यात आले. त्यातून स्थिर झाल्यावरही, आजाराचे दुष्परिणाम झाल्यामुळे किडनी व्यवस्थित काम करत नव्हती.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी डॉ. अविनाश आचार्य आणि संघाच्या प्रेरणेने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकल्प उभे झाले. या वृद्धाश्रमात गरीब लोक नव्हे, तर उच्चभ्रु , मध्यम वर्गातील लोक येतात. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून, खस्ता खाऊन मुलाला हजार कोटीचे मालक बनवले असे मुलं, सूना, आई-वडिलांना वागवत नाहीत. आई वडिलांशिवाय घराला वैभव नाही. त्यावेळी मुलांकडील पैसे, वैभव काय कामाचे, अशी खंत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. ते रविवारी मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. निवांत व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मातोश्री आनंदाश्रमाला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन भव्य रूप यावे असे ठरले. त्यासाठी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस मनास सशक्त बनविणे हाच एकमेव उपाय आहे आणि तो सध्याच्या शिक्षण पद्धतीत आध्यात्मिक शिक्षणाचा समावेशानेच पूर्ण होईल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी सुमनदीदी, राष्ट्रीय संयोजक, शिक्षण प्रभाग, माऊंट आबू यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियान आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन येथील ढाके कॉलनी सेवाकेंद्रात आयोजि करण्यात आले. त्याप्रसंगी सुमनदीदी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, अगदी कोवळया वयातील विद्याथ्र्यांच्या आत्महत्येच्या घटना पाहता मन व्यथित होते, जीवनाचा प्रारंभ करण्यापूर्वीच त्याला न समजून घेता आत्महत्या…

Read More