Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी शासकीय रुग्णालयांंमध्ये उपचार घेणाऱ्यांना बाहेरून औषधे आणायला सांगितली जातात.राज्य सरकारकडे स्वत:ची जाहिरात करायला पैसे आहेत.गुवाहाटी आणि गुजरातला फिरायला जाण्यासाठी पैसे आहेत मात्र सरकारी रुग्णालयांमधे उपचार घेणाऱ्या जनतेच्या औषधांंसाठी पैसे नाहीत.ही अत्यंत संतापनजक बाब आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने हे भ्रष्ट सरकार घालवले पाहिजे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूसत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाच्या मस्तवाल नेत्याने नांदेड रुग्णालयाच्या डीनला शौचालयाची साफसफाई करायला सांगितली. यामुळे डीनने संबंधित नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताच सूडाच्या भावनेतून डीनवरच…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.त्याचा शुभारंभ आज पासून होणार आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली महापालिका असणार आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना कोणती पुस्तके वाचावित याचीही माहिती मिळत नाही, तसेच परिक्षेची तयारी कशापध्दतीने करावी याबाबत विद्यार्थी शासंक असतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला सायंकाळी ५ वाजता हे मार्गदर्शन असणार आहे. प्रत्येक महिन्याला कोणताही वार असला तरी ५ तारखेला हे मार्गदर्शन होणार आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना सापडल्यास त्याला २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने १० जुलै २०२३ रोजी शासन निर्णय जाहीर केला असून प्रत्येक शासकीय विभागाने सूचनाचे बोर्ड कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, धुम्रपानामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. असंसर्गजन्य रोगामधील कर्करोग, हदयविकार, मानवी हृदयाशी निगडित…

Read More

साईमत फैजपूर प्रतिनिधी स्व.हरीभाऊ जावळे यांच्या प्रमाणेच अमोल जावळे हि शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात सवेंदनशील असुन ते कायमच शेती, माती आणि पाण्याच्या प्रश्नावर काम करत आहे हे पाहुन आम्हा सर्वांना स्व.हरिभाऊची प्रकर्षाने आठवण होत आहे. केळी पिक आणि केळी व्यवसाय हा जळगाव जिल्ह्याचा आणि त्यातही विशेषतः रावेर यावल तालुक्यांचा मुख्य कणा आहे.परंतु केळीवर येणारे विविध रोग बंची टॉप,सी.एम .व्ही,करपा,सिगा टाका लक्षात घेता आता शास्त्रोक्त पद्धतीने केळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.अन्यथा काळाच्या ओघात केळी पीक नष्ट होऊ शकते.असा धोक्याचा इशारा देत शेतकऱ्याने आता जागे होण्याची आवश्यकता आहे असे मत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि केळी तज्ञ डॉ.के.बी पाटील यांनी व्यक्त केले. माजी खासदार…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४ वर्ष वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. जळगाव तालुक्यातील चार शाळांच्या संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवित जळगाव ग्रामीण संघाचे अनुभूती स्कूलचा संघ प्रतिनिधीत्व करेल. अनुभूती स्कूलच्या क्रिकेटच्या ग्राऊंडवर झालेल्या पाच षटकांचा सामन्यात अनुभूतीने किड्स गुरूकुल शाळेचा संघाला १० विकेट ने पराजित करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व अनुभूती स्कूल यांच्यात अंतिम सामना ३ ऑक्टोबर ला खेळविला गेला. अनुभूतीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रूस्तमजी स्कूलने निर्धारित ५ षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्यात. यावेळी अनुभूती स्कूलतर्फे अन्मय…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शिव कॉलनी परिसरातील श्री गुरुदत्त विकास बहुउद्देशीय मंडळ संचालित श्री सिद्धि गणेश मंदिरात दि. 2 ऑक्टोंबर सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता नगरसेवक प्राचार्य डॉ. सचिन पाटील यांच्या सौभाग्यवती ज्योती सचिन पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्राचार्य डॉ. सचिन पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, श्री सिद्ध गणेश मंदिराच्या ज्या काही गरजा असतील तसेच या मंडळाच्या कामासाठी मी सदैव मदत करायला तयार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. सचिन पाटील यांचा सत्कार मंडळाचे पांडुरंग बाविस्कर, राजू पाटील, शामराव सोनगिरे, बाळासाहेब कासार, नवीन कार्यकारणी मंडळ सदस्य राजेश रेणुके, मयूर पाटील, दिनेश पाटील, हरीश चौधरी, संभाजी शिंपी, सुधाकर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा शहरालगत असलेल्या कोगटा इंडस्ट्रीज येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल कशा पद्धतीने तयार केला जातो. त्याची साठवणूक, हिशोब पद्धती, वितरण पद्धती, अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया, ऑटोमेशन, निर्यात, वित्त आणि एचआर या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॉश विभागकडुन गणेशोत्सवा निमीत्य स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ११ ,१४ ,१७ वर्षे व खुला अशा वयोगटात खेळविण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या विजेत्यांना नुकतेच पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षिस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, मुजेचे क्रीडा संचालक डॉ.श्रीक्रुष्ण बेलोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.रणजीत पाटील, मिनल थोरात उपस्थीत होते. सदर स्पर्धेचे आयोजन प्रशिक्षक प्रा.प्रविण कोल्हे यांनी केले होते. स्पर्धेतील विजेते ११ वर्ष (मुले)- १) सिध्दांत शर्मा, २)रणविर खेडकर, ३)अर्णव दांडगे.१४ वर्ष (मुले)- १) अथर्व खांडरे, २) भावेश चौधरी, ३) तन्मय पाटील. १४ वर्ष (मुली)- १) संस्क्रुती चौधरी, २) पालवी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या कान्ह ललित कला केंद्राच्या स्वरदा संगीत विभाग आयोजित स्वर्गीय तेजस नाईक स्मरणार्थ तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा रविवार २९ ऑक्टोबर रोजी जुना कॉन्फरन्स सभागृहात होणारा आहे. शास्त्रीय संगीत हे प्रत्येकापर्यंत पोहोचावं रुजू व्हावं आणि प्रत्येकाने ते आत्मसात करावं हे या शास्त्रीय स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. तेजसने त्याच्या छोट्याशा आयुष्यात संगीतावर विशेष करून शास्त्रीय संगीतावर भरभरून प्रेम केलं आणि त्याची आठवण कायम राहावी याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते हे या स्पर्धेचे तृतीय वर्ष असून या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता लहान गट आठ ते पंधरा वर्षे वयोगट आणि मोठा गट…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू प्रितेश ईश्वर सोनवणे याने डेरवण, रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत १४ वर्षाआतील वयोगटात कीडस भालाफेक प्रकारात ३०.१० मीटर भालाफेक करीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. याबद्दल प्रितेशचा जामनेर तालुका ॲथलेटिक्स असो.चे सचिव जी.सी.पाटील यांच्या हस्ते शाल, बुके, पेढा भरवून नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रितेशचे आई-वडील, आशाबाई ईश्वर सोनवणे, वाडीचे विलास पाटील, जामनेर तालुका ॲथलेटिक्स असो.चे उपाध्यक्ष दीपक चौधरी, कोषाध्यक्ष व्ही.एन.पाटील, सहसचिव प्रा.समीर घोडेस्वार आदी उपस्थित होते. यशाबद्दल जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. नारायण खडके, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असो.चे संचालक तथा जिल्हा ॲथलेटिक्सचे सचिव राजेश…

Read More