Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदीर येथे पालकांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत माता पालकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बेटी बचाओ बेटी पाढाओ …. , पर्यावरण वाचवा …, नेत्रदान श्रेष्ठ दान ..अशा विविध विषयांवर आधारित सुंदर अशा रांगोळ्या यावेळी काढल्या. त्यात शीतल राहुल पोतदार (प्रथम ) ,अमृता विजय लोहार (द्वितीय) , भारती स्वप्नील गायकवाड (तृतीय) , अंजली अनिल चौधरी (उत्तेजनार्थ ), स्मिता विरेंद्रनाथ नागपुरे (उत्तेजनार्थ ) अशी निवड करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध रांगोळीकार कुमुद नारखेडे यांनी केले तर मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शैक्षणिक विकासाचे प्रणेते, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मेहरूण येथील मिल्लत कनिष्ठ महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. पवित्र कुराणाचे पठण मुहम्मद इस्माईल या विद्यार्थ्याने तर अल्मास सय्यद उस्मान यांनी हम्द शरीफ, अनम खान यांनी नात-ए-पाक सादर केले. त्यानंतर उर्दू आणि इतिहास विभागाच्या सुमय्या शाह यांनी सर सय्यद यांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दल माहिती दिली. प्रा. शेख झियान अहमद यांनी सर सय्यद यांच्या व्यक्तिमत्त्वाची, सामाजिक कार्याची गाथा आणि अलिगढ विद्यापीठाची स्थापना विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवण्यात केली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या आफिफा शाहीन म्हणाल्या की, सर सय्यद यांच्याप्रमाणेच देश आणि राष्ट्रासाठी अधिक गरज भासत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. संतोष भागवत प्रजापती (वय-३२) रा. आदर्शन नगर, कक्ष, जळगाव असे अटक केलेल्या वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील एका कंपनी समोर लावलेला ट्रक चालकाने सुरू करून बाहेर काढत असतांना ट्रक खाली झोपलेल्या क्लिनरचा चिरडून मृत्त्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. क्लिनर दीपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल) असे मयत क्लिनरचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसीमधील एका कंपनीसमोर ट्रक उभा होता. त्याच ट्रकच्या खाली त्याच ट्रकचे क्लिनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. व त्याने ट्रक सुरू करून जागेवरून बाहेर काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे चालकाच्या लक्षात…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खाजगी वाहतुक बस, ट्रॅव्हल्स सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवावी अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांना बेकायदा तिकीट विरोधाक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख प्रितम शिंदे, कालेज कक्ष जिल्हा युवाधिकारी, हर्षल मुंडे, संदिप सुर्यवंशी, विभागीय युवाधिकारी, सचिन सोनवणे, शहर समन्वयक यश राठोड, शाखा प्रमुख तन्मय मनोरे, उपशाखा प्रमुख ओम पाटील, जयेश ठाकूर, सुरज परदेशी, चिन्मय सोनार, आकिब शेख, कुणाल बाविस्कर, आर्यन सुरवाडे, मोहित पाटील आदि युवासैनिक उपस्थित होते. खाजगी वाहने आणि ट्रॅव्हल्ससाठी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं…भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं आणि गणितांची कोडी…खिडक्या, दरवाजे, व्हरांडा, जिकडे-पाहावे-तिकडे रंगेबेरंगी चित्रे, तक्ते, सुभाषिते, नकाशे यांची पखरण…विद्यार्थ्यांसोबत बोलणाऱ्या भिंती अन् व्हरांडा हे चित्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकार होत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘बाला’ म्हणजेच ‘बिल्डिंग एज लर्निंग एड’ उपक्रम जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील २७८ शाळांमध्ये बाला प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी ३६ शाळांचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जामनेर तालुक्यात ३१ शाळांमध्ये बाला प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘आंतरमहाविद्यालयीन टेबल-टेनिस स्पर्धा’ उस्ताहात झाली. यात पुरुष आणि महिला गटात जळगाव विभागातील एकूण १० महाविद्यालयातील संघ सहभागी झाले. याप्रसंगी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे, प्रमुख अतिथी डॉ. के. बी. महाजन (विभाप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, मू. जे. महाविद्यालय), तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते. पुरुष गटात रायसोनी महाविद्यालय प्रथम, धनाजी नाना महाविद्यालय द्वितीय, नाहाटा महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले, तर महिला गटात मू. जे. महाविद्यालय प्रथम, नाहाटा महाविद्यालय द्वितीय, पी.जी.महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. पी.जी.महाविद्यालयच्या विद्यार्थिनी जयश्री महाजन व पायल सोनवणे यांची याप्रसंगी जळगाव विभाग टेबल टेनिस संघात निवड करण्यात आली.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात टोळी करून वेगवेगळे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दोन वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत माहिती अशी की, आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (वय-२१, रा. एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी) आणि (दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय-१९ , रा, यादव देवचंद हायस्कूल जवळ मेहरूण) त्यांच्यावर एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहे. जळगाव शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण वातावरण तयार करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करत होते.त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी २० ऑक्टोंबर पर्यंत गुगल लिंकद्वारे अहवाल सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच सदर कायद्यानुसार प्रत्येक प्रत्येक शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नवी दिल्‍ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्लोबल बिजनेस अँन्ड एज्युकेशन अवार्डने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्‍लीतील हॉटेल विवांता व्दारका येथे आयोजीत कार्यक्रमात गोदावरी नर्सिंगचे प्रतिनिधी म्हणून प्रा. पियुष वाघ यांनी हा पुरस्कार स्विकारला. १५ ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माजी क्रिकेटपटू मदनलाल शर्मा, माजी सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रीय मंत्री अल्फाँन्स जोसेफ कनंनथनम तसेच छत्‍तीसगडचे माजी राज्यपाल शेखर दत्‍त, युगांडाच्या भारतातील उच्चायुक्‍त जॅकलीन मुकनजिरा, मिशन फाईट बँक संचालक,लेप्ट. कर्नल रोहीत मिश्रा आदिंची उपस्थीती होती. २०२३ वर्षातील सर्वात उदयोन्मुख उच्च संस्था म्हणून संपुर्ण भारतातून नर्सिंग महाविद्यालयापैकी एकमेव गोदावरी नर्सिग…

Read More