साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज वारके यांनी सात पैकी साडेसहा गुण घेत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर दुसरा क्रमांक पाचोरा येथील आर्यकुमार शेवाळकर साडेपाच गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर तिसऱ्या स्थानी जळगावचा दुर्वेश कोळी हा राहिला तर मुलींच्या गटात पाचोर्याची ऋतुजा बालपांडे पाच गुणांसह प्रथम आली तर द्वितीय स्थान जळगावची अनुभूती स्कूल ची विद्यार्थिनी विद्या बागुल द्वितीय स्थानी राहिली. स्पर्धेत एकूण ४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. एकूण…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी न्यूमोनिया आजारामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच किडनीला इजा झालेली असताना व्हेन्टिलेटरच्या सहाय्याने व औषधोपचाराने चार वर्षीय “अरबाज”ने मृत्यूलाही परतवून लावल्याची घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. या बालकावर यशस्वी उपचार करणाऱ्या बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे. पाचोरा शहरातील अबुजार शेख अरबाज या ४ महिने वयाच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी न्युमोनिया झाला म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्याला श्वास घ्यायलाही त्रास होता. त्याला व्हेन्टिलेटरच्या सहाय्याने ३ दिवस उपचार करण्यात आले. त्यातून स्थिर झाल्यावरही, आजाराचे दुष्परिणाम झाल्यामुळे किडनी व्यवस्थित काम करत नव्हती.…
साईमत जळगाव प्रतिनिधी डॉ. अविनाश आचार्य आणि संघाच्या प्रेरणेने केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकल्प उभे झाले. या वृद्धाश्रमात गरीब लोक नव्हे, तर उच्चभ्रु , मध्यम वर्गातील लोक येतात. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून, खस्ता खाऊन मुलाला हजार कोटीचे मालक बनवले असे मुलं, सूना, आई-वडिलांना वागवत नाहीत. आई वडिलांशिवाय घराला वैभव नाही. त्यावेळी मुलांकडील पैसे, वैभव काय कामाचे, अशी खंत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. ते रविवारी मातोश्री आनंदाश्रम नवरचनेचा व गौराई आरोग्य उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. निवांत व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मातोश्री आनंदाश्रमाला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन भव्य रूप यावे असे ठरले. त्यासाठी…
साईमत जळगाव प्रतिनिधी आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस मनास सशक्त बनविणे हाच एकमेव उपाय आहे आणि तो सध्याच्या शिक्षण पद्धतीत आध्यात्मिक शिक्षणाचा समावेशानेच पूर्ण होईल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी सुमनदीदी, राष्ट्रीय संयोजक, शिक्षण प्रभाग, माऊंट आबू यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियान आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन येथील ढाके कॉलनी सेवाकेंद्रात आयोजि करण्यात आले. त्याप्रसंगी सुमनदीदी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, अगदी कोवळया वयातील विद्याथ्र्यांच्या आत्महत्येच्या घटना पाहता मन व्यथित होते, जीवनाचा प्रारंभ करण्यापूर्वीच त्याला न समजून घेता आत्महत्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर मार्गे देवीची मुर्ती आणतांना झालेल्या अपघातत अंगावर देवीची मुर्ती पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली आहे. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५ रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी गेले होते. तेथून परतत असताना रात्री…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील १६ आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांंच्या दरबारी प्रलंबित आहे.मे महिन्यात सर्वोच्च न्यायालायने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. आज या प्रकरणावर तिसरी सुनावणी सह्याद्री येथे पार पडली. यावेळी सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली आहे.सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज तीन तास दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाला. आता यावर २० तारखेला निर्णय देण्यात येणार आहे तसेच ठाकरे गटाकडून सर्व याचिकांंवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली जात आह परंतु, या सर्व याचिका म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे या सर्व याचिका एकत्र करून…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या प्रवाशी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत आग विझविली. मात्र तोपर्यंत प्रवाशी रिक्षा जळून खाक झाली होती. ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती हाती आलेली नाही. याबाबत माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा परिसराकडे रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४८८) ही प्रवाशी घेवून चालक जात होता. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला…
साईमत भुसावळ प्रतिनिधी दैनदिन सुविधांचा बोजवारा, पाणी १२ दिवसांनी, रस्त्यांची दुर्दशा, पथदिवे बंद, कोट्यवधी खर्चूनही कचरा तसाच…. शहरातील नागरीक नगरपालिकेचे करदाते म्हणजेच एका अर्थाने सुविधांवरचे दावेदारही आहेत. त्यांना दैनदिन सुविधांसाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र, भुसावळ न.प.ला हातावर पोट असणाऱ्यांचे, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ व किरकोळ विक्री करणाऱ्यांचेच अतिक्रमण का बोचते ?, असा सवाल करीत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी न.प. प्रशासकांना भानावर येण्याचे आवाहन केले आहे. भुसावळ शहरात पाणी १२ दिवसांच्या फरकाने येते, चालण्यासाठीही व्यवस्थित रस्ते नाहीत. शहरात हजारो पथदिवे बंद आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, कचऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावर मात्र कचराच कचरा दिसतो. असे असतांना शहरातील…
साईमत मुंबई प्रतिनिधी नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनाच्या प्रलंबित कामाना गती देऊन ती कामे मार्च 2024 पर्यंत दर्जेदार व मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह , नाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला. दि.७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. संस्थेचे पदाधिकारी ॲङ प्रविणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, भालचंद्र पाटील, प्राचार्य…