साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘आंतरमहाविद्यालयीन टेबल-टेनिस स्पर्धा’ उस्ताहात झाली. यात पुरुष आणि महिला गटात जळगाव विभागातील एकूण १० महाविद्यालयातील संघ सहभागी झाले. याप्रसंगी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे, प्रमुख अतिथी डॉ. के. बी. महाजन (विभाप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, मू. जे. महाविद्यालय), तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते. पुरुष गटात रायसोनी महाविद्यालय प्रथम, धनाजी नाना महाविद्यालय द्वितीय, नाहाटा महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले, तर महिला गटात मू. जे. महाविद्यालय प्रथम, नाहाटा महाविद्यालय द्वितीय, पी.जी.महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. पी.जी.महाविद्यालयच्या विद्यार्थिनी जयश्री महाजन व पायल सोनवणे यांची याप्रसंगी जळगाव विभाग टेबल टेनिस संघात निवड करण्यात आली.…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात टोळी करून वेगवेगळे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दोन वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत माहिती अशी की, आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (वय-२१, रा. एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी) आणि (दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय-१९ , रा, यादव देवचंद हायस्कूल जवळ मेहरूण) त्यांच्यावर एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहे. जळगाव शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण वातावरण तयार करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करत होते.त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई…
साईमत जळगाव प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी २० ऑक्टोंबर पर्यंत गुगल लिंकद्वारे अहवाल सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच सदर कायद्यानुसार प्रत्येक प्रत्येक शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक…
साईमत जळगाव प्रतिनिधी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्लोबल बिजनेस अँन्ड एज्युकेशन अवार्डने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील हॉटेल विवांता व्दारका येथे आयोजीत कार्यक्रमात गोदावरी नर्सिंगचे प्रतिनिधी म्हणून प्रा. पियुष वाघ यांनी हा पुरस्कार स्विकारला. १५ ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माजी क्रिकेटपटू मदनलाल शर्मा, माजी सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रीय मंत्री अल्फाँन्स जोसेफ कनंनथनम तसेच छत्तीसगडचे माजी राज्यपाल शेखर दत्त, युगांडाच्या भारतातील उच्चायुक्त जॅकलीन मुकनजिरा, मिशन फाईट बँक संचालक,लेप्ट. कर्नल रोहीत मिश्रा आदिंची उपस्थीती होती. २०२३ वर्षातील सर्वात उदयोन्मुख उच्च संस्था म्हणून संपुर्ण भारतातून नर्सिंग महाविद्यालयापैकी एकमेव गोदावरी नर्सिग…
साईमत जळगाव प्रतिनिधी आज काळ पालटतो आहे. तयार होणारी नवीन पिढी मुळातच ए. आय. तंत्रज्ञानाची भोक्ती आहे पण या नवीन पिढीला योग्य मार्गदर्शनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी उपयुक्त अशा नव-नवीन सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करणे गरजेचे आहे, याच विचारांची कास धरून एस. एस. बी. टी. महाविद्यालयात एम.सी.ए. विद्यार्थ्यांसाठी एक आठवडयाची डेटा सायन्स व ए.आय. आधारीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एम सी ए विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप पाटील , प्रा. शुभम महाले , प्रा. मिनाक्षी बारी , प्रा.जयश्री मुऱ्हेकर यांनी ए. आय. आधारित तंत्रज्ञाना विषयी या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची सखोल प्रशिक्षण पर…
साईमत जळगाव प्रतिनिधी अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी १६ रोजी जैन हिल्स येथील गांधी तीर्थला आवर्जून भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी त्यांचे हृद्य स्वागत केले. जैन हिल्स येथील गांधी तीर्थ पाहून डॉ. रवींद्र शोभणे यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी, “गांधी तीर्थ म्हणजे जैन हिल्स परिसरात श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी केलेला चमत्कार होय. ही केवळ दगडा मातीची इमारत नाही तर विचारांना आदान-प्रदान करणारी, मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत विचार व आदर्शांचा तो अव्याहात प्रवाह आहे. त्या प्रवाहातून समाज घडवण्यासाठी, आदर्शांची रुजवत करण्याकरीता निर्माण केलेले असे अति…
साईमत जळगाव प्रतिनिधी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी उपस्थित उद्योजक व्यावसायिक यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच जिल्हास्तरीय बांधणी करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा उद्योजक कक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,मराठा उद्योजक कक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील,उपाध्यक्ष जयंत पाटील,कार्याध्यक्ष भगवान शिंदे यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भगवान शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यात उद्योग व्यवसायिकांना मोठी संधी आहे.सर्व उद्योजक व्यावसायीक एकत्र आलो तर निश्चित सर्व स्तरावर प्रगती…
साईमत जळगाव प्रतिनिधी मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लक्ष केंद्रित प्रयत्नांमुळे एका महिन्यात अशा गंभीर कुपोषित बालकांची संख्या १४२२ पर्यंत कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्ती कडे सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने कुपोषण मुक्तीसाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती देतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्याने मेडीकल, सर्जीकल अॅण्ड डायर्टी (एमएसडी) तीन प्रकारच्या संकल्पना वापरण्यात आल्या. यामध्ये मुलांना एनर्जी नेस्ट न्यूर्टीशन फूड,२२०० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल…
साईमत जळगाव प्रतिनिधी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी असलेल्या जागतिक शरीर रचना शास्त्र दिनानिमित्त शरीररचना शास्त्र विभागाने पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ.शुभांगी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानवी शरिरातील विविध अवयव, हाडे याशिवाय आतड्यांची रचना आदिंचे चित्र रेखाटले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्याहस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण…
साईमत जळगाव प्रतिनिधी शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स फ्रेन्झी या फ्रेशर पार्टीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ .नितीन भोळे(प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ.अनिलकुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विभाग प्रमुख) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे…