साईमत जळगाव प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून नाक-कान-घसा विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहे. विशेषत: अभ्यासक्रमावर आधारीत हे उपक्रम असून या विभागात रूग्णसेवा प्रभावी क्षमतेने वाढली आहे. नाक-कान-घसा विभागातर्फे आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यसाठी समर्पित भावना ठेवा असा सल्ला गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागातर्फे क्वीज बी-२०२३ या प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, नाक-कान-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. तन्वी पाटील, डॉ. तृप्ती भट, डॉ. जान्हवी…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीड़ा संकुल नागपुर येथे १७ वर्षाखालील मुले /मुली शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अटितटीच्या अंतिम सामन्यात कोल्हापुर विभागाचा पराभव करुन स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले. संघातील सृष्टि बागुल, जानवी पाटील, चैताली पाटील यांची उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघात निवड होवून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. विजयी संघाचे अभिनंदन विवेकानंद प्रतिष्ठान व्यवस्थापन मंडळ तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्यातर्फे करण्यात आले. या स्पर्धेसाठी विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक संजय यादव, क्षितिज सोनवणे, जितेंद्र पाटील, सिद्धार्थ शिंदे, ललित लोहार, प्रशिक्षक…
साईमत जळगाव प्रतिनिधी साने गुरुजी हे मुला-फुलांचे कवी होते. लहान मुलांमध्ये ते लहान होऊन मिसळून जात. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत होते. त्यांना गोष्टी सांगत होते. अशा मातृहृदयी गुरुजींच्या नावाने सुरु असलेली कथामाला गेली अनेक वर्षे अव्याहत सुरु ठेवणाऱ्या कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेला आणि कथामाला संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा. सी. एस.पाटील यांनी कथामाला उद्घाटनासह प्रथम पुष्प गुंफतांना केले. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे होत्या. ईशस्तवन, स्वागतगीत आणि साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना संगीत शिक्षक राजू क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी सादर केल्याने वातावरण निर्मिती छान झाली. प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने मुले भारावली होती. प्रमुख पाहुणे प्रा.…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर 1947 साली कै.ग्यानचंद हासवानी यांनी महाराष्ट्रातील जळगावच्या भूमीवर पाऊल ठेवले. उदरनिर्वाहाच्या शोधात फूटपाथवर कपडे विकायला सुरुवात केली. आज घटस्थापनेला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतातील कलात्मक आधुनिक पोशाखांचे एक भव्य शोरूम असलेले ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’ आपल्या वस्त्रविश्वाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड, आनंदाचा आणि असंख्य क्षणांचा उत्सव आहे. ज्याने केवळ सेलिब्रेटींचे जीवनच नव्हे तर त्यांच्या प्रियजनांचे जीवन देखील समृद्ध केले आहे. ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’च्या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण म्हणजेच अमृतमहोत्सवानिमित्त शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर भारतातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संचालक मुकेश ग्यानचंद हासवानी यांनी सांगितले की, गतवर्षी शारदीय…
साईमत जळगाव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदीर येथे पालकांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत माता पालकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बेटी बचाओ बेटी पाढाओ …. , पर्यावरण वाचवा …, नेत्रदान श्रेष्ठ दान ..अशा विविध विषयांवर आधारित सुंदर अशा रांगोळ्या यावेळी काढल्या. त्यात शीतल राहुल पोतदार (प्रथम ) ,अमृता विजय लोहार (द्वितीय) , भारती स्वप्नील गायकवाड (तृतीय) , अंजली अनिल चौधरी (उत्तेजनार्थ ), स्मिता विरेंद्रनाथ नागपुरे (उत्तेजनार्थ ) अशी निवड करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध रांगोळीकार कुमुद नारखेडे यांनी केले तर मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
साईमत जळगाव प्रतिनिधी शैक्षणिक विकासाचे प्रणेते, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मेहरूण येथील मिल्लत कनिष्ठ महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. पवित्र कुराणाचे पठण मुहम्मद इस्माईल या विद्यार्थ्याने तर अल्मास सय्यद उस्मान यांनी हम्द शरीफ, अनम खान यांनी नात-ए-पाक सादर केले. त्यानंतर उर्दू आणि इतिहास विभागाच्या सुमय्या शाह यांनी सर सय्यद यांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दल माहिती दिली. प्रा. शेख झियान अहमद यांनी सर सय्यद यांच्या व्यक्तिमत्त्वाची, सामाजिक कार्याची गाथा आणि अलिगढ विद्यापीठाची स्थापना विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवण्यात केली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या आफिफा शाहीन म्हणाल्या की, सर सय्यद यांच्याप्रमाणेच देश आणि राष्ट्रासाठी अधिक गरज भासत…
साईमत जळगाव प्रतिनिधी महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. संतोष भागवत प्रजापती (वय-३२) रा. आदर्शन नगर, कक्ष, जळगाव असे अटक केलेल्या वरीष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील एका कंपनी समोर लावलेला ट्रक चालकाने सुरू करून बाहेर काढत असतांना ट्रक खाली झोपलेल्या क्लिनरचा चिरडून मृत्त्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. क्लिनर दीपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल) असे मयत क्लिनरचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसीमधील एका कंपनीसमोर ट्रक उभा होता. त्याच ट्रकच्या खाली त्याच ट्रकचे क्लिनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. व त्याने ट्रक सुरू करून जागेवरून बाहेर काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे चालकाच्या लक्षात…
साईमत जळगाव प्रतिनिधी खाजगी वाहतुक बस, ट्रॅव्हल्स सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवावी अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांना बेकायदा तिकीट विरोधाक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख प्रितम शिंदे, कालेज कक्ष जिल्हा युवाधिकारी, हर्षल मुंडे, संदिप सुर्यवंशी, विभागीय युवाधिकारी, सचिन सोनवणे, शहर समन्वयक यश राठोड, शाखा प्रमुख तन्मय मनोरे, उपशाखा प्रमुख ओम पाटील, जयेश ठाकूर, सुरज परदेशी, चिन्मय सोनार, आकिब शेख, कुणाल बाविस्कर, आर्यन सुरवाडे, मोहित पाटील आदि युवासैनिक उपस्थित होते. खाजगी वाहने आणि ट्रॅव्हल्ससाठी…
साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं…भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं आणि गणितांची कोडी…खिडक्या, दरवाजे, व्हरांडा, जिकडे-पाहावे-तिकडे रंगेबेरंगी चित्रे, तक्ते, सुभाषिते, नकाशे यांची पखरण…विद्यार्थ्यांसोबत बोलणाऱ्या भिंती अन् व्हरांडा हे चित्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकार होत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘बाला’ म्हणजेच ‘बिल्डिंग एज लर्निंग एड’ उपक्रम जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील २७८ शाळांमध्ये बाला प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी ३६ शाळांचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जामनेर तालुक्यात ३१ शाळांमध्ये बाला प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६…