साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेतील क्लास १०००० क्लीन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डिव्हायसेस फॅब्रिकेशनच्या ३० तासाचे हाताळणी प्रशिक्षण वर्गाचा समारोप विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रशिक्षणाकरीता पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांनी क्लीन रूम मधील सर्व नियमावली पाळून स्वतः सेमीकंडक्टर वेफरवर MOS डिव्हायसेस बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी समन्वयक प्रा. ए. एम. महाजन यांनी नाविन्यतापूर्ण प्रशिक्षण उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती देऊन आपल्या विद्यापीठात प्रथम प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पार…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश ची आई आदर्श नगर परिसर मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त होम पूजनाचे आयोजन करण्यात आले. सदर पूजन विजय चौधरी , निखिल पाटील, मयूर वाघ, भैय्या चंदन , आदींच्या हस्ते सहकुटुंब होम पूजन करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील एकलव्य क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे (प्रथम) यश अमित हेमनानी, (द्वितीय)आरुष अभय चौधरी, महर्षी सचिन जोशी, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात देशराज कीर्ती मुनोत, यांनी या स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंची विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या अनुशंगाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी विविध पारितोषिके मिळवत सदर स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मीनल थोरात व एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॉश प्रशिक्षक प्रवीण कोळे आदी उपस्थित होते. विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात दि.१७ ते २१ ऑक्टोबर या काळात पाच दिवसीय बिगर हिंदी नवलेखक शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिर हे भारत सरकार संचालित केंद्र केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली आणि मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन दि.१७ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध हिंदी लेखक डॉ.महेंद्र ठाकूरदास यांच्या हस्ते करण्यात आले. यांनतर या पाच दिवसात, धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.योगेश पाटील यांनी निबंध लेखन, रेखाचित्र आणि संस्मरण या विषयावर उपस्थित शिबिरार्थी नवलेखकांना मार्गदर्शन केले. मू.जे.चे माजी हिंदी विभागप्रमुख प्रा.अरुण पाटील यांनी नाटक आणि एकांकिका यांच्या संहिता लेखन विषयावर मार्गदर्शन…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोवा येथे मनोहर पर्रीकर इनडोर स्टेडियम ३७ व्या नॅशनल गेम्स् स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यात बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी ५×५ या क्रीडा प्रकारात जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर), धनदाई माता महाविद्यालय अमळनेर ची विद्यार्थीनी मनिषा हटकर तसेच ३×३ या क्रीडा प्रकारात मुळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल हटकर अशा तिघांची या खेळासाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही यांची विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपूण भारताचे स्वप्न साकारण्यासाठी निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात १० ते २० ऑक्टोंबर या कालावधीत इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलां-मुलींसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार ७११ शाळांमधील १ लाख ७४ हजार ४४१ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यात कमालीचा यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ झाली आहे. पूर्वीपेक्षा ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात प्राविण्य मिळवले आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या शिक्षण…
साईमत जळगाव प्रतिनिधी श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा झाला. त्यात विविध विद्याशाखांच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के. पटनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार, कार्यक्रमाचे संयोजक प्रा अमोल वाणी, सूत्रसंचालक प्रा एन एम काझी उपस्थित होते. २००३ साली इलेक्ट्रॉनिक्स विषयात महाविद्यालयातून पदवी घेतलेले व सध्या लंडन येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ संचालक असलेले आशिषकुमार पांडे हे मुख्य अतिथी म्हणून व २००५ साली महाविद्यालयातील संगणक विषयातून उत्तीर्ण झालेले व आता सिडनी येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत ज्वालीन सोनावाला हे अनुक्रमे इंग्लंड…
साईमत जळगाव प्रतिनिधी महासंघ जळगाव तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळा संपर्क साधण्याच्या हेतूने विद्यार्थी दैवत मानून विद्यार्थींमधिल सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यासाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी वर्षा आबासाहेब अहिरराव व सुमन दोधू लोखंडे यांचे दातृत्व लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खलिल शेख, शालेय पोषण अधीक्षक विजय पवार, संजय खंबायत, वर्षा अहिरराव, अशोक मदाने ,राज्य सहसचिव टि. के. पाटील, राज्य सदस्य देवेन्द्र चौधरी, राज्य शिक्षकेतर प्रतिंनिधी सोमनाथ लोखंडे, सविता चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी अखतरुद्दीन काझी , शाम ठाकरे , सुनील पवार, गोविंदा…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील श्री महर्षि वाल्मिक क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था आयोजित आद्यकवी श्री महर्षि वाल्मिक जयंती निमित्त आंतरशालेय खो-खो स्पर्धेस वाल्मिक नगर मधील नवीन बालविकास विद्या मंदिराच्या प्रांगणात उत्साहात सुरूवात झाली. स्पर्धेचे उदघाटन आ. राजुमामा भोळे यांनी आद्यकवी श्री महर्षि वाल्मिक यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्रीफळ वाढवून केले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक सचिव प्रभाकरआप्पा सोनवणे, सदस्य भरत सपकाळे, माजी खेळाडू निलेश(आबा) तायडे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ, एन. डी. सोनवणे, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, जळगाव जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव प्रशांत जगताप, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सहसचिव नितिन…
साईमत अमळनेर प्रतिनिधी लहान मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून सातत्याने कार्य करणाऱ्या नाट्यरंग थिएटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालनाट्याविषयी आवड जोपासावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, ‘बालनाट्य प्रेक्षकांपर्यंत’ या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बालप्रेक्षकांसाठी बालनाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमातंर्गत अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयात गाठोड्याचं गुपित या बालनाट्याचे चार प्रयोग सादर झाले. एकूण १५०० विद्यार्थ्यांनी बालनाट्याचा आनंद लुटला. गाठोड्याचं गुपित या बालनाट्याची निर्मिती नाट्यरंग थिएटर्स जळगाव यांची असून अमोल ठाकूर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हे बालनाट्य संस्कारक्षम असून गाठोड्यात लपलेल्या यंत्राद्वारे दोन विद्यार्थी जगण्यातील संस्कारांचे मूल्य बालप्रेक्षकांना समजावून सांगतात. अभ्यासू,…