साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नासिक अंतर्गत एकत्रितपणे बालसंस्कार शिबिर रविवार रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रा.विजय पवार, एस. एन. डि. टी. महाविद्यालयाच्या प्रा. नीता पाटील, छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अमोल कोल्हे, श्री स्वामी समर्थ केंद्राचे तालुका प्रतिनिधी संजय कासार, जिल्हा प्रतिनिधी एन. डि. बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुलांना अॅड. केतन सोनार मार्गदर्शन केले. शिबिरासाठी रामेश्वर कॉलनीसह, आनंद नगर, कांचन नगर, तळेले कॉलनी, अयोध्या नगर, बिब्बा नगर, कुसुंबा आणि आव्हाणे येथील…
Author: Saimat
साईमत चोपडा प्रतिनिधी यंदाचा पत्रकारदिन समारंभ शहरात आयोजित करून भारतीय पत्रकार महासंघाला भाषणबाजी करीत सत्काराचे हारतुरे मान्यवरांकडून घेता आले असते. मात्र पत्रकार आजही दीनदुबळ्यांच्या हितासाठी झटत आहेत, भारतीय पत्रकार महासंघाने दीनदुबळ्यांबद्दलची आपली प्रतिबध्दता अधोरेखित केली आहे. हे चित्र पाहून मनस्वी समाधान वाटले, असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. तालुक्यातील दुर्गम भागातील मन्यावस्ती या पाड्यावर भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने आरोग्य शिबीरात आदिवासी बांधवाची तपासणी व ब्लॅकेट वाटप करून ‘पत्रकार दिन‘ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन व ब्लॅकेट वाटप करण्यात आले. जनसमान्यांचा आधार स्तभ, या ब्रीदवाक्याप्रमाणे यावर्षीदेखील आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने पत्रकार…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत चोपडा येथील डॉ. सुरेश जी पाटील चोपडा महाविद्यालयाची “पडदा” ही एकांकिका प्रथम आली. जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाची एकांकिका ‘कंदील’द्वितीय – तर प्रताप महाविद्यालय अमळनेर यांची एकांकिका- ‘तो पाऊस आणि टाफेटा तृतीय आली. स्पर्धचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा.डॉ.अंजली बोडार, राजेश भामरे ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .एन जे पाटील,डॉ जयश्री सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.राहुल संदनशिव, परीक्षक किरण अडकमोल, चिंतामण पाटील,…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जुलै २०२३ मध्ये जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला. त्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १६६ समित्यांचा नियमित आढावा घेण्यात येत आहेत. सूचनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याचा पाठपुरावा स्वत: जिल्हाधिकारी व त्यांचे स्वीय सहायक घेतात. या बैठकांमध्ये उपस्थित ८१९ मुद्यांपैकी ५६६ मुद्यांवर जलद कार्यवाही करण्यात आली. यामुळेच जिल्हा नियोजन कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व खर्चात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कामांना गती मिळाली. वर्षोनुवर्षे प्रलंबित असलेले शेळगाव मध्यम प्रकल्प, नदीजोड प्रकल्प भूसंपादनग्रस्तांना निधी वितरण, पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल, विमानतळ रुंदीकरण, जामनेर रेल्वेस्थानक भूसंपादन या प्रकल्पांना गती…
साईमत जळगाव प्रतिनिधी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठान व के.सी. ई. सोसायटी शालेय विभाग आणि शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भगवतगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धेचे सलग अठरावे वर्ष असून स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. गौरी राणे, होत्या तर उद्घाटक म्हणून के.सी. ई. सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीण जंगले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे सचिव डॉ.अशोक राणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला यज्ञकुंड प्रज्वलित करून ईशस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले. स्पर्धेत शहरी व ग्रामीण गटातून २५०विद्यार्थी सहभागी झाले…
साईमत जळगाव प्रतिनिधी राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारणात मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी मंत्री पेक्षा मी कार्यकर्ता आहे. ”शाखा हा शिवसेनेचा महत्वाचा घटक असून प्रत्येक शाखेचा व विकास कामांचा फलक हा गावात लागलाच पाहिजे” फलक हा शिवसेनेचा आरसा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पक्षाच्या लोकसभा मेळाव्यात बोलत होते. यावेळी लवकरच जळगावात पक्षाचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. लोकसभेसाठी जिल्ह्यात पुरक वातावरण असून आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करण्यासाठी एकत्र येवून सज्ज राहावे असे आवाहन नूतन संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी केले. पालकमंत्री…
साईमत जळगाव प्रतिनिधी शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक प्रसंगी धरणगाव तालुक्यातील वराड येथील अनुजा राजु करे या विद्यार्थीनीसोबत घडणार होता. प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दातृत्त्वामुळे तिचे शिक्षण थांबण्याची वेळ टळली आहे. अनुजा ही फॅशन डिझाईनिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण बेंडाळे महिला महाविद्यालयातून घेते आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तीला शिक्षण सोडावे लागणार होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनी सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थेट वराड या गावात जाऊन…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार यांचे दि. १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. सोमवारी विद्यापीठात त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य खैरनार यांचे हृदय विकाराने आकस्मिक निधन झाले. ते साक्री तालुक्यातील निजामपूर – जैताणे येथील आदर्श कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते प्राचार्य परिषदेचे सचिवही होते. त्यांच्यात पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सोमवारी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य खैरनार यांना भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने केलेल्या प्रयत्नात प्राचार्य खैरनार यांचा मोठा वाटा होता अशी भावना प्रा.…
साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना ‘भारतीय भाषा उत्सव’ दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जात असून या निमित्ताने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातही हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जर्मन, जापनीज फ्रेंच व इंग्लिश भाषा अभ्यास विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित काव्यलेखन स्पर्धा, ‘भारतीय भाषा संवर्धनाचे उपाय’ या विषयावरील निबंधलेखन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे मार्गदर्शक अध्यक्ष म्हणून उपस्थित…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या “माजी राष्ट्रपती डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्काराने येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरीफ बागवान यांना गौरविण्यात आले. डॉ. शरीफ बागवान यांनी पत्रकारितेत व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील माजी आमदार कैलास गोरख पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयमचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून शेख, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, माजी सरपंच नेमिचंद सोनार, जिल्हा अप्पर कोषागार शकील देशपांडे, तहसीलदार पंकज लोखंडे , नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर, डॉ. राहुल मयूर ,कबचौ उमवी सिनेट…