Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी दि. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेद्वारा नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परिक्षेत जळगाव येथील अनुराधा रविंद्र खैरनार हिने घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.अनुराधा ही प्रसिद्ध सी.ए. डॉ. रविंद्र खैरनार यांची कन्या आहे.तिला प्रा.सी.ए. यशवंत सेंदाने, सी.ए. करण काबरा यांनी मार्गदर्शन केले.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभाग व वाघ नगर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यां मध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नाट्य व नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाट्न HD फायर चे मिहीर घोटीकर, माजी विद्यार्थी आकाश कांकरिया, केशव स्मृती समूहाचे नितीन चौधरी, जनता बँकेचे अध्यक्ष श्री सतीश मदाने यांच्या हस्ते करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान च्या अध्यक्ष्या शोभा पाटील, सचिव रत्नागर गोरे, अविनाश आचार्य विद्यालयाच्या शालेय समिती प्रमुख व विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहकोषाध्यक्ष हेमलता अमळकर, संचालिका वैजयंती पाध्ये, मुख्याध्यापिका योगीता शिंपी, वाघ नगर शाळेचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२.३० ही वेळ असलेल्या या ‘अनुभूती बालनिकेतन’मध्ये यात ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता अनुभवतातून आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. यासाठी कॅनेडा येथून भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी गायत्री बजाज अनुभूती स्कूलमध्ये कार्यरत झाल्या आहेत. ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते स्वीकारतील अशी ही शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण मिळेल. स्वत:च्या बुद्धीमत्तेचा विकास…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महानगरपालिका व पर्यावरण विभागातर्फे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शासकीय तंत्र निकेतन येथे पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासकीय तंत्र निकेतन मधील तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व, प्रदूषण व त्यामुळे मानवी जीवनावर, शहरावर तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणारे दुष्परिणाम यावर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या वरिष्ठ सल्लागार गीतांजली कौशिक यांनी मार्गदर्शन केले. केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचे महत्व त्यांनी विषद केले. वातावरणातील प्रदूषण मोजण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे, त्याचे मोजमाप, तसेच प्रदूषणावर नियंत्रणाचे उपाय त्यांनी त्यांचे कार्यक्रमात दिले. विद्यार्थ्यांशी हितगूज करतांना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाचे पर्यावरण अधिकारी प्रकाश पाटील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गणेश कॉलनी रोडवरील, तेली समाज मंगल कार्यालय येथे मंगळवार, दि. ९ रोजी संतश्रेष्ठ, संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालावादाप्रमाणे प्रतिमा पूजन व मल्ल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पांडुरंग चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, दिलीप चौधरी, मनोज चौधरी, वासुदेव चौधरी, कैलास चौधरी, दुर्गेश चौधरी, सचिन चौधरी व सचिन पाटील यांची उपस्थिती होती.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या विद्यमाने आयोजित 14 वर्षातील मुले व मुली शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे 8 ते 10 जानेवारी दरम्यान आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातून मुलांच्या ८ मुलींच्या ८ संघांनी सहभाग नोंदवला स्पर्धा बात पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेतून राज्याचा संघ निवड करण्यात येणार आहे. सदर संघ छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल दुपारच्या सत्रात तहसीलदार पंकज लोखंडे (महसूल) यांच्या हस्ते चेंडू टोलवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जालना,येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी दरम्यान राज्यस्तर फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत जळगावला तीन ३ गोल्ड व १ सिल्वर मेडल प्राप्त झाले फेन्टबोल अजिंक्य पदस्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या 19 वर्षातील संघास डबल व ट्रिपल मध्ये गोल्ड मेडल तसेच १७ वर्षे आतील मुलांचे संघाला डबल मध्ये गोल्ड ट्रिपल मध्ये सिल्वर मेडल प्राप्त झाले. 19 वर्षातील मुलांच्या संघ खालील प्रमाणे जाहीद तांबोली ,अर्शद शे ख, गजाली शेख , हस्सान मिर्झा सर्वे सरदार एस के हायस्कूल नगरदेवला चाळीसगाव. १७ वर्षातील मुले सय्यद बिलाल , विकार अहमद ,हाफिज शेख, नवाब शेख, शोएब पटेल, सर्व जळगाव शहर म ना पा उर्दू शाळा नबर, १…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उत्तम आणि यशस्वी डॉक्टर होण्यासाठी जागतिक दृष्टीकोन, आर्थिक व्यवस्थापन आणि ध्येय ही त्रिसूत्री आवश्यक असल्याचा कानमंत्र अ‍ॅस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे मुकुल चिमोटे यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान याविषयी त्यांनी गौरवोद्गार व्यक्त केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लानिंग फॉर इंडीयन एमबीबीएस स्टुडंट टु बिकम ग्लोबल फिजीशियन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, अ‍ॅस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे मुकुल चिमोटे, डॉ. कैलास वाघ, प्रशांत गुडेट्टी उपस्थित होते.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाचा ए एन एम व्दितीय वर्ष निकाल नुकताच घोषित झाला असून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त करीत १०० टक्के निकाल लागला आहे. जयश्री सपकाळे ही ८५.३३ प्रथम,ज्योती हिवराळे ८३.३३ व्दीतीय, पुजा बि—हाडे व प्रांजली सुरवाडे सयुक्‍तरित्या ८०.८३ तृतीय,पौर्णिमा जोहरे ८०.६६ चौथी तर जयश्री चौधरी ही ८०.५० गुण मिळवत महाविद्यालयातून पाचवी आली. या निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रो.विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उज्जैन येथे मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धे साठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी सेंट टेरेसा शाळेचे क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांचा आधिपक्त्या खाली महाराष्ट्र शालेय मल्लखांब १७ वर्षा खालील (मुले व मुली) संघ हा उज्जैन येथे मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धे साठी महाराष्ट्र संघ सहभागी होणार आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून जळगाव येथील सेंट टेरेसा शाळेचे क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नरेंद्र भोई यांचे जिल्हा मल्लखांब…

Read More