साईमत जळगाव प्रतिनिधी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी यावल उप वनसंरक्षक जमिर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजेश एस.लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार व इतर…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव जिल्हा पश्चिम विभाग महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संगीता राजेंद्र गवळी तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जितेंद्र रघुनाथ पाटील यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील – जळकेकर महाराज यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्या सुचनेनुसार दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. खासदार उन्मेश पाटील यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत केले.
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सर्व शाळांचा होणारा रंगतरंग हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू झाला. त्याच्या अंतर्गत या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शककर्ते शिवराय या महानाट्याचा तिसरा भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर व स्वराज्य उभारणीवर आधारित ‘ शिवरायांचा गनिमी ‘ हा कलाविष्कार काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलतर्फे दि. ११ जानेवारी रोजी सादर करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी, प्रकल्प प्रमुख पुंडलिक पाटील, काशिनाथ पलोड स्कूलचे माजी विद्यार्थी अद्वय राजहस होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, प्रतिष्ठानचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे जळगाव येथे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शिखर संमेलनाला आले असता पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी तथा साहित्यिक विनोद अहिरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विनोद अहिरे यांनी संजय पांडे यांना स्वलिखित ‘ हुंकार वेदनेचा’ आणि ‘मृत्यू घराचा पहारा’ हे पुस्तके भेट दिली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्या.
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरूजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ या विषयावर डॉ. संजय गोपाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. गोपाळ यांनी आपल्या व्याख्यानात साने गुरूजींचे जीवन ख-या अर्थाने मानवतावाद व समतेवर आधारित होते. साने गुरूजींच्या ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या कवितेमधुन मानवतावाद धर्माचा सार असल्याचे त्यांनी सांगितले. साने गुरूजींनी सत्याग्रह तसेच अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मंचावर डॉ. संजय गोपाळ, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर चौधरी, विचारधारा प्रशाळेचे प्र. संचालक प्रा. म. सु. पगारे, गणित विभागप्रमुख प्रा. किशोर पवार, केंद्राचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विविध क्रीडा संघ महोत्सव स्पर्धेसाठी रवाना झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दि. १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणा-या क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी विद्यापीठाचे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, टेबलटेनिस संघ सहभागी होण्यासाठी रवाना झाले. तत्पूर्वी दि. ८ ते १० जानेवारी दरम्यान खेळाडूंचा एकत्रित सराव शिबिराचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील उपस्थित होते. डॉ. माहेश्वरी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतांना खेळाडूंनी शिस्त पाळावी व नियमित सराव करावा. नियमित सराव हा अत्यावश्यक असून…
साईमत जळगाव प्रतिनिधी आदिवासी विकास विभाग आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2023 – 2024 दिनांक ७ ते 9 जानेवारी दरम्यान नाशिक येथे झाल्या. सदर स्पर्धेत ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ मोहाडी अंतर्गत डोमगाव तालुका जळगाव आश्रम शाळेची आरती बाला बारेला (इयत्ता ८ वी) या विद्यार्थिनीने वर्षे 14 च्या आतील वयोगटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील आदिवासी विकास विभाग आयुक्तालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व आश्रमशाळेतील विविध खेळांमधील जवळपास १८०० विद्यार्थी सहभागी झाले होते, पैकी वैयक्तिक खेळ प्रकार “लांब उडी” वयोगट वर्षे १४ च्या आतील आरती बाला बारेला इयत्ता ८ वी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ…
साईमत जळगाव प्रतिनिधी देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार असल्याने जळगावातील शानिपेठ परिसरातील संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषात अक्षदा आणि माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती. देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा आनंदोत्सव सुरू असून प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. जळगाव शहरातील शनिपेठेत असलेल्या जय श्रीराम मित्र मंडळ आणि संकल्प महिला मंडळातर्फे अयोध्या येथून आलेल्या मंत्रित अक्षदांचे परिसरात वितरण करण्यात आले. मुख्य चौकात माजी होमगार्ड समादेशक रमेश दलाल यांच्या हस्ते प्रभू…
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील वर्षापेक्षा यावर्षी सुधारणा झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण निकालात जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस Open Defecation Free (ODF) चा दर्जा मिळाला आहे. ओडीएफ म्हणजे ही शहरे उघड्यावरील शौचालयापासून मुक्त आहेत. ओडीएफ प्लस म्हणजे ही शहरे फक्त उघड्यावरील शौचालयापासून मुक्त नसून या शहरात स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह पण आहेत. ओडीएफ प्लस प्लस म्हणजे या शहरांमध्ये FSTP- एफएसटीपी (फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट) मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित आहेत.याठिकाणी सांडपाण्यावर नियमित प्रक्रिया केली जाते. जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा,…
साईमत जळगाव प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाला विरोधात निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना जळगाव महानगर तर्फे काळ्या फिती लाऊन आंदोलन करण्यात आले. निकाला विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून जळगाव चे सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, नीता संगोळे, जया तिवारी, शारदा तायडे, श्रध्दा घोष, युवा सेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, समनवयक महेश ठाकूर, विभाग…