Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिवर्षी रंगतरंग कार्यक्रम आयोजित केला जातो. या महानाट्यामध्ये वाघ नगर मधील विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रसंग सादर केले. यामध्ये शिवरायांचे महिला विषयक धोरण,न्याय व्यवस्था, विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित प्रसंग व नृत्य कलाविष्कार सादर केले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतः नृत्य, गायन ,वादन, निवेदन करत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीराम पाटील उपस्थित होते. तर जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक अनिल राव, व्यावसायिक कुशल गांधी, माजी विद्यार्थी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी युवक दिना निमित्त श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित जळगाव शहर युवक मंडळाच्या वतीने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व ज्याच्या संकलपनेतून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली अश्या राष्ट्रमाता जिजाऊ याची जयंती महाबळ येथील अंबरनील मैदान येथे साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थचे उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, अ. भा. मा. युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, जळगाव शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सचिव हेमंत शिंपी, कोषाध्यक्ष चेतन खैरनार, सुमित अहिरराव, भाजपा महाबळ मंडल अध्यक्ष महेश कापुरे, उज्वल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी युवक प्रवक्ता योगेश…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या १५ शाळा हायटेक होणार असून यासाठीच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 12 कोटी 23 लक्ष 55 हजार 647 इतका निधी मंजूर निधी मंजूर करण्यात आला आहे. भौतिक सुविधांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला- मुलींकरता स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, पेजल सुविधा व हँडवॉश स्टेशन, ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्चुअल क्लासरूमची सुविधा व शाळेला संरक्षण भिंत या सुविधा मंजूर निधीतून होणार असल्याने शिक्षणातून मुलांचा शारीरिक , बौद्धिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे. जळगाव तालुक्यातील पिलखेडा उच्च प्राथमिक शाळा (84 लक्ष 76 हजार), मुनिसिपल स्कुल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मकर संक्रांत सणादरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कोणीही नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री करु नये, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असलेला मांजा असून, ते विक्री करत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करताना गोपाळपुरा मधील गोलु पुरन खिची याच्याकडून नायलॉन मांजाचे १०० नग रिल, सुप्रीम कॉलनी परिसरातील कृष्णा नगर मधील ब्रिजेश राजाराम…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. आपण आपली अस्मिता जपली पाहिजे म्हणजेच ‘भारतीय’ ही ओळख आपली ‘प्रथम ओळख’ असल्याचे प्रतिपादन मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. १२ रोजी “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप” या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते. या परिषदेत मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे संचालक डॉ. राजेश…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये प्रभु श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. यानिमित्ताने आ. राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनात शहरातील १५० हून अधिक मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता इच्छादेवी मंदिरापासून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगावात संपूर्ण ठिकाणी अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठाबाबत चैतन्य निर्माण झाले असून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ या श्रमदानांतर्गत माता इच्छादेवी यांचे दर्शन घेऊन आरती करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील धार्मिक स्थळांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण जळगावात भक्तीमय…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. कष्ट घ्यावेच लागतात कारण कष्टाशिवाय गुणवत्ता प्राप्त होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान टळेल असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभागाव्दारे जागतिक युवा दिनाचे औचित्य साधुन कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी कुलगुरूंनी पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांशी तर दुस-या टप्यात प्राध्यापकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणााले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि माहिती यातील फरक समजून घेणे आवश्यक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील सिंचनाच्या एकूण ९ कामासाठी १० कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून सदर ०९ नवीन मोठे गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधारे बांधण्यात येणार असल्याने दोन्ही तालुक्यात सिंचन क्षमतेत अधिक वाढ होणार आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून धरणगाव व जळगाव तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ०९ गेटेड सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी एकूण १० कोटी २४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार एकूण साठवण क्षमता ७५३.०८१ स.घ.मी.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल मध्ये दि. ११ गुरुवार रोजी शाळेत गणेशोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी मा.डॉ.किरण कुंवर, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, म.न.पा.शिक्षण विभाग अधिकारी दिपाली पाटील, संस्थेचे अध्यक्ष. प्रमोद चांदसरकर, मुखायाध्यापिका प्रिया सफळे, उपमुख्याध्यापक एस.पी.निकम, पर्यवेक्षक जे.एस.चौधरी, जेष्ठ कला शिक्षक एस.डी.भिरूडसर, गणेशोत्सव प्रमुख संगीता पाटील व गणेशोत्सव समिती सदस्य उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुंवर विद्यार्थांशी संवाद साधत म्हणाले की, जीवनात कोणतीतरी कला जोपासली पाहिजे म्हणजे जीवनात डिप्रेशन ला सामोरे जावे लागत नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता पाटील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका दिपाली चौधरी तसेच कल्पना तायडे , मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुमारी वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारून जिजाऊंची माहिती सादर केली, तर काव्या फेगडे या विद्यार्थिनींनी सुद्धा जिजाऊंच्या जीवन कार्याला उजाळा दिला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली तर काहींनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील, कायनात सय्यद, मंगल गोठवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी…

Read More