साईमत जळगाव प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या, अंतिम सामन्यांमध्ये सांगली विभागाचा पराभव करून नाशिक विभागाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता ठरला.
विजेत्या संघात दिव्या ठाकरे , करीना भोपे , आदिती पाटील , दिव्या झोपे , तुलसी कुलकर्णी , सेजल पाटील , खुशी गुजर , विनिता पाटील , अक्षदा तायडे , दुहिता पाटील , प्रेरणा गायकवाड , नित्यांजली सोनवणे आदी खेळाडूंचा सामावेश होता. त्यांना क्रीडा शिक्षक प्रा.डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खेळाडूंचे के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, के.सी.ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, के सी ई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स . ना .भारंबे, उपप्राचार्य के. जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे, .प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर क्रीडा संचालक,(मू जे महाविद्यालय) जिमखाना समिती चेअरमन प्रा. शिल्पा सरोदे , समन्वयक प्रा स्वाती बराटे , कला वाणिज्य शाखा समन्वयक प्रा उमेश पाटील आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.