Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या दि.२३ जानेवारी रोजी नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणूकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्यात शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापनेस दि. २० जानेवारी रोजी ४५ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्थापना दिनाचे औचित्य साधून बँकेचे मुख्यालय सेवा येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यालयात बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल यांचे हस्ते श्री सत्यनारायण महापूजा झाली. स्थापना दिनाचे औचित्य साधून आयसीआयसीआय लोम्बार्डच्या रिजनल मॅनेजर सेजल संपत , सीनियर मॅनेजर आरती मोरे यांनी बँकेसोबत सामंजस्य करार केला. यावेळी मोठ्या प्रमाणात बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधींनी व आमदार राजुमामा भोळे यांनी मुख्य कार्यालयात शुभेच्छा दिल्या. बँक नेहमीच आधुनिक तंत्रज्ञांनाचा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्येपासून देशाच्या कानाकोपऱ्यात राम धुन ऐकू येत आहे. करोडो सनातनी भक्त रामलल्लाच्या भक्तीत रंगलेले दिसतात. ‘राम’ शब्द शक्तिशाली आहे आणि रामायण म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. व्यास गादीवरून रामभक्तांना संबोधित करताना ह.भ.प. दादा महाराज जोशी म्हणाले. अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून, जळगाव शहरातील जी. एस. ग्राउंड येथे शनिवार दि. २० जानेवारी पासून ४ दिवशीय भव्य श्रीराम कथा आयोजित करण्यात आली. या कथेचे निरुपण कथाकार ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी ‘श्रीराम कथा’ सादर करत आहे. दरम्यान, कथेच्या सुरुवातीला प्रस्तावना, रामायण परिचय, रामायणाचा व सदय जीवनान समन्वय, प्रभु राम यांचा परिचय आणि गंगा अवतरण होईल,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आली आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती येत आहे. लालबहाद्दूर शास्त्री टॉवरवर प्रभू श्रीरामांचे विराट दर्शन श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ८०…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि २२ जानेवारी रोजी होत असून या सोहळ्याला जाण्यासाठी संत नामदेव महाराजांचे १७ वंशज ह. भ. प. निवृत्ती व मुरारी नामदास महाराज १० वारकरी बांधवांसह १९ जानेवारी रोजी कृषीनगर एक्सप्रेस ने निघाले आहेत. त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी श्रीराम च्या जय घोषात स्वागत करण्यात आले. जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ७:१५ वाजता श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव तसेच गणनाम परीवार राम भक्तांच्या वतीने त्यांचा पुष्प हार व संस्थेचा मानाचा गमछा व भगवी शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक एकनाथराव बबन टेलर यांनी खास अयोध्येध्येतील श्रीराम मंदिर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गेल्या ३ दशकातील शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील ईनोवेशन विद्यापीठातर्फे भरत अमळकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनरिस कौसा (डी.लिट.) या पदवीने महराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले. भरतदादा अमळकर यांच्या शिक्षण व सामाजिक उद्योजकता या दोन क्षेत्रातील ३ दशकांच्या नाविन्य व वैविध्यपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ तसेच सीव्हील ईंजीनिअर व बांधकाम व्यावसायीक असलेले भरतदादा यांना डॅाक्टरेट पदवी देण्यात आली. ते शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रात गेल्या 30 -32 वर्षापासून कार्यरत आहेत. श्रध्देय डॉ. अविनाश आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भरतदादांनी विवेकानंद प्रतिष्ठानची स्थापना केली.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन मार्च २०२४ अखेर एकही अपील प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी‌ दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, आयोगाचे कक्ष अधिकारी उदय कांनंव, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके आदी उपस्थित होते. श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, जनतेला पारदर्शक,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेतून विजयी झालेल्या संघातून के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ मुली व २ मुले अशी सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिव्या ठाकरे, दिव्या झोपे, खुशी गुजर, विनिता पाटील या ४ मुली आणि आयुष बेंडाळे व वैभव बारी या २ मुलांची शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर स्पर्धा गारखेडा रोड छत्रपती…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी जिल्हा दौऱ्यावर आल्या असता अधिसूचित लोकसेवा पुरविणाऱ्या कार्यालयाचे तपासणीचा भाग म्हणून आयोगाने प्रभाग समिती क्रमांक १ चे कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली. वं कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तदनंतर मनपा सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी कक्ष अधिकारी उदय कानव्व, सहाय्यक कक्षा अधिकारी प्रशांत घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी मनपाचे अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त करून निर्देश दिले की, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा नागरिकांना वेळेत द्यावी. या अधिनियमान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक गतिमान व कालबद्ध…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्याला होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे आकर्षक कटआऊटसह सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर चौक, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात येत आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येणार आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती होईल. श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते…

Read More