शिवसेना नेते आदित्य ठाकरे १५ रोजी जिल्हा दौऱ्यावर

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून सकाळी ११.३० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक जळगाव शहर, दुपारी २ वाजता आठवडे बाजार शिरसोली, दुपारी ४ वाजता कस्तुरीबाई नंदराम मंत्री माध्यमिक विद्यालय मैदान कासोदा (ता.एरंडोल), सायंकाळी ६ वाजता भडगाव शेतकरी सहकारी संघ मैदान, भडगाव येथे सभेला संबोधित करणार आहेत.

शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, दिपकसिंग राजपूत, वैशाली सुर्यवंशी, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील, महानंदा पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवा जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, चंद्रकांत शर्मा सभेचे नियोजन करीत आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सदर सभा जळगाव लोकसभा मतदारसंघातील ‌चार विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीवर आदित्य ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सदर सभांना जास्तीत ‌नागरिकांनी व युवकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here