स्नेहसंमेलनाचे दिवस भारावलेले, आनंदमय असतात – अॅड.प्रविणकुमार जंगले

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

बक्षीस मिळणे तात्पुरती बाब आहे. स्नेहसंमेलन आपण भाग घेतला ही बाब कायम स्मरणात राहते. स्नेहसंमेलनाचे हे दिवस भारावलेले, आनंदमय असतात, असे प्रतिपादन केसीई सोसायटीचे सह सचिव अॅड. प्रविणकुमार जंगले यांनी केले. ते मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘चैतन्य २०२३-२४’ या स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे होते. प्रमुख अतिथी म्हणून केसीई सोसायटीचे सह सचिव अॅड. प्रविणकुमार जंगले, केसीई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे म्हणाले की, धैय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, त्यासाठी तुम्हाला वेड म्हंटल तरी चालेल , वेडी लोकच इतिहास घडवतात. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात एक वेगळा आयाम निर्माण करा, प्रयत्न इतके करा की आपण मानत असलेल्या ईश्वराला ही ते देणे भाग पडले पाहिजे.
या नंतर स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.संगीता पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये निवृत्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या नंतर विविध कला गुणांमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते विविध स्वरूपातील बक्षीसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कंचन पाटील हिने बहुमान मिळवला. त्याचप्रमाणे ‘प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर’ म्हणून तनुजा सैनी (वाणिज्य व व्यवस्थापन शाखा), श्रेयस मोरे (विज्ञान व तंत्रज्ञान शाखा), सृष्टी पाचभाई (मानव्यविद्या शाखा), कुणाल जाधव ( आंतरविद्या शाखा) या विद्यार्थ्यांनी मान मिळवला. चैतन्य २०२३-२४ च्या दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठेचा ‘ मुल्जियन गायक’ हा बहुमान अथर्व मुंडले या विद्यार्थ्याने मिळवला.
कार्यक्रम प्रसंगी विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ.के.जी.खडसे, सामाजिकशास्त्रे प्रशाळा संचालक प्रा.देवेंद्र इंगळे , भाषा प्रशाळा संचालक प्रा. डॉ .भूपेंद्र केसुर, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख प्रा.डॉ.सुरेखा पालवे, परीक्षा नियंत्रक डॉ.लीना ढाके, कुलसचिव डॉ.जगदीप बोरसे , व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख प्रा.अब्दुल आरसीवाला, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. केतन नारखेडे, समिती सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी २२ समितीप्रमुख व समिती सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here