साईमत जळगाव / ( रानकवी ना. धो महानोर व्यासपीठ) प्रतिनिधी “मराठीला आपण जगविण्याची गरज नाही , आपल्या जगण्यासाठी मराठी जगली पाहिजे हा दृष्टीकोन आपण स्विकारला पाहिजे, मराठीला समृद्ध करण्यात सामान्य माणूसच महत्वाचा आहे”असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केली. पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पुरुषोत्तम नारखेडे स्मृती सतराव्या बहिणाई सोपानदेव खानदेश संमेलनाचे उद्घाटन गुडसूरकर यांच्या हस्ते दि .११ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. संजीवकुमार सोनवणे होते. व्यासपिठावर माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, जयश्रीताई महाजन, स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे, उपप्राचार्य वा. ना…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कार्याचा सुगंध आणी बुद्धीचा प्रकाश याला जीवनात महत्व आहे. लेखक मनोहर राणे यांची पुस्तके जीवनदर्शक आहे. श्रीमदभगवद्गीता आत्मोन्नतीचा मार्ग आहे. आयुष्यात आपण स्वतःसाठी जगणे राहून जाते. त्यासाठी कुठेतरी स्वतःला जाणून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी केले. सेवानिवृत्त शिक्षक मनोहर देवचंद राणे लिखित “भगवतप्रणीत जीवनरेखा (सकल जनांसाठी)” व “म्हाताऱ्यांनो आनंदात जगा, सुखाने निरोप घ्या…” या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी दि. ११ रोजी संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पीपल्स बँकेचे मार्गदर्शक भालचंद्र पाटील, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे, हभप दादा…
साईमत जळगाव प्रतिनिधी मोदी सरकारच्या योजना समाजविण्यासाठी भाजप नेत्यांचे ‘गाव चलो अभियान’ सुरू आहे. या अभियाना अंतर्गत दिनांक ९ फेब्रुवारी रोजी भाजपा जळगाव जिल्हा महानगर मंडल क्र ९ येथे आमदार राजुमामा भोळे यांनी घरोघरी जाऊन योजनांची पत्रके वाटत, केंद्र व राज्य सरकारी योजनांचा लाभ, विविध विकासकामे आदींची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी ‘गांव चलो अभियानात’ देशभरात सुरू असून. जळगाव जिल्हयात देखील या अभियानाला सुरुवात झाली असून जळगाव जिल्हा महानगरातील बूथ क्रमांक ३१९ येथे प्रवासी कार्यकर्ता म्हणून जबाबदारी घेत आमदार राजुमामा भोळे यांनी घरोघरी जाऊन योजनांची पत्रके वाटली, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना मोदी…
साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून सकाळी ११.३० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक जळगाव शहर, दुपारी २ वाजता आठवडे बाजार शिरसोली, दुपारी ४ वाजता कस्तुरीबाई नंदराम मंत्री माध्यमिक विद्यालय मैदान कासोदा (ता.एरंडोल), सायंकाळी ६ वाजता भडगाव शेतकरी सहकारी संघ मैदान, भडगाव येथे सभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, दिपकसिंग राजपूत, वैशाली सुर्यवंशी, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील, महानंदा पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज…
साईमत जळगाव प्रतिनिधी ग्राम संवाद युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा नाविन्यपूर्ण रीतीने प्रभावी वापर करावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अंबिका जैन यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, समन्वयक उदय महाजन, प्रा. डॉ. अश्विन झाला, यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील व यात्रा प्रमुख प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. आपल्या मनोगतात अंबिका जैन पुढे म्हणाल्या की, ग्राम संवाद यात्रेचे अनुभव ऐकताना मलाही यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. बारा दिवसात आपण सर्व एकाच परिवाराचे सदस्य झालात हि खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आमच्या जैन परिवारातही वेगवेगळ्या वयोगटातील १८ सदस्य एकत्रित राहतात याचा अनुभव…
साईमत जळगाव प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची बद्धा स्वच्छता आमचा ध्यास’ या अभियानात प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची जिल्ह्यातील चार तालुक्यात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने, प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची व्याख्याने, शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील विधी क्षेत्रातील ॲड. संजय राणे आणि उद्योग क्षेत्रातील किरण राणे यांचे वडिल मनोहर देवचंद राणे यांनी अथक अभ्यास व अनुभवाच्या जोरावर लिहिलेल्या अधात्म व धार्मिक विषयावरील भगवत्प्रणित जीवनरेखा व म्हाताऱ्यांनो आनंदात जगा व सुखाने निरोप घ्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (दि.११) रोजी सायं. ५.३० वाजता मायादेवी नगर येथील रोटरी भवनात होणार आहे. मनोहर राणे हे इंग्रजीचे शिक्षक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीतेतील काही श्लोकांचे मराठीत निरूपणाचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे अध्यात्म व धार्मिक विषयात वाचन वाढले. संतांचे लेखन त्यांनी वाचले. यातूनच गीतेतील काही निवडक श्लोक व संत वचने या विषयावर राणे यांनी मराठीत लेखन…
साईमत जळगाव प्रतिनिधी जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक ९ ते १० फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या स्पर्धांमध्ये १७ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींचे एकूण ३३ संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी तसेच तायक्वांडो प्रशिक्षक अजित…
साईमत जळगाव प्रतिनिधी बक्षीस मिळणे तात्पुरती बाब आहे. स्नेहसंमेलन आपण भाग घेतला ही बाब कायम स्मरणात राहते. स्नेहसंमेलनाचे हे दिवस भारावलेले, आनंदमय असतात, असे प्रतिपादन केसीई सोसायटीचे सह सचिव अॅड. प्रविणकुमार जंगले यांनी केले. ते मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘चैतन्य २०२३-२४’ या स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे होते. प्रमुख अतिथी म्हणून केसीई सोसायटीचे सह सचिव अॅड. प्रविणकुमार जंगले, केसीई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे म्हणाले की, धैय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, त्यासाठी तुम्हाला वेड म्हंटल तरी चालेल , वेडी लोकच इतिहास घडवतात. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात एक…
साईमत जळगाव प्रतिनिधी पहिला सामना ओम ज्वेलर्स विरुद्ध मनीगुरु यामध्ये मनीगुरु विजयी यामधे ओम ज्वेलर्स संघाने ७९ धावा केल्या होत्या त्या बदल्यात मनीगुरु संघाने ५.३ षटकात ८१ धावा करीत हा सामना ८ गडी राखून विजय मिळवला. दुसरा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी विरुद्ध के. पी. इंटरप्रायजेस यामध्ये अजय बाविस्कर आणि कंपनी विजयी या दोनही संघादरम्यान अजय बाविस्कर आणि कंपनी संघाने १० षटकात ६ गाडी मोबदल्यात १४२ धावा केल्या होत्या त्याबदल्यात के.पी.इंटरप्रायजेस संघाने १० षटकात १२५ धावा केल्या हा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी संघाने १७ धावांनी जिंकला. तिसरा सामना पियुष हॉस्पिटल विरुद्ध एकविरा प्लाय यामध्ये पियुष हॉस्पिटल विजयी या दोनही…