साईमत जळगाव प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील मांडेवेदिगर/भिलमळी/गारखेडा येथील गावकरी शेत जमिन भोगवटा वर्ग (२) ची भोगवटा वर्ग (१) करुन रितसर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करून मिळाव्या या मागणीसाठी जळगाव येथे आमरण उपोषणास बसले आहे. दि. १३ रोजी भाजपाचे जळगाव पुर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी उपोषणस्थळी गावकऱ्यांची भेट घेत चर्चा केली. सकारात्मक चर्चा होऊन गावकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास होकार दिला. यावेळी अमोल जावळे यांनी उपोषण कर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडविले. भुसावळ तालुक्यातील मांडेवेदिगर/भिलमळी/गारखेडा येथील शेत जमिन भोगवटा वर्ग (२) ची भोगवटा वर्ग (१) करुन रितसर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करून मिळाव्या या मागणीसाठी गावकरी आमरण उपोषणास बसले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी डाळ उद्योग, चटई उद्योग, पाईप व ड्रिप उद्योग अशा विविध उद्योगांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव गगनभरारी घेत असतांना आता स्मार्ट फार्मास्युटिकल्सने जळगावचे नाव फार्मा क्षेत्रातसुद्धा गाजवले आहे. लघु उद्योग क्षेत्रातील फार्मा मधील शासनाच्या ‘‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एक्सपोर्टर’’ हा पुरस्कार एक नव्हे दोन नव्हे तर सलग ४ वर्षांसाठी म्हणजे सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ साठीचा हा पुरस्कार स्मार्ट फार्मास्युटिकल्सने प्राप्त केला आहे. पुणे येथे नुकतेच झालेल्या समारंभात राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत, यांच्या हस्ते तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदींच्या उपस्थितीत हॉटेल टिपटॉप येथे…
साईमत जळगाव प्रतिनिधी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नुकतेच बहिणाबाई साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय “आदर्श समाजसेवक पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील आदिवासी,अनाथ,गरीब, गरजू, वृद्ध अशा विविध घटकांसाठी कार्य करत आहे. या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष आर. डी.कोळी यांना डॉ. अरविंद नारखेडे यांच्या हस्ते माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, मायाताई धुप्पड, वा.ना.आंधळे, भास्करराव चव्हाण, डॉ. शैलजा करोडे, विलास नारखेडे, विजय लुल्हे, तुषार वाघुळदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रत्यक्ष गावात राहून अभ्यास करण्यासाठी क्षेत्र कार्यकर्ता असलेल्या विद्यार्थ्यास ‘आदि मित्र’ म्हणून नियुक्त करण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळा येथे एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता (आदिमित्र) प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जिल्हा नियोजन समिती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही कार्यशाळा घेण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत पेसा क्षेत्र गावांच्या गरजांवर आधारीत अभ्यास करण्यासाठी विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळा समाजकार्य विषयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आदिमित्र यांना जिल्हयातील आदिवासी पेसा अंतर्गत असलेल्या ६३ (चोपडा-२५,…
साईमत जळगाव प्रतिनिधी मराठा प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट क्रिकेट स्पर्धा सागर पार्क येथे दिनांक १ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान सुरु होत्या दि. ११ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना अजय बाविस्कर आणि कंपनी व विनोद इंजिनियरिंग या संघ दरम्यान पार पडला. हा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी या संघाने जिंकला. या सामन्यात्त विनोद इंजिनियरिंग या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित १० षटकात १२१ धावा केल्या होत्या. त्याच्या उत्तरात अजय बाविस्कर आणि कंपनी या संघाने निर्धारित १० षटकात ४ गाडी गमावून १२२ धावा केल्या. या सामन्यात जय बाविस्कर आणि कंपनी च्या कर्णधार हितेश मराठे याने २३ चेंडूत ५८ धावा केल्या.…
साईमत जळगाव प्रतिनिधी गृहमंत्री अमित शाह गुरुवार दिनांक १५ रोजी जळगावला येत असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील सागरपार्कची पाहणी केली जिल्ह्यातील यावेळी आमदार सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा जळगाव येथे पहिल्यांदाच येतं असून सागर पार्क मैदान युवा संमेलन करिता निश्चित करण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी सभामंडप व इतर व्यवस्थे संदर्भात चर्चा करण्यात आली.
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील सागर पार्कवर येत्या गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून कामाला लागा असे आवाहन मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमीत्त जळगाव क्लस्टर नियोजन बैठकीचे आयोजन भाजपच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आले होते. त्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी भाजपचे जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी,…
साईमत जळगाव प्रतिनिधी मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर (एमपीजे) चे भारतातील सर्वसमावेशक विकासाच्या विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि विकास प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यासाठी एक पाऊल सर्वसमावेशक विकासाकडे या विषयाखाली राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले. चळवळीचे उपाध्यक्ष महमूद खान म्हणाले की, देशात अशी काही उदाहरणे आहेत की, ज्यामध्ये स्वत:च्याच देशातील नागरिकाला चपला घालून प्यायला पाणी दिले जाते. आजही लोक समानतेसाठी तळमळत आहेत. देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे. यामुळेच मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (एमपीजे) ला सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलणे भाग पडले आहे. एमपीजे च्या व्हिजनबद्दल बोलताना मुहम्मद अनीस म्हणाले की, संविधानाने देशातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखण्याची…
साईमत जळगाव प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होत्या. श्रम साधना बॉम्बे ट्रस्टच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय बांभोरी, जळगावच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचे परिश्रम घेउन सोने केले व यश संपदित केले. या भरती मोहिमेत महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या मध्ये गणेश चव्हाण, अनिल वाडीले, सौरभ बिऱ्हाडे, विपुल भीमजियानी यांची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली आहे. तसेच गणेश अहिरे, गौरी काळे, गायत्री पाटील, क्रांती पाटील, चंद्राणी मराठे यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी ज्ञानआणि कौशल्याचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक अडचणी सोबतच आपले मनस्वास्थ्य ही चांगले ठेवावे, खुल्या मनाने जगावे असे सांगत आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी आयोजित जेष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक मेळाव्या प्रसंगी बोलत होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव तर्फे कांताई सभागृहात एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा ५०० जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेडक्रॉस सीनियर सिटीजन व समुपदेशन समितीचे चेअरमन धनंजय जकातदार यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक अडचणी सोबतच आपले मनस्वास्थ्य…