साईमत जळगाव प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होत्या. श्रम साधना बॉम्बे ट्रस्टच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय बांभोरी, जळगावच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचे परिश्रम घेउन सोने केले व यश संपदित केले. या भरती मोहिमेत महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या मध्ये गणेश चव्हाण, अनिल वाडीले, सौरभ बिऱ्हाडे, विपुल भीमजियानी यांची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली आहे. तसेच गणेश अहिरे, गौरी काळे, गायत्री पाटील, क्रांती पाटील, चंद्राणी मराठे यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे.
निवड झालेले विद्यार्थी ज्ञानआणि कौशल्याचा समाजसेवेसाठी सर्वोत्तम योगदान देतील अशा शुभेच्छा व अपेक्षा महाविद्यालया तर्फे व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक, उपप्राचार्य डॉ एस बी पवार,स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एम हुसेन, प्लेसमेंट समन्वयक प्रा. पंकज पुनासे, विभागातील सर्व शिक्षकयांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.