भुसावळ तालुक्यातील ग्रामस्थांचे आश्वासना नंतर सुटले उपोषण

0
9

साईमत जळगाव प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील मांडेवेदिगर/भिलमळी/गारखेडा येथील गावकरी शेत जमिन भोगवटा वर्ग (२) ची भोगवटा वर्ग (१) करुन रितसर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करून मिळाव्या या मागणीसाठी जळगाव येथे आमरण उपोषणास बसले आहे. दि. १३ रोजी भाजपाचे जळगाव पुर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी उपोषणस्थळी गावकऱ्यांची भेट घेत चर्चा केली. सकारात्मक चर्चा होऊन गावकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास होकार दिला. यावेळी अमोल जावळे यांनी उपोषण कर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडविले.

भुसावळ तालुक्यातील मांडेवेदिगर/भिलमळी/गारखेडा येथील शेत जमिन भोगवटा वर्ग (२) ची भोगवटा वर्ग (१) करुन रितसर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करून मिळाव्या या मागणीसाठी गावकरी आमरण उपोषणास बसले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना मिळाली होती. दरम्यान भुसावळ विधानसभेचे आमदार संजय सावकारे कामानिमित्त विधानसभा क्षेत्राबाहेर असल्यामुळे अमोल जावळे यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत उपोषणस्थळ गाठले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्यावर उपस्थितीत सर्व गावकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास होकार दिला. दरम्यान, या सर्व गावकऱ्यांच्या समस्या ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मार्गी लावून देण्याचे तसेच याप्रकरणी भुसावळ विधानसभेचे आमदार संजय सावकारे यांच्या सोबत बोलुन या प्रश्नी लवकरात लवकर मंत्रालयात हेअरिंग लावण्याचे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here