Author: Saimat

चाळीसगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. या घटनेत कारमधील चाळीसगाव येथून जवळच असलेल्या जामडी येथील परदेशी कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यात जामडी गावातील तिघे आणि वडजी (ता.भडगाव) येथील एकाचा मृत्यू झाला. जामडीतील तिघा मृतांवर २४ रोजी दुपारी १२ वाजता हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. गावात एकाचवेळी तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे गावात एकाही घरात चूल पेटली नाही. तिघेही घरातील कमावते असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कारावेळी तिघांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. गावातील विजयसिंग परदेशी (वय ५८), चतरसिंग परदेशी (वय ३८) आणि…

Read More

सोयगाव : विजय चौधरी जरंडी शिवारात एकापाठोपाठ एक दोन बिबटे अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यानंतर पाहिल्या नर बिबट्याचा दि.२३ मृत्यू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी दि.२४ मादि बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळला होता.परंतु उपचारासाठी वेताळ वाडीच्या रोपवाटिकेत दाखल असलेल्या या मादी बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतल्याने सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे. जरंडी शिवारात दि.२४ पहाटे एका शेतात मादी  बिबट अत्यावस्थ स्थितीत असल्याची माहिती वनविभागास मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थितीवरून लगेचच रेस्क्यू टीम व डॉक्टरांना सूचित करण्यात आले व वनाधिकाऱ्यांनी बिबट्यास उपचाराकरिता लगेच वेताळवाडी रोपवाटिका याठिकाणी हलविले. त्याठिकाणी तीन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व सोयीसुविधाची व्यवस्था करून अत्याधुनिक…

Read More

मुंबई : प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी त्यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करुन कायदेशीर प्रकिया सुरु केली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याबाबत २५ मार्च रोजी पुढील कार्यवाही होईल. ममता बॅनर्जी यांच्यातर्फे माजी खासदार अँड मजीद मेमन यांनी बाजू मांडली. एक डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीत अवमान झाल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. याबाबत ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचा व त्यांना समन्स बजावण्याचा…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडी गावाजवळील नदी पात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. या प्रकरणी दोन जणांविरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास डीवायएसपी विवेक लवांड हे गस्तीवर असताना इरफान तडवी हा त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीचे लाल रंगाच्या ट्रॅक्टरद्वारे विना परवानगी वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. ही कारवाई बंडू चौकाकडे जाणाऱ्या संभाजी नगर जवळील पुलावर करण्यात आली आहे. यावेळी शेख सौद शेख शाकीर याला पोलिसांची चाहूल लागताच ताे पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर व बजाज प्लॅटिना मोटारसायकल असा एकूण दोन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगुन दहशत पसरविणारा सागर प्रकाश ढिके (वय २१) रा. टाहकळी ता. भुसावळ याला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने अटक केली. दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, व एक जिवंत काडतुस असा एकुण ५९००० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे कि, जळगाव जिल्ह्यात अग्नीशस्त्रासह गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना अग्नीशस्त्र बाळगणारे लोकांची माहीती काढुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानुसार किरणकुमार बकाले यांना टाहकळी ता. भुसावळ बौध्दवाडयात संशयित सागर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने (तिथी प्रमाणे) दिनांक 21 मार्च रोजी आयोजित करण्याचा आले आहे. तशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शिक्षकवृंदान/क्रीडाशिक्षक आणि समाजसेवक यांचा कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.तरी आपल्या क्षेत्रातील केलेले कामगिरीचे प्रमाणपत्र हस्तलिखित अर्ज धर्मरथ फाउंडेशनकडे पोहोचवण्याची विनंती संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले आहे. छाननी समिती द्वारे आपले अर्ज छाननी करून योग्य व्यक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न आमची संस्था करीत आहे.

Read More

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हे दर कमी होण्याचे नावच घेत नाहीत. त्यातच एखादे वाहन सांभाळणे आता कठीण होऊन बसले आहे. महिनाभर गाडी चालवल्याने आता लोकांच्या खिशाला मोठा फटका बसू लागला असून इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहनचालकही वैतागले आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण आज अशा काही टिप्स जाणून घेऊया, ज्यांच्या मदतीने तुम्ही एका महिन्यात बरेच पेट्रोल वाचवू शकता आणि यामुळे तुमचे बजेट थोड्याफार प्रमाणात का होईना, पण नक्कीच सुधारेल गाडीवर अनावश्यक वस्तू ठेवू नका कारची रचना एयरोडायनामिक्स म्हणजेच वायुगतिशास्त्रानुसार केली गेली आहे, परंतु काही गोष्टी हवेच्या अचूक प्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे कारवरील हवेचा दाब वाढतो. याचा सरळ…

Read More

मुलींच्या मेकअप किटमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक महागडे प्रोडक्ट मिळतील. तसेच लिपस्टिक हे मेकअप मधलं सर्वात महत्वाचे ब्युटी प्रॉडक्ट आहे. लिपस्टीकमुळे ओठचं नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलते. यामुळे महिलांच्या पर्समध्ये लिपस्टीक असतेच. त्यातच आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टीक मिळत आहेत. यात न्यूड, वेलवेट, लिक्विडही लिपस्टीक आल्या आहेत. मुलींचे सौंदर्य वाढवण्यात मेकअप उत्पादनांचा महत्त्वाचा वाटा असतो. मेकअप किटमध्ये अशी अनेक उत्पादने आहेत, जी वर्षानुवर्षे वापरली जात नाहीत. जुन्या लिपस्टिकमुळे ओठांचे नुकसान होऊ शकते तुम्हाला माहीत आहे का की औषधांप्रमाणेच मेकअप प्रोडक्ट्सची देखील एक्स्पायरी डेट असते, त्यानंतर ही उत्पादने वापरणे त्वचेसाठी हानिकारक असते? या उत्पादनांमध्ये, महिलांच्या आवडत्या लिपस्टिकबद्दल जाऊन घेणार आहोत. जुनी लिपस्टिक…

Read More

लखनऊ : वृत्तसंस्था अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचे वेड सर्वसामान्य प्रेक्षकांनसोबतच क्रिकेटपटूंनाही लागले आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावरील अल्लू अर्जुनच्या दाढीखालून हात फिरवण्याच्या स्टाइलची अनेकजण कॉपी करत आहे. अल्लू अर्जुनच्या याच स्टाइलची रवींद्र जडेजाने सुद्धा कॉपी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लखनऊ येथे टी-२०मध्ये विकेट पडल्यानंतर जडेजाने फिल्मी स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, अशा प्रकारचे रिएक्शन आपण सर्वांनीच कुठेतरी पाहिले असेल. खरं तर, गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एका मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम पोलिसांनी सांगितले की, मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आधीही महेश मांजरेकर यांच्यावर त्यांच्या ‘नय वरण भट लोंचा कोन नाय कोचा’ या मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वकील डीव्ही सरोज यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांचे अतिशय आक्षेपार्ह चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट 14 जानेवारीला सिनेमागृह आणि ‘ओटीटी’मध्ये प्रदर्शित झाला आहे. तक्रारीनुसार, हा…

Read More