मुंबई : प्रतिनिधी पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. यामाहा एफझेड एस एफ1 ड्युअल डिस्क (2014 Yamaha FZ S FI (V 2.0) Dual Disc) असं या या बाईकचं नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. यामाहाची ही बाइक bikedekho नावाच्या…
Author: Saimat
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मार्च महिन्यात तुमचे जर बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या मार्च महिन्यात एक-दोन नव्हे तर बँकेला तब्बल 13 दिवस सुटी असणार आहे. बँक तेरा दिवस बंद राहणार असल्याने तुमच्या बँकेतील (Bank) कामाचा खोळांबा होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमची बँकेतील पेंडिग कामे लवकरात लवकर उरकून घ्या. जर मार्च महिन्यात तुम्ही बँकेत जाणार असाल तर आधी त्या दिवशी बँकेला सुटी नाहीना याची खात्री करा, आणि नंतरच बँकेत जा. मार्च महिन्यात 1 मार्च महाशिवरात्री, 6 मार्च रविवार, 12 मार्च दुसरा शनिवार, 13 मार्च रविवार, 18 मार्च धूलिवंदन, 20 मार्च रविवर, 26 मार्च चौथा शनिवार…
आरोग्य वार्ता वाढते प्रदूषण, धुळ, माती, उन्ह आदींचा दुष्परिणाम त्वचेवर होत असतो. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे उन्हामुळे त्वचा कालवंडते. त्यामुळे अनेकांकडून या दिवसांमध्ये त्वचेची अधिक काळजी (Skin care) घेतली जात असते. परंतु असे करीत असताना आपण त्वचेसाठी काय वापरतोय, याला अधिक महत्व असते. अनेक जण कृत्रिम फेसवॉशसारखे प्रोडक्ट वापरत असतात. परंतु यातून त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरात असलेल्या वस्तूंचा वापर फेसवॉश म्हणून करू शकता. त्यांचा फायदा असा आहे की त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि खर्चही जास्त नाही. या लेखात आपण असेच काही घटक पाहणार आहोत, ज्यांच्या वापरातून तुम्ही घरगुती…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आयोजित औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.राज्यपालांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्याच्या विरोधात आज जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. पोलीसांनी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून ताब्यात घेतले आहे. राज्यपाल वक्तव्या ? गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे कोशारी यांनी म्हंटल राज्यपालांच्या या आक्षेपार्ह…
जळगाव :प्रतिनिधी फर्दापूर येथील बसस्थानकाजवळील पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाने सावधगिरी बाळगून कारमधील ६ जण खाली उतरल्याने जीवितहानी टळली. अभिजित नरवडे (रा. गजानन महाराजनगर, भुसावळ) हे भुसावळ येथून कारने (एमएच २० डीजे २१०७) भुसावळवरून औरंगाबादला वडील भारत नरवडे, आई, बहीण, चार वर्षांची भाची व एक नातेवाईक महिला असे एकूण सहा जण मावशीच्या मुलीच्या लग्नाला जात होते. कार फर्दापूरला आल्यावर कारमधून अचानक धूर येत असल्याचे अभिजित नरवडे यांना दिसले. त्यांनी कार बसस्थानकाजवळील पुलावर थांबवली व कारचे बोनेट उघडण्याचा प्रयत्न केला. ते उघडले नाही व आग सुरू झाली. त्यांनी सावधगिरी बाळगत लागलीच कारमधून सर्वांना बाहेर…
जळगाव : प्रतिनिधी रेल्वे प्रवासात दोन प्रवाशांचे महागडे मोबाइल लांबल्याची घटना २६ रोजी घडली होती. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हे दाखल होते. तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे व गुप्त माहितीच्या आधारे केवळ बारा तासांत दोन संशयितांना अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि , शुभंग भूपेंद्रसिंह (रा.पटेल रोड, सूरत) आणि पुष्पराज संतोष कुछवाह (रा.सतना) हे २६ फेब्रुवारीला वेगवेगळया रेल्वे गाडीतून प्रवास करत होते. त्यांचे १ लाख ३४ हजार ३९९ रूपये किमतीचे महागडे तीन मोबाइल चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. भुसावळ लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मीना यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ६ प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांच्याहस्ते झाले. तसेच त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील इतर कामांचे देखील भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले. अनेकदा विकासकामांचे भूमिपूजन होते परंतु अनेक महिने कामांना प्रत्यक्षात सुरुवात देखील होत नाही, काही कामे तर वर्षानुवर्ष रखडल्याचे अनेक अनुभव नागरिकांना आलेले असतात. मात्र चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या विकासकामांचा पॅटर्नच वेगळा निर्माण केला असून ज्यादिवशी रस्त्यांचे भूमिपूजन केले त्याच दिवशी शहरातील रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु देखील झाले. विकासकामांच्या “मंगेश पॅटर्न” ची चाळीसगावात जोरदार चर्चा असून शब्द देणारा व तात्काळ पाळणारा लोकप्रतिनिधी…
फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी शहरातील – श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, लीना चेतन तळेले रा. खिरोदा ता. रावेर ह.मु. श्रीकृष्ण नगर, फैजपूर ह्या पती चेतन अरूण तळेले यांच्यासह वास्तव्याला आहे. चिनावल यथ तलाठी म्हणून नोकरीला आहे. लिना तळेले यांच्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने २६ फेब्रुवारी रोजी फैजपूर येथील घराला कुलूप लावून चिनावल येथे कामाला गेले. अतिरिक्त पदभार असल्यामुळे घरी जाण्यास उशीर होईल म्हणून…
जळगाव : प्रतिनिधी: शहरातील विसनजीनगरातील 26 कामगारांनी दि.26 रोजी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. शहर संघटक रत्नाकर खरोटे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला. शहर संघटक रत्नाकर खरोटे यांच्या संपर्क कार्यालयात पार्टीचे शहर प्रवक्ते चंदन पाटील, यांच्या उपस्थितीत महानगर प्रमुख योगेश हिवरकर यांच्या उपस्थितीत हा सामुहीक प्रवेश करण्यात आला. आम आदमी पार्टीत प्रवेश करणाऱ्यां कार्यकर्त्यांमध्ये कैलास चौधरी, रविंद्र सोनवणे, प्रविण सोनवणे, हरून शेख, वसंत बारी, प्रकाश सोनवणे, विशाल पाटीर्ल, विक्रम सोनवणे, योगेश बारी, प्रशांत पाटील, रघुनाथ साळवे, श्रीराम बारी यांच्या सह आदींचा समावेश आहे.