भुसावळ : प्रतिनिधी शहरात पालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम राबवणे सुरू आहे. शुक्रवारी खडका रोडवर चांगलाच राडा झाला. खडका रोड भागातील एम.आय.तेली बिल्डर कार्यालया समोरील गटारी वरील ढाप्याचे अतिक्रमण काढणे सुरू होते. यावेळी पालिकेचे माजी गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली यांनी पथकाला अटकाव केला. हा वाद सोडवण्यासाठी आलेले पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिविगाळ, धक्काबुकी केली. त्यामुळे पोलिसांनी आशिकला अटक करुन शासकीय कामात अडथळा, लोकसेवकास मारहाण, धक्काबुकी, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात पालिकेने शहर पोलिस ठाणे हद्दीत १४, तर बाजारपेठ च्या हद्दीत ५४ अशी ६८ अतिक्रमणे नष्ट केली. पालिकेने गुरुवारपासून जळगाव रोड, हंबर्डीकर चौक, जामनेर रोडवरील…
Author: Saimat
जामनेर : प्रतिनिधी २७ फेब्रुवारी थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील मराठी कलाकार , कवी, नाटककार , पत्रकार , शिक्षक , नृत्यकार यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्वांचे आकर्षण सावन मा महिना मा चे सिनेस्टार सचिन भाऊ कुमावत , सुप्रसिद्ध गायक पी गणेश, कवी संतोष पाटील , गायक डॉ गिरीश कुलकर्णी , गायक हरी महाजन, गोंधळी संभाजी पाटील , कवी सागर जोशी , कुलकर्णी मॅडम , नृत्यकार राजनंदीनी राठोड , पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब , पत्रकार राहुल दाभाडे , लोकमत पत्रकार विनोद कोळी ,…
चाळीसगाव : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे हत्या केल्याची थरारक घटना चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्या परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे हे आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा येथे शनिवारी आलेले होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोनवणे याने मायाबाई प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (वय- ४०) हीच दगडाने ठेचून निर्दयपणे खून केला. हि धक्कादायक घटना २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील पिर मुसा…
नवी दिल्लीः भारतात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापासून तर उन्हाची लाही लाही होईल. त्यामुळे उन्हापासून सुटका करण्याची तयारी आधीच करायला हवी. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर पंखे आणि एअर कंडिशनर ठीक करून घेतात. किंवा त्याला रिप्लेसमेंट करून नवीन प्रोडक्ट्स खरेदी करतात. ज्यामुळे उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळतो. मार्केटमध्ये अनेक जबरदस्त एसी उपलब्ध आहेत. परंतु, जर तुम्हाला पोर्टेबल एसी खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अमेझॉनवर मिळत असलेल्या अशाच एका एयर कंडिशनर संबंधी माहिती देत आहोत. हे आकारात एखाद्या बॉक्स सारखा दिसतो. त्यामुळे याला तुम्ही कुठेही हातात घेवून जावू शकतात. हे एक खूपच स्वस्त आणि टेबल…
रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित हा उत्तम कर्णधार असूनही तो सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज आहे. मात्र रोहित सध्या 34 वर्षांचा असून तो काही वर्षांत निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत संघाला त्याच्यासारखा आणखी एक घातक सलामीवीर हवा आहे. रोहितची जागा घेणारा 21 वर्षीय फलंदाज आहे. रोहित शर्मा सध्या ३४ वर्षांचा आहे आणि या वयानंतर काही वर्षातच बहुतेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतात, अशा परिस्थितीत टीम इंडियाला रोहितच्या जागी नवीन सलामीवीराची गरज भासेल. युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)…
रविवार २७ फेब्रुवारी शुक्र आज मकर राशीत प्रवेश करत आहे. मकर राशीत शनी योगकारक ग्रह असल्याने शुभ परिणाम मिळतात. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक असेल. इतर सर्व राशींसाठी कसा असेल दिवस, पाहा आज तुमच्या नशिबाचे ग्रहतारे काय सांगतात. मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे, तुमचे परिश्रम आणि नशीब तुम्हाला हर प्रकारे साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात कोणाचे तरी सहकार्य लाभेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. घराबाहेर आनंद राहील. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील.…
सातारा :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत संप पुकारला होता ,त्यामुळे अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी चालू वर्षात शैक्षणिक प्रवेश सुद्धा करत आहेत.सामाजिक न्याय विभागातर्फे डी.बी.टी व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यामूळे अनेक प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थी या यांसारख्या योजनेपासून , स्कॉलरशिपपासून वंचित राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाला आणि सामाजिक न्याय विभाग मंत्री यांना विनंती आहे की डी.बी.टी व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत वाढवून देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी सोशल मिडियाद्वारे जोर धरू लागली आहे .तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे ही मागणी…
पाचोरा : प्रतिनिधी रस्त्यावरील सरकारी गटातील व वर्ग 2 जमिनीचे मालक रामदास पांडुरंग पांढरे यांच्या शेजारील गायरान व वर्ग दोनची जमीन कोरताना संदीप बापू ढाकरे दीपक बापू ठाकरे व अण्णा ठाकरे ,पवन ढाकरे ,योगेश आण्णा ढाकरे वरील सर्व व्यक्ती दोन वर्षापासून आमच्या शेतीच्या बाजूला सरकारी गट त्यांची शेती आहे या दोन्ही गटातून पाच ते सात लाख रुपयाचे मुरूम कुऱ्हाड तांडा बुद्रुक खुर्द व आसपासच्या खेड्यांना मुरूम विक्री केला आहे मुरूम कोरत असताना रात्री दोन वाजता शेजारील शेतकऱ्याने त्याच्या बांधावर कोरत असताना बघितले व त्या शेतकऱ्यांनी कायदेशीर कारवाई करील असे सांगितले असता त्यांनी त्या शेतकऱ्याला मारहाण केली व जिवंत मारण्याची धमकी…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी वरठाण प्रतिनिधी. घरी येत असतांना गुराना पाण्यातुन काढण्यासाठी गेलेला अठ्ठाविस वर्षीय तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू झाल्याची घटना म्हशिकोठा ता सोयगाव येथे चार वाजेच्या सुमारास घडली…. मृत तरुणांचे नाव कीरण नाना गोलाईत (रा.म्हशींकोठा, ता.सोयगाव) असे आहे म्हशीकोठा येथील कीरण गोलाईत हा गुरडोरे चारण्यासाठी खडकदेवळा( ता पाचोरा) धरणाजवळ गेलेला होता….………..०पाच वाजेच्या सुमारास जनावरे पाणी पिण्यासाठी धरणाजवळ आले पाणी पितांना काही जनावरे खोल पाण्यात जात असल्याने किरण जनावरे बाहेर काढण्याचा नादात पाण्यात बुडाला असल्याचे माहिती हाती आली आहे या घटनेबाबत पोलीस पाटील यांनी बनोटी पोलीस चौकीस माहीती दीली असुन कीरण याची उत्तरीय तपासणी पाचोरा येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आली
सोयगाव : प्रतिनिधी विजय चौधरी एक लाख तेरा हजार रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्या बाबतचे निर्देश आरोग्य संचालनालय यांनी शुक्रवारी दिले आहे त्यामुळे आता तालुकावासियांच्या आरोग्य सेवेसाठीच्या जळगाव,औरंगाबाद खेट्या थांबणार आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्याने सोयगाववासीयांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. मागासलेल्या आणि अतिदुर्लाक्षित सोयगाव तालुका आरोग्य सेवेपासून वंचित राहिलेला होता.आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील ८६ खेड्यातील नागरिकांना अतिदक्षतेच्या आणि गंभीर आजाराच्या निदानासाठी जळगाव आणि औरंगाबाद खेट्या माराव्या लागत होत्या परंतु सोयगाव तालुका प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या मागणीचा आरोग्य संचालनालय यांनी विचार करून राज्यातील विशेष बाब म्हणून सोयगाव…