चाळीसगाव – प्रतिनिधी मुराद पटेल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद येथे आपली गरळ ओकली.तेथे रामदास हे शिवरायांचे गुरू होते व रामदास नसते तर शिवरायांना कोणीच ओळखले नसते असे संतापजनक विधान केल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक विधानाच्या निषेधार्थ शहरातील तहसील कार्यालय समोर दि १ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रेमीं संघटनानी निषेध आंदोलन करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही. असा इशारा शिवप्रेमी संघटनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार द्वारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू व्यक्तिमत्व होते.त्यांच्या स्वराज्याची संकल्पना ही राष्ट्रमाता जिजाऊ…
Author: Saimat
???????? नमस्ते ???????? ????️ आज तिसरे भाग में देवों के देव महादेवकी उपासना करने से क्या फल प्राप्त होता है ये जानेंगे ❇️ जो व्यक्ति महाशिवरात्रि, श्रावण मास के सोमवार, प्रदोष व्रत करते है, 16 सोमवार का उपवास करते है उस व्यक्ति ने किसी बिल्व वृक्ष के नीचे खड़े होकर खीर और देसी घी का दान करें… ये दान वेदोक्त ब्राम्हण देवतां या किसी जरूरतमंद लोगों को भी दे सकते है… ये करने से महालक्ष्मी जी की कृपा प्राप्त होती है क्योंकि बिल्ववृक्ष लक्ष्मी जी ने खुद के हाथों से लगाया है ???????? हनुमान जी शिवजी के 11 वे…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मोबाइल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील एकूण ३८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अक्षय अशोक जैन (वय-२३) रा. रंगार गल्ली पाचोरा हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. अक्षय जैन यांचे पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ अथर्व मोबाईल नावाचे मोबाइल दुकान आहे. मोबाईल विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानातील एकूण ३८ हजार १९० रुपये किंमतीचे मोबाईल चोरून…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी भागातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील १० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर असे कि, किशोर लालचंद डावराणी रा. सिंधी कॉलनी अमळनेर हे कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी घर बंद करून बाहेर गावी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरातील १० हजार रुपयांची रोकड आणि ४५ हजार रुपये किमतीचे कानातील दागिने असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी किशोर डावराणी यांनी अमळनेर…
फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील बामणोद येथे शेतकऱ्यांच्या शेतातून कापून ठेवलेला कोरडा हरभरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर असे की, यावल तालुक्यातील बामणोद येथील शेतकरी राजेंद्र गोपाळ राणे (वय-६०) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या उदरनिर्वाह करतात, त्यांचे आमोदा ते बामणोद रोडवर शेत गट नंबर १८० मध्ये त्यांचे शेत आहे. त्यांनी शेतात हरभरा पिकाची पेरणी केली होती. सध्या हरभरा कापणीवर आल्यानंतर त्यांनी हरभरा शेतात कापून ठेवला होता. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३ क्विंटल वजनाचा कापून केलेला कोरडा हरभरा चोरून नेला आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे कृषी केंद्राचे गोडावून फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकुण ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भूषण संजय पाटील (वय-२९, रा.बांभोरी ता.धरणगाव) यांचे बांभोरी गावात शेतकरी कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. दुकानाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या दुकानाचे गोडावून आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ४ हजार ३०० रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर आणि ७०० रुपयांची रोकड असा एकूण ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यासंदर्भात भुषण पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार…
‘कच्चा बदाम’ गाण्यासाठी प्रसिद्ध झालेला भुबन बड्याकर रस्ता अपघातात जखमी झाला आहे. सोमवारीच भुबन बड्याकर हे कार चालवायला शिकत होते आणि त्याचवेळी त्याचा अपघात झाला. त्यानंतर भुबनला जवळच्या रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, या अपघातात भुबन बड्याकर हा गंभीर जखमी झाला आहे. भुबनने नुकतीच सेकंड हँड कार खरेदी केली असून ती चालवायला तो शिकत होता. पश्चिम बंगालमधील एका खेडेगावातील भुबन बड्याकर हा शेंगदाणा विक्रेता होता त्याच्या कच्चा बदाम या गाण्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात आला. या गाण्यावर सेलेब्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सोशल मीडियावर जोरदार रील्स तयार होत आहेत.पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारा भुबन बड्याकर रातोरात इतका प्रसिद्ध झाला की त्याचे…
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेत चांगलाच वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता पुढचा अंक सुरू झाला असून संजय राऊत यांनी आज थेट पंतप्रधान कार्यालय गाठून गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले. केंद्र सरकारकडून कारवाईची आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही. ज्याप्रमाणे केंद्रातील तपास यंत्रणा महाराष्ट्रात कारवाया करत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तपास यंत्रणा काम करतील, असा सूचक इशारा त्यांनी भाजप नेत्यांना दिला. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सूडबुद्धीने कारवाया सुरू आहेत.…
यावल (सुरेश पाटील) आज दि.1मार्च रोजी यावल येथिल एस.टी.स्टँड आवारातील श्री काळभैरव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फराळ प्रसादाचे वाटप भुसावळ येथील प्रसिद्ध बिल्डर्स मंदार चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त श्री काळभैरव मंदिरात यावल शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सर्व स्तरातील नागरिकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात यावल आगारातील अधिकारी-कर्मचारी,चालक वाहक कर्मचारी सेवानिवृत्त वाहक,चालक इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला.महाशिवरात्री निमित्त प्रसादाचा लाभ सर्व स्तरातील हजारो स्री-पुरुष नागरिकांनी घेतला,कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर पवार, सिद्धांत घारू,विलास चौधरी, दीपक मंदवाडे,गणेश चौधरी,चेतन सपकाळे,आकाश कोळी,संदीप माळी,लखन पवार,नकुल माळी,कार्तिक साळी,विकास पाटील,दिलीप फेगडे,विजय बारी यांनी परिश्रम घेतले. https://youtu.be/T7uisKVc6Fo
यावल : प्रतिनीधी सुरेश पाटील येथिल एस.टी.स्टँड आवारातील श्री काळभैरव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भुसावळ येथील बिल्डर्स मंदार चव्हाण यांच्या हस्ते फराळ व प्रसादाचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त श्री काळभैरव मंदिरात यावल शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सर्व स्तरातील नागरिकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात यावल आगारातील अधिकारी-कर्मचारी, चालक वाहक कर्मचारी सेवानिवृत्त वाहक, चालक आदींनी सक्रिय सहभाग घेतला. महाशिवरात्री निमित्त प्रसादाचा लाभ हजारो स्री-पुरुष भाविकांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर पवार, सिद्धांत घारू, विलास चौधरी, दीपक मंदवाडे, गणेश चौधरी, चेतन सपकाळे, आकाश कोळी, संदीप माळी, लखन पवार, नकुल माळी, कार्तिक साळी, विकास पाटील, दिलीप फेगडे, विजय बारी आदिंनी परिश्रम घेतले.