धरणगाव : जिल्हा प्रतिनिधी येथील विवेकानंद पंतसंस्थेचे तसेच स्वप्निल मेडीकल चे संचालक सुधाकर शेठ वाणी व स्वामी समर्थ ट्रेडर्स चे संचालक किशोर शेठ वाणी यांचे वडील कै नामदेव महादु येवले यांचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील वाणी समाज कार्यालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला त्यात शहर व परिसरातील 240 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्या प्रसंगी प्रारंभी प्रमुख अतिथी चा हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले प्रसंगी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद पंतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड भोलाणे बापु होते तर प्रमुख अतिथी म्हणुन नेत्रतज्ञ डॉ आम्रपाली चेतन काकलीया, जळगाव, उमविचे सिनेट सदस्य दिलीपदादा पाटील, प.रा.विद्यालय चे…
Author: Saimat
चाळीसगाव : प्रतिनीधी काही दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील केशव राघो महाजन यांच्या घराला गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील रोख रक्कम जवळपास ७ लाख ७० हजार रुपये व घरातील स्त्रियांचे दागिने जळुन खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेने केशव महाजन यांनी आयुष्यभर कष्ट करून उभा केलेल्या संसाराची राख झाली. तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांना याबाबत कळताच त्यांनी गावातील भाजपा कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली होती व लवकरच सदर कुटुंबाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी पोहरे येथे केशव राघो महाजन यांची भेट घेतली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. झालेले नुकसान पाहून व ग्रामस्थांनी मांडलेली व्यथा पाहून आमदार…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहात 1 मार्च रोजी आमदार राजुमामा भोळे व कलेक्टर अभिजित राऊत , महापौर जयश्रीताई महाजन, विष्णु भंगाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी 219 श्री सदस्यांनी रक्तदान केले. पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. नियमांचे पालन करा अन् मनातील भीती काढा नियमांचे पालन करा आणि मनातील भीती दूर करा असे आवाहन मा,कलेक्टर अभिजित राऊत व राजुमामा भोळे शासकीय वैद्यकीय यांनी रक्तदान शिबीर प्रसंगी केले. या वेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या नियोजन बद्ध कार्याचे कौतुक ही केले. जळगांव जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये…
पहुर ता.जामनेर : प्रतिनिधी येथील आर.टी.लेले विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कागदी पुठ्या पासून बनवलेले जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉली प्रोजेक्टचे प्रदर्शन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. दरम्यान , राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे व्हा. चेअरमन साहेबराव देशमुख, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, शिवसेना प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे, सहकार महर्षी अरुण घोलप पत्रकार, प्रवीण कुमावत, यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजधर पांढरे गणेश पांढरे, मुख्याध्यापक आर बी पाटील, प्रमुख…
भडगाव : प्रतिनिधी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ मार्च रोजी भडगाव नगरीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भडगाव नगरपरिषदेच्या परवानगीने १४३ श्रीसदस्यांच्या माध्यमातून सकाळी ठीक ८-०० ते १०-०० वाजेपर्यंत भवानी मंदिर,गिरणा वसाहत, श्रीगणपती मंदिर, जिजामाता शाळा, पोलिस वसाहत, श्रीदत्त मंदिर, बस स्थानक, बढे व्यापारी संकुल आदि परिसरातील तसेच भडगाव पेठ भागातील श्रीमारुती मंदिर, जि.प.शाळा ते स्मशानभुमी अशा एकूण ५.७ कि.मी.क्षेत्रफळ परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानांतर्गत एकूण ५.२ टन सुखा कचरा संकलीत करुन त्याची नगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रात विल्हेवाट लावण्यात आली.
जळगाव : प्रतिनिधी येथील कांचन नगर येथील रहिवासी इसमाने 2 मार्च बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदान शिलाईच्या कामावर असताना गळफास घेतला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रमेश सुकलाल राजपूत (वय 48, रा.कांचन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे. रमेश राजपूत यांचा 13 वर्षीय मुलगा यश याने मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी क्षुल्लक कारणावरून गळफास घेतल्याची घटना घडली होती. या घटनेपासून मयत यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचे मित्रांनी व कुटुंबीयांनी सांगितले. बुधवारी…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर परिसरता एका 21 वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर अर्जुन पाटील(वय 21) या तरूणाने काल दि.1 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरात कोणी नसतांना छताला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. शहरातील फुले मार्केट येथे ज्ञानेश्वर एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पो.ना.दत्तात्रय…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील निमखेडी शिवारात असलेले शिवधाम मंदिरात काल महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दरवर्षाप्रमाणे यंदाही या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महत्व प्राप्त झालेले आहे. याठिकाणी येणाऱ्या भक्तांना आर.के.गृपतर्फे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी गृपचे राज कोळी, गौरव कोळी, शाम पवार, हरिश रावतकर, सुनिल वाघ, रुपेश साळुंके, कुणाल खैरनार, लवेश पाटील, राहुल पाटील आदींचे सहकार्य लाभले.
मेष : मेष राशीच्या लोकांना आज एखाद्या बाबत चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली असेल. नोकरीत आर्थिक लाभ होतील, पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यापार्यांसाठी नफ्याची स्थिती असेल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी परीक्षेत…
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रचंड गाजावाजा करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने आर्यन खान याच्याकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा अहवाल दिला आहे. एनसीबीतील सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात…