Author: Saimat

भुसावळ : प्रतिनिधी घटस्फोटीत, विधवा, विधूर, शेतकरी, प्रौढ, व्यवसायिक व दिव्यांग विवाहेच्छुक युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन येथील संतोषी माता हॉलमध्ये 3 एप्रिलला केले आहे. यासाठी नावनोदणीचा फॉर्म भरण्याची मुदत 15 मार्चपर्यंत होती. मात्र ती मुदत आता 10 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीतर्फे उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी केले आहे. भोरगाव लेवा पंचायत ऑफीस, पुरुषोत्तम जनरल स्टोअर्स, मामा पान सेंटर येथे मोफत नावनोंदणी केली जात आहे. विवाहेच्छुकांनी विहित मुदतीच्या आत नोंदणी करावी.

Read More

एकविसाव्या शतकाकडे झेप घेणाऱ्या, अत्याधुनिकता व नवतंत्रज्ञानाची जोड मिळालेल्या आपल्या देशात आजही अज्ञान व अंधश्रध्देतून शेकडो लोकांचे बळी पडत आहेत. विशेषतः देशातील ग्रामीण भागात वाड्यावस्तीवर अशिक्षित कुटूंबामध्ये वंशाच्या दिव्यासाठी किंवा घरात सुखशांती लाभावी, यासाठी नवस फेडले जातात. त्यासाठी सावकाराकडे आपले दागिने गहाण ठेवण्याची वेळ येते. अशाच आशयाचे मात्र सत्य घटनेवर आधारीत व अंधश्रध्देविषयी जागरुकता निर्माण करणारे ‘बळी’ हे नाटक जळगावच्या सुबोध बहुउद्देशिय युवा विकास प्रतिष्ठानने काल नाट्यस्पर्धेत सादर केले व ते रसिकांच्या पसंतीसही उतरले मात्र संथगतीमुळे ते अपेक्षित प्रभाव पाडण्यात कमी पडले. लेखिका व दिग्दर्शिका रूपाली गुंगे यांच्या टिमने ‘बळी’ सादर करतांना जी मेहनत घेतली ती निश्‍चितच वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दीपस्तंभ मनोबल हे देशातील दिव्यांग, अनाथ आणि वंचितांचे विदयापीठ आहे, आणि हे विदयापीठ दिव्यांग विदयार्थ्यांच्या स्वप्नपूर्ती साठी महत्वाची भूमिका बजावत आहे.आपल्या आयुष्यात अडचणी आल्या की आपण अस्वस्थ होतो.पण या दिव्यांग आणि अनाथांच्या आयुष्यात इतक्या अडचणी असूनही त्यांच्यातील उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद हा नक्कीच प्रेरणादायी आहे.दिव्यांगांच्या आणि अनाथांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून त्यांना जगण्याची ऊर्जा आणि बळ निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाला भेट देणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पास राधाकृष्ण गमे, प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी युक्रेन मध्ये सुरू असलेले युद्व त्वरित थांबावे व पूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी शुक्रवार रोजी मुस्लिम समुदायाने विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते व प्रार्थना झाल्यानंतर मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाच मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रार्थना – श्रद्धांजली व निषेध सर्वप्रथम विश्‍वशांतीसाठी अल्लाकडे प्रार्थना करण्यात आली त्यानंतर युद्धात मरण पावलेल्या नवीन शेखर आप्पा या विद्यार्थ्यास श्रद्धांजली अर्पण करून त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्‌याचा तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रपति व पंतप्रधान यांना निवेदन निवेदनातील मागण्या युक्रेन मध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन शंकरअप्पा या विद्यार्थ्यास रशियन सरकारने आर्थिक मदत द्यावी,यूक्रेन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील जैन इरिगेशनसह कंपनीमधील विविध आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध व सेफ्टी स्लोगन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. जैन व्हॅलीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. जैन व्हॅली परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी एस. डी. गुप्ता, व्ही. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सेफ्टी विभागाचे डी. जे शितोळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, कैलास सैंदाणे, योगेश्वर पवार यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून 4 मार्च देशभर साजरा केला जातो. 4 मार्च 1966 रोजी देशात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. देशातील सर्व उद्योग, आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 मार्च…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बॉक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनतर्फे उद्या रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरेाग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी 11 ते 1 या वेळात ज्ञान साधना शाळा (हुडको), पिंप्राळा जळगाव येथे होणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार करतील तर प्रमुख पाहुणे म्हणुन काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील यांची उपस्थीती लाभणार आहे. शिबिरात स्री रोग तज्ज्ञामार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येईल.तसेच मूळव्याध तज्ज्ञ डॉ मनोज पाटील हे मूळव्याध, फिशर, भगंदर व इतर संबंधित आजारांवर तपासणी व उपचार करतील. मूळव्याध शत्रक्रिया, मोती बिंदू शत्रक्रिया विनामूल्य करण्यात येईल. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी खान्देश हा विविध लोक साहित्य आणि परंपरेनी नटलेला प्रदेश आहे खान्देशातील वहीगायन, सोंग, कानबाई गिते, गोठ, सोगाड्या पार्टी, भगत भोपे आदि लोककला ह्या परंपरेन चालत आलेल्या व खान्देशातील सण, उत्सव व मौखिक साहित्यातुन निर्माण झालेल्या अस्सल लोककला आहे. खान्देशातील विविध लोककले च्या जतन व संवर्धना सोबतच ह्या लोककलां ची माहिती नव्या पिढीला मिळाली तसेच काळाच्या ओघात नामशेष होणा-या या कलेला नव संजीवन मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने खान्देशात प्रथमच या महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजंननाताई पाटील व जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन यांच्या शुभ हस्ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या जाहिरात कला विभागाचे प्रमुख व अमूर्तचित्रकार विकास मल्हारा यांना जगप्रसिद्ध बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई आयोजीत 130 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात अनटायटल्ड या चित्राला सर्वोच्च सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सुवर्णपदक, 50,000 (पन्नास हजार) व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खानदेशातील कलावंताला हा प्रतिष्ठेचा सन्मान पहिल्यादाच मिळाला आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ’विकास मलारांची अमूर्त चित्रे त्यांच्या अंतर्बाह्य दिलखुलास स्वभावासारखी आहेत. निसर्गांवर त्यांचे भरभरुन प्रेम आहे, त्यातीलच अनटायटल्डया चित्राला बाँबे आर्ट सोसायटी मुंबई चा प्रतिष्ठेचा सर्वोच्च सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. जैन इरिगेशनला हा अभिमानाचा क्षण आहे.’…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी यावल- रावेर तालुक्यात सिंचन विभागामार्फत वनक्षेत्रात,शेती शिवारात नदी नाल्यांवर बांधले जाणारे नालाबांध हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे बांधकामे होत असल्याने या भोंगळ कारभाराकडे जिल्हा परिषद सिंचन विभाग कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता, आणि यावल-रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, बांधकाम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावल-रावेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये ठेकेदार आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत,याबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी लक्ष केंद्रित करून वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकाऱ्याच्या निगरगट्ट भूमिकेचे एक उदाहरण प्रत्यक्ष समोर आले आहे. यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेती शिवारातील…

Read More

कजगाव : प्रतिनिधी येथील रहिवासी कुस्ती मल्ल दामू वाकडे यांनी कासोदा येथे कासोदा कुस्तीगीर महासंघ बजरंग ग्रुप तर्फे भव्य कुस्तीची दंगल दीनाक 4 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती तेथे कजगाव येथील दामू वाकोडे यांनी धुळ्याच्या पैलवाना ला चित्त करत विजय मिळवला मानाचे बक्षीस ( गदा ) मिळवून कजगाव गावाचे नाव जिल्ह्यात गाजवले , दामू पैलवान कजगाव येथे आले असता शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन, यांच्या वतीने फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले , यावेळी अण्णा बोरसे, अशरफ खाटीक , आशिष वाणी , अक्षय मालचे , शाम सोनार , अभीलाष वाघ ,…

Read More