Author: Saimat

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले आहे. तत्पूर्वी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली. कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं, अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली. यंदाचे अधिवेशन वादळी होणार का? असा प्रश्‍न विचारताच संजय राऊत म्हणाले, विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी हूल विरोधी पक्षातर्फे उठवली जाते आहे. आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. त्यामुळे कसले वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले अशी वादळ येत नाही. आदळआपट करून काही प्रश्‍न सुटणार नाही. ठाकरे सरकारला साधा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला मात्र कदाचित त्याचा हा जीवघेणा प्रयत्न परमेश्‍नरालाही मान्य नव्हता. या व्यक्तीने काही कारणास्तव गळफास घेऊन मृत्युला कवटळण्याचा निश्‍चय केला मात्र त्याचे हे कवटळाने परमेश्‍वरालाही मंजूर नसावे म्हणून गळफास घेतांना दोरी तुटली व गळफास सुटला व हा प्रयत्न असफल ठरल्याने त्याच्या परिवारातीलल सदस्यांनीही मोकळा श्‍वास घेतला. सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील एका 40 ते 45 वर्षीय व्यक्तीने आज दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराला ते मान्य नसल्यामुळे सुदैवाने ती दोरी तुटल्याने…

Read More

कासोदा : आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आडगाव रस्त्यावर कासोददया कडून आडगाव जाणाऱ्या इंडिका गाडी MH-४७-N -२८१७ ला जोरदार अपघात झाला असून गाडी चालक ज्ञानेश्वर राठोड (वय ३५) जखमी झाला असून, चालक चाळीसगाव येथील तालुका पिंपरखेड तांडा येथील राहायला आहे. त्याला १०८ च्या साहाय्याने जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. चालक हा गाडी एकटाच होता. गाडीचा वेग जस्त असल्याने ती सरड कासोदा रस्त्यावरील पाटचारी पुढे रमेश पाटील याच्या शेताजवळ गाडी झाडावर जाऊन आदळली. चालकाला गाडीतून काच फोडून बाहेर काढण्यात आले. त्यासाठी लुनेश्वर भालेराव, यु.टी.महाजन सर, आडगाव ग्रा.पं सदस्य अनिल पाटील (पिंटू मिस्तरी) आडगावचे गोपाल सोनवणे, शुभम पाटील, मंगेश ठाकूर, रवि सोनवणे,…

Read More

मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षने ठाकरे सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ असे लिहिलेले फलक लावून भाजपच्या नेत्यांनी घोषणा दिल्य. विरोधी पक्ष नेते फडणवीसांनी केली टीका राज्य विधिमंडळच्या आजपासून चालू होणाऱ्या अर्थसंकलपीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षने संघर्षचा संकल्प केला आहे. हे सरकार दाऊद समर्पित आहे अशी टीका फडणवीस यांनी केली व बुधवारी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले. ‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा भाजपाच्या आमदारांनी…

Read More

रावेर : प्रतिनिधी शहरातील सप्तश्रृंगी नगरातील ४६ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता महाजन (वय-४६) या विवाहितेचा लाकडी दांडा डोक्यात मारल्याने खून केल्याची धक्कादायक घटना गुरूवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली. मयत विवाहितेचा मुलगा हा दुपारी कामावरून जेवनासाठी घरी आला तेव्हा घराला कुलूप होते. कूलूप उघडून पाहिले असता आईचा खून झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाला शेजारच्या नागरीकांनी मोठी गर्दी केली. हा खून कोणी केला व का केला यासंदर्भात माहिती उपलब्ध झालेली नाही. खून झाल्याची माहिती…

Read More

मुंबईः प्रतिनिधी  सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षणासंदर्भातील अहवाल फेटाळल्यानंतर आता ठाकरे सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत आता ओबीसी आरक्षणाच्या नव्या रणनीतीवर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकासआघाडी सरकार काही महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. तत्पूर्वी ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्याच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. भाजपच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम होते. परंतु, महाविकासआघाडी…

Read More

धानोरा ता.चोपडा ः वार्ताहर कुटूंबात किरकोळ वाद सुरुच असतात बऱ्याचदा वाद हे आर्थिक विवंचनेतून होतांना दिसतात, मात्र अशा प्रसंगी घाई घाईत घेतलेले निर्णय आयुष्यात निराशेशिवाय काहीच येत नाही. याचा प्रत्यय येथून जवळच असलेल्या बिडगाव गावात आला आहे. कौटुंबिक वादातून पतीने विषप्राशन केल्याचे समजताच. पत्नीने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे विनोद विक्रम बाविस्कर(कोळी, वय 40) हे आपल्या कुटूंबासह रहिवासास आहेत. ते आपल्या पत्नी वर्षा विनोद बाविस्कर(वय 35), मुलगी खुशी विनोद बाविस्कर, किर्ती विनोद बाविस्कर, मोनाली विनोद बाविस्कर…

Read More

नाशिक :प्रतिनिधी शहरातील मानवता कॅन्सर रुग्णालयाच्या लिफ्टच्या खड्ड्यात पाचव्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची खबर मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात (Hospital) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिकच्या मुंबई नाका येथील नामांकित मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत दिलेल्या कामानुसार लिफ्टचे काम सुरु होते. लिफ्टच्या दारावर पोस्टर चिपकवतांना अश्फाक शब्बीर नगीनेवाले (वय 25) हा तरुण लिफ्टच्या खड्यात खाली पडला. त्याला जबर मार लागून या घटनेत सदर तरुणाचा दुर्देवी मुत्यु झाला आहे. मुंबई नाका पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई नाका पोलिस अधिक तपास करत आहे. घटनेची माहिती मिळताच मयत…

Read More

पाचोरा प्रतिनिधी गणेश शिंदे  महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास यांच्या शासन निर्णया अनुषंगाने राज्याचे कृषीमंत्री यांनी मालेगावातील सर्व गावांचा समावेश पोखरा योजनेत केला. याचा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणुन त्यांचे अभिनंदन करतो.परंतु त्याच धर्तीवर पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना केली आहे. सदर निवेदनाची प्रत प्रांताधिकारी यांना देखील दिली आहे. यासाठी आ. किशोर पाटील यांनी देखील आज पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हि मागणी करावी, अशी मागणी देखील अमोल शिंदे यांनी अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केली आहे.…

Read More