मुंबई : यास्मीन शेख राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी हजारो कोटीची कामे केली जातात.सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण हे या खात्याचे मंत्री असले तररी त्यांना या खात्यातील निधी नेमका कामांवर खर्च होतो की,प्रमुख अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होतो याची कल्पना आहे की नाही,याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.विशेषतः मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांचे नाव चर्चेत आघाडीवर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जो काही एकूण कोट्यवधीचा निधी दिला जातो,त्यातून 2 टक्के निधी आपल्याकडे जमा करण्याचे तोंडी आदेश त्यांनी राज्यातील सर्व अधिक्षक अभियंत्यांना दिले असल्याची जोरदार चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात सुरु असल्याचे समजते. याबाबत संबंधित मंत्र्यांनी व मंत्रालयातील…
Author: Saimat
धानोरा ता चोपडा : प्रशांत चौधरी येथुन जवळच असलेला सातपुडा पर्वतावर वणवा लावण्याच्या घटनेत सध्या वाढ होत आहे.यामुळे येथिल वन्यजीव धोक्यात आहे. औषधी वनस्पती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असुन कंदमुळे ही नामशेष होत आहे.हा वणवा थांबला नाही तर वाळवंट होण्यास उशिर लागणार नाही.तर गेल्या बारा वर्षात वनवा लावण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे.तरी यावर कायमस्वरुपी कायदा करावा अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहे. साईमत ने गेल्या सात वर्षापासुन दरवर्षी वनवा बाबत बातम्या प्रकाशित केल्यात.तीन वर्षापूर्वी तत्कालीन उपवनसंरक्षक संजय दहीवले यांनी वन सचिवांपर्यंत वनवा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. महाराष्ट्र,मध्यप्रदेश या राज्यांना लागुन सातपुडा पर्वत आहे.गेल्या बारा वर्षांपूर्वी हा पर्वत सुजलाम्- सुफलाम् होता.परंतु काही…
मुंबई : प्रतिनिधी भाबडेपणात रमणारे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शुक्रवारी अचानक विरोधीपक्ष असलेल्या भाजपच्या प्रेमात पडले आणि नकळत त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सही केली. विरोधकांच्या स्वाक्षरी मोहिमेची त्यांना कल्पना नव्हती कल्पना नसलेल्या झिरवाळांनी विरोधक आमदारांचा गोतावळा बघत सही केली, आणि काही क्षणातच चूक कळताच कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. दरम्यान, त्याच वेळी त्या ठिकाणी हसन मुशरीफ आले , त्यांनी ही पेन हातात घेतला सही करणार, तोच त्यांनी प्र्श्न विचारला की सही कश्यासाठी त्यात कोणी तरी बोलले की, मलिक यांच्या राजीनाम्या साठी , आणि मग सही न करता हातात घेतलेला पेन घेऊन निघून गेले .…
चोपडा ः प्रतिनिधी तालुक्यातील घोडगाव शिवारात तब्बल 4 बिघा परिसरात अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दि.3 रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आले आहे. या अफूची किंमत अंदाजे करोडो असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. या घटनेमुळे अधिकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वाकळी शिवारातील रहिवासी प्रशांत पाटील यांच्या मालकीच्या घोडगाव शिवारातील शेतात तब्बल 4 बिघे परिसरात अफूच्या झांडाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती, त्यानुसार पोनि कुनगर यांनी यांच्यासह प्रभारी नायब तहसिलदार देवेंद्र नेतकर, पोउनि अमरसिंग वसावे, पो.कॉ.सुनिल जाधव, सुनिल कोळी, राजु महाजन, भरत नाईक, पोना.शशिकांत पारधी, लक्ष्मण शिंगारे…
मुंबई: प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. अनिल देशमुख यांचा सीबीआयकडून आज पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी सीबीआयची टीम आज आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंगही आर्थर रोड तुरुंगात पोहोचले आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. कालही सीबीआयने देशमुख यांचा जबाब नोंदवला होता. उद्याही देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. देशमुख यांचा जबाब सलग नोंदवला जात आहे. मात्र, सीबीआयकडून देशमुखांवर प्रश्नांची काय सरबत्ती करण्यात आली हे गुलदस्त्यात आहे. काल काही प्रश्नांची उत्तरे अनिर्णित राहिल्याने सीबीआयकडून देशमुख यांना आजही तेच प्रश्न विचारले जाणार असल्याचं सांगितलं…
उस्मानाबादः प्रतिनिधी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्मले, हे ऐकून काही खटकलं असेल. चौधरी कुटुंबियांच्या या घराला या नावांची सवय झाली आहे. उमरगा तालुक्यातील चिंचोली गावात अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रपती जन्मले आणि सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान. आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान नेमके कोण, असा प्रश्न पडला असेल तर ते विशिष्ट नाव असलेले राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाही तर मुलांना या पदांचीच नावं देण्यात आली आहे. या दोन मुलांचे बाबा व्यवसायाने शिक्षक आहेत. लोकशाहीवर त्यांचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे आपल्या मुलांची नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच ठेवणार, असा त्यांचा आग्रह होता. अखेर कायदेशीर लढाई लढल्यानंतर त्यांनी मुलांची नावं अशी ठेवली. उमरगा तालुक्यातील चिंचोली गावातील…
मेष: मेष राशीच्या लोकांचा कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचे काम चांगले राहील. पैसा असेल, पण अचानक खर्चही होईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आई-वडिलांचे प्रेम मिळेल, मुलांचे सुख मिळेल. कामात धनलाभ होईल. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही चांगला फायदा होईल.…
सोयगाव : विजय चौधरी आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात गट,गणाच्या आरक्षणा सोबतच सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणावरही राजकीय चर्चांना उधाण आल्याने इच्छुकांचा आतापासूनच पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणावर डोळा लागून आहे. सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीला प्रशासन जुंपले असून गट आणि गणांच्या आरक्षणाची लगीनघाई जवळ येवून ठेपली आहे.त्यासाठी राजकीय इच्चुकानंना मात्र आरक्षण आपलेच राहणार असल्याची जवळपास शाश्वती आल्याने आता सभापती पदाच्या आरक्षणावर इच्छुकांचा डोळा लागून आहे.त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून सभापती पदाच्या मागील आरक्षणावरून आगामी आरक्षणावर चर्चेला वेग आला आहे. गट,गण जैसे थे असतांनाच इच्च्कांनी मात्र तयारी हाती घेतली असून गट आणि गणाच्या…
नाशिक : यास्मिन शेख साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन हेमाडपंती शिवमंदिरात महाभंडाराचे आयोजन संपन्न झाले सालाबाद प्रमाणे 2007 पासून ते आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षांपासून दुबे परिवाराने महाशिवरात्रीनिमित्त शिव रुद्राभिषेक व महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते व ही परंपरा दुबे परिवाराने अखंड सुरू ठेवली आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरचा शिवालय तलावा शेजारी असलेल्या प्राचीन हेमाडपंती मंदिरात गावकरी व दुबे परिवार यांनी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या भंडाऱ्याला हजारो भाविक व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळेस दुबे परिवार यांनी व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य करून याचे नियोजन…
नाशिक : यास्मिन शेख साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वीर एकलव्य जयंती ००२ टीमच्या वतीने कळवण तालुक्यातील पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या शुभहस्ते वीर एकलव्य प्रतिमेचे पूजा व शांततेचे वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सप्तशृंगी गडावरील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भव्य दिव्य फटाकेच्या व ढोल ताश्याचा गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी आदिवासी 002 टीमचे संस्थापक, अध्यक्ष व आदिवासी समितीचे पत्रकार तुषार बर्डे व सरपंच रमेश पवार, माजी सरपंच अर्जुन सूर्यवंशी, मनोज बर्डे,भूषण माळी, वनराज बर्डे, सुरेश पिशु, ग्रा.प. सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके, अजय दुबे, राष्ट्रवादी नेते शांताराम सदगीर,…