Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी आव्हाने गावाजळून गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ मार्च रोजी ट्रॅक्टर चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि , जळगाव तालुक्यातील आव्हाने गावाजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार ३ मार्च रोजी तालुका पोलीस कर्मचारी यांनी दुपारी ४ वाजता गिरणानदी पात्राजवळील आव्हाणे गावाजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतुकीचा परवाना विचारले असता ट्रॅक्टर चालक सुनील बाबुराव सोनवणे (वय-४२, रा. आसोदा रोड जळगाव) याने उडवाउडवीची…

Read More

जळगावः प्रतिनिधी  बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेस आज दि.4 मार्च पासुन सुरूवात झाली. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला शहरातील परीक्षांकेंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. बारवीच्या परिक्षांना सुरूवात झाली असून आज पहिलाचा पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी हा विषय कठिण असल्याचा अनेकांचा समज असतो यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉप्या केल्या जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरातील अश्‍याचा काही केंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांनी तारेवरची कसरत करीत परिक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याचे दिसुन आले. मोठ्या प्रमाणावर भरारी पथके तैनात करण्यात आले असले तरी कॉपी पुरविणारे देखिल काही कमी नसल्याचे परीक्षा केंद्रांवर पहावयास मिळाले. अनेक परिक्षा केंद्राच्या बाहेर कॉप्यांचा खच आढळून आला.

Read More

जळगाव : प्रतिनीधी हॉटेल मालकाच्या परवानगीविना सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन हॉटेल मालकाला दमदाटी, शिवीगाळ तसेच त्याच्या नातेवाईकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेविकेचे पती धुडकू सपकाळे यांच्यासह त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल काशिनाथ नजीक महेश विष्णू रडे यांचे प्रभात रेस्टॉरंट आणि भरीत सेंटर आहे. या हॉटेलचे कामकाज बघण्यासाठी महेश रडे यांना त्यांचे मेहुणे हेमंत पाटील हे मदत करत असतात. ३ मार्च रोजी हॉटेल मालक महेश रडे यांच्या गैरहजेरीत धुडकू सपकाळे व…

Read More

पेशावर, पाकिस्तान : पुन्हा एकदा दहशतवादानं पाकिस्तानला आपल्या निशाण्यावर घेतलंय. शुक्रवारी पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 36 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या (जुमा) नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं गर्दीच्या मध्यभागी स्वत:ला स्फोटकांनी उडवून घेतलं. या स्फोटाच्या झळा अनेक कुटुंबांपर्यंत पोहचल्यात. या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानची सर्व मदत पथकं घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी यास्मीन शेख  वाढत्या लोकसंखेमुळे आता वाहनधारकांची देखिल संख्या अधिक झाली आहे यामुळे वाहतूक कोंडीत अनेक वाहनचालक जोरजोरात हॉर्न वाजवून वातावरण तापवतात तर काही मध्ये गर्दीत घुसून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. यामुळे वाहतूक मोकळी होण्याऐवजी गुंता आणखी वाढतो व सर्वांना मनस्ताप होतो, हा आपला सर्वांचा नेहमीच अनुभव. पण, आपल्याच देशात मिझोराम हे एक असे राज्य आहे की, जिथे नागिरक वाहतूक कोंडीतही, वाहतुकीची शिस्त मोडत नाहीत. महिंद्रा उद्योग समुहाचे आनंद महिंद्रा यांनी ‘अतिशय सुंदर फोटो..’ म्हणून अशा वाहतूक शिस्तीचा फोटो रिट्विट केला आहे. फोटोत वाहतूक कोंडीमुळे वाहनांची लांब रंग लागली आहे. पण, सर्व वाहनचालक शिस्तीत लाईन लावून उभे आहेत.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी युवासेना जळगाव महानगरतर्फे विधवा महिलांना शुक्रवारी इलेक्ट्रिक मोटर युक्त शिलाई मशीनचे वाटप नेहरू चौक येथील शिवसेना कार्यालयात करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जयश्री नरेंद्र देशमुख, रुपाली अजय पाटील, ज्योती गणेश महाजन, सुशीला फकिरा नाईक, स्वाती गोविंदा देवरे या विधवा महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या. या व्ोळी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लद्धा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडीया, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेता अनंत जोशी, नगरसेवक गणेश सोनवणे, नितीन बर्डे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती…

Read More

मुंबई : प्रतिनीधी राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी – विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळत आहेत. अशातच आता भाजपा चे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने १० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला आ.महाजन यांनी आव्हान दिले होते. या दोन जनहित याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, विधिमंडळाच्या नियमदुरुस्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा या याचिकेवर राज्य सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे जनक व्यास आणि आ. गिरीश महाजन यांच्या जनहित याचिका सुनावणी योग्य नाहीत, असेही राज्य सरकारने स्पष्ट…

Read More

कजगाव प्रतीनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या सावदे गावचे सुपुत्र माननीय श्री मनोहर नामदेव देसले हे C R P F मध्ये हवलदार या पदावर गडचिरोली येथे लष्कर मध्ये 24 वर्ष भारत मातेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होऊन प्रथमच कजगाव येथे आल्याने शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन यांच्या वतीने व पाचपावली माता नगर कजगाव यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले , व त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कजगाव येथील शिवसेना कार्यालयात अनिल महाजन , राष्ट्रीय चर्मकार समाजाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे , हर्षल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, खलील मन्यार, रमेश बैरागी, श्याम सोनार , अविनाश वाघ…

Read More

मुंबई प्रतिनिधी यास्मीन शेख  ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे मात्र अद्याप धान खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी आल्यास मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवण व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात विधानसभा सदस्य कृष्णा गजबे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ३० सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये खरीप पणन हंगाम २०२१-२२ साठी दि. १ ऑक्टोबर २०२१ ते दि. ३१ जानेवारी २०२२ असा खरेदी कालावधी निश्चित करण्यात आला होता, मात्र मागील हंगामाच्या तुलनेत खरीप पणन हंगाम…

Read More