जळगाव : प्रतिनिधी मेहरूण येथील श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करीत महिलांच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक योगिता धनगर, डॉ. कोमल पाटील, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक, मुख्याध्यापिका शीतल कोळी आदी उपस्थित होते. प्रस्तावनेतून संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर राजमाता जिजाऊ, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादर केल्या. यात…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी येथील जेसीआय संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्याच दिवशी ३४ महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर १८ मार्च पर्यंत सुरु आहे. जेसीआय जळगाव संस्थेतर्फे मंगळवार दि. ८ ते १८ मार्च दरम्यान भास्कर मार्केटसमोरील राम टोटल बॉडी चेकअप सेंटर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. मंगळवारी शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शल्यचिकित्सक डॉ. ए. सी. पाटील, शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. भंगाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतील तांत्रिक पर्यवेक्षक लक्ष्मीकांत त्रिपाठी, डॉ. राहुल व्यास यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन…
जळगाव : प्रतिनिधी दिनांक 9 मार्च 2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या बैठकीत आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हाअध्यक्ष तुषार निकम व जळगाव जिल्हा सचिव रईस खान तसेच जळगाव जिल्हा सल्लागार प्रमुख.डॉ.सुनीलजी गाजरे सर या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दिली यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. कार्यकारणी पुढील प्रमाणे जळगाव महानगर कार्य अध्यक्षपदी.योगेश दत्तात्रेय हिवरकर. जळगाव शहर महानगर सचिव. चंदन दामू पाटील व जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख.योगेश चुडामन भोई यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगीउपस्थित कार्यकर्ते.अनिल वाघ, आत्माराम चौधरी. प्रीतपाल सिंग, सुभाष कोळी, रवींद्र चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे : प्रतिनिधी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे राज्यपालांना टार्गेट करताना दिसून आले. गेल्या काही दिवसातल्या राज्यपालांच्य वादग्रस्त वक्तव्यांवरून राज ठाकरे राज्यपालांवर मान्सुनातला पाऊस बरसावा तसे बरसले आहेत. त्यांनी राज्यपालांच्या ब्रम्हचार्याचाही खरपूस समचार घेतलाय. राज्यपालांनी एका कार्यक्रमात बोलताना, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या लग्नातील वयावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज ठाकरे आज राज्यपालांवर तुटून पडताना दिसून आले. तर छत्रपती शिवाजी महाजारांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही ते बरसले आहेत. आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न..…
पाचोरा -गणेश शिंदे शेतकऱ्यांना अनुदान सह धान्य पुरवठा तात्काळ होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तहसील कार्यालयातील शहर आणि तालुक्यातील विविध समस्या लवकर सोडविण्यासाठी पाचोरा कॉंग्रेस शिंगाडा मोर्चा दि २१ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आठवडे बाजारातुन काढणार आहे. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. या मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी २०२२ चा मोफत धान्य चा अद्याप पुरवठा झाला नाही. यात तालुक्यातील काही ठिकाणी पुरवठा बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा. शहरातील जवळपास २२०० दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत मात्र केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जातो गेल्या विस वर्षा…
मुंबई : यास्मिन शेख मागील अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ करत गोधळ घालणाऱ्या भाजप च्या ” त्या १२ ” आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले होते . यावरून राजकारण चांगलेच तापले, म्हणे राज्यपाल नियुक्त ” त्या ” १२ आमदारांची नियुक्ती होत नाही, म्हणून सरकार ने १२ आमदारांना निलंबित केले. सरकार आणि विरोधी पक्ष यात सत्तासंघर्ष नेहमी सुरू राहणार फक्त खुर्ची वरील चेहेरे बदलत असतात . या १२ आमदारांची सभागृहात अनुपस्थिती ही विरोधकांचा आवाज दाबत होती की, काय त्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या १२ आमदारांचे निलंबनच रद्द केले. यामुळे भाजप चा विजय झाला असला तरी…
पूर्वार्ध जळगाव : हेमंत काळुंखे राज्य नाट्यस्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव व भुसावळच्या नाटकांनी आपला ठसा उमटवला असून या स्पर्धेच्या निमित्ताने सांस्कृतीकदृष्ट्या मागासलेल्या जळगावला व नाट्यरसिकांना सलग विविधांगी नाटकांची अपूर्व मेजवानी मिळत आहे. नाट्यस्पर्धेचा पडदा लवकरच पडणार असून आता रसिकांना उत्कंठा लागली आहे ती या स्पर्धेत कोण बाजी मारणार? कोण-कोणती नाटके चमकणार? हौशी कलावंतापैकी कोणाला पारितोषिक मिळणार याबाबतची.यंदाचे वैशिष्ट म्हणजे या स्पर्धेत जळगाव शहरासह जिल्ह्यातील 11 संस्थांनी सहभाग नोंदविला असून भुसावळच्या तीन तर मध्यप्रदेशातील एका संस्थेनेही हजेरी लावली आहे. कोणतीही स्पर्धा म्हटली की, त्यात चुरस निर्माण झाालीच पाहिजे.ती यंदाही दिसून आली. स्पर्धेत जय-पराजय वाट्याला येतोच मात्र स्पर्धेत भाग घेणेे ही सर्वप्रथम…
राज्य नाट्य स्पर्धा जळगाव : हेमंत काळुंखे केंद्रावरील राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धेचा समारोप काल झाला.जळगावच्या युवा ब्रिगिडीअर्स बहुउद्देशिय फाऊंडेशनने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तरुणींच्या जोडीदार निवडीच्या विषयावर प्रकाशझोत टाकणारे ‘फक्त चहा’ हे नाटक सादर करुन लेखक व दिग्दर्शक आकाश बाविस्कर व त्यांच्या टीमने अपेक्षित उंची गाठण्याचा जो प्रयत्न केला तो निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय. प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांचे एकच स्वप्न असते की तिला तिचा जोडीदार सुयोग्य मिळावा. तिचे वय, शिक्षण पूर्ण झालं की तिने लवकर लग्न करणे. मात्र, आजच्या आधुनिक मुलींची इच्छा ही त्यांच्या शिक्षणाचा उपयोग स्वावलंबी बनण्यात आणि तिच्या विचारांशी जुळणाऱ्या मुलाशी लग्न करण्यात असते. प्रतीक्षा ही स्वतःवर प्रेम…
यावल : प्रतिनिधी यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्चा सभागृहात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविद्र पाटील , जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थीतीत अतुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रवक्तेपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी उपास्थीत होते.
मुंबई:प्रतिनिधी ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 लाख (बारा कोटी त्र्यान्नव लक्ष फक्त) रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दि. 16 व 17 मे, 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच राज्याच्या काही भागात जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी 93 लक्ष रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासननिर्णय दिनांक ७ मार्च २०२२ रोजी महसूल…