Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या जाहिरात कला विभागाचे प्रमुख व अमूर्तचित्रकार विकास मल्हारा यांना जगप्रसिद्ध बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई आयोजीत 130 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात अनटायटल्ड या चित्राला सर्वोच्च सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सुवर्णपदक, 50,000 (पन्नास हजार) व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खानदेशातील कलावंताला हा प्रतिष्ठेचा सन्मान पहिल्यादाच मिळाला आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ’विकास मलारांची अमूर्त चित्रे त्यांच्या अंतर्बाह्य दिलखुलास स्वभावासारखी आहेत. निसर्गांवर त्यांचे भरभरुन प्रेम आहे, त्यातीलच अनटायटल्डया चित्राला बाँबे आर्ट सोसायटी मुंबई चा प्रतिष्ठेचा सर्वोच्च सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. जैन इरिगेशनला हा अभिमानाचा क्षण आहे.’…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी यावल- रावेर तालुक्यात सिंचन विभागामार्फत वनक्षेत्रात,शेती शिवारात नदी नाल्यांवर बांधले जाणारे नालाबांध हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे बांधकामे होत असल्याने या भोंगळ कारभाराकडे जिल्हा परिषद सिंचन विभाग कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता, आणि यावल-रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, बांधकाम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावल-रावेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये ठेकेदार आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत,याबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी लक्ष केंद्रित करून वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकाऱ्याच्या निगरगट्ट भूमिकेचे एक उदाहरण प्रत्यक्ष समोर आले आहे. यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेती शिवारातील…

Read More

कजगाव : प्रतिनिधी येथील रहिवासी कुस्ती मल्ल दामू वाकडे यांनी कासोदा येथे कासोदा कुस्तीगीर महासंघ बजरंग ग्रुप तर्फे भव्य कुस्तीची दंगल दीनाक 4 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती तेथे कजगाव येथील दामू वाकोडे यांनी धुळ्याच्या पैलवाना ला चित्त करत विजय मिळवला मानाचे बक्षीस ( गदा ) मिळवून कजगाव गावाचे नाव जिल्ह्यात गाजवले , दामू पैलवान कजगाव येथे आले असता शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन, यांच्या वतीने फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले , यावेळी अण्णा बोरसे, अशरफ खाटीक , आशिष वाणी , अक्षय मालचे , शाम सोनार , अभीलाष वाघ ,…

Read More

कजगाव : प्रतिनिधी कजगाव हे भडगाव तालुक्यातील बाजारपेठचे मोठे गाव आहे गावाला 35 ते 40 गावांचा रोजचा संपर्क आहे यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थांना दररोज काही ना काही कामासाठी कजगाव येथे यावे लागते. यामुळे परिसरातील नागरीकांच्या सेवेत लवकरच आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांना दळवलन साठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे अशात गावात ग्रामस्थांना नवीन आधार बनविण्यासाठी भडगाव येथे जावे लागते व्यापारी दृष्टीने बाजारपेठ असलेल्या गावांतून लोकांना आधार संबंधित कामे जसे की नवीन आधार कार्ड बनविणे दुरुस्ती करणे लहान मुलांचे आधार कार्ड बनविणे याकरिता भडगाव येथे जावे लागते संपूर्ण दिवस या कामासाठी खर्च करावा लागत असे कजगाव ग्रामस्थांची गैरसोय…

Read More

कजगाव ता.भडगावः प्रतिनिधी  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे बंद असलेल्या 12 वी च्या परिक्षेला 4 तारखेपासून सुरुवात झाली राज्य सरकारने शाळा तेथे केंद्र असा निर्णय घेतला त्या अनुषंगाने कजगाव येथील ब ज हिरण माध्यमिक शाळेत दि 4 पासून 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली. प्रथमच शाळेत परीक्षा केंद्र सुरू झाल्याने प्रत्येकाला वेगळीच उत्सुकता लागून होती परीक्षा केंद्रा वर एकूण 46 विद्यार्थी पैकी 45 हजर होते गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा बंद असल्याने विद्यार्थी च्या मनात भीती पाहावयास मिळत होती दोन वर्षांपासून लिखाणाची सवय कमी झाल्याने पेपर लिहिण्यास वेळ पुरणार नसल्याने 30मिनिट वाढवुन देण्यात आले आहे परीक्षा केंद्रांवर कोरोनाचे नियम पाळण्यात आले…

Read More

मुंबई : प्रतिनिधी “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांना अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देम्यात आली आहे. सन 2022-23 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार मुलांचा प्रवेश घेण्‍यासाठी आता 10 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु, ही मुदत आता 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव 31 डिसेंबर करण्यात आला आहे.…

Read More

पुणे : प्रतिनिधी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याचा दौऱ्यामध्ये पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळा ही पडणारा आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका , मेट्रो स्थानक परिसरात . एसपीजी आणि पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार महापालिकेत बंदोबस्त असणार आहे. या या कार्यक्रमासाठी पास असेल त्या व्यक्तीलाच महापालिकेत सोडलं जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत उद्या (6…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी असो किंवा कौटुंबिक आनंद, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. आज मूड चांगला असणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुमचे जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब किंवा मित्रासोबत प्रवास कराल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे जरंडी याठिकाणी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाने दिनांक 27/02/2022 रोजी अटक केलेल्या आरोपीस मा. न्यायालय सोयगाव याठिकाणी हजर करण्यात आले. सदर प्रकरणी मा. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला असून आरोपीची हर्सूल जेलला रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरण वनविभागाने युद्धपातळीवर घेतले असून लवकरच याचे सूत्रधार गजाआड होतील अशा तीव्र हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याना चांगलीच चपराक बसली आहे. मादी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाने केली जिवतोड मेहनत दिनांक 24/02/2022 रोजी मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या बिबट्यास वनविभागाने तातडीने सोयगाव येथे हलवून तीन डॉक्टरांना पाचारण केले. औषधे, ऑक्सिजन सिलेंडर, तातडीने हलविण्यासाठी मोबाईल व्हॅन, आवश्यक संसाधने…

Read More