अमरावती : वृत्तसंस्था
एकाच विहरीत दोघा भावांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत मृतदेह सापडले होते. प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. दोघा भावांचा अपघात झाला, त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी पोलिसांचा तपास सुरु आहे.
आत्महत्या, घातपात की अपघात?
प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. मात्र दोघा भावांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.